मला
माहिती नाही कादरखान साहेब
की तुमच्याबद्दलचा माझ्या
मनातील
आदर, प्रेम
मी योग्य शब्दांत व्यक्त करतोय
की नाही.
पण
तुमच्या कोट्यवधी चाहत्यांपैकी
मी एक आहे.
त्यापोटीच
मी व्यक्त होतोय. तुमच्या
उत्तुंग, वैविध्यपूर्ण
अभिनयाने
स्तिमित झालेल्यांपैकी
मी आहे. कदाचित
स्वत:ला
उच्च दर्जातील
समीक्षक
मानणाऱ्यांना हे पसंत पडणार
नाही. पण
कोणताही सो कॉल्ड
चेहरा नसतानाही
विलक्षण बोलणारा तुमचा चेहरा,
पडद्यावरचा
वावर, कधी
खर्जातील गोळीबंद तर विनोदी
फिरकी घेणाऱ्या आवाजात थेट
प्रेक्षकांच्या
हृदयाला
भिडणे हे सारेच अलौकिक होते.
प्रत्येक
चित्रपटात तुमचे नवे रूप
पाहता
पाहता माझ्यासारखे अनेकजण
कधी तुमचे फॉलोअर्स होऊन गेलो,
ते आम्हालाच
कळाले नाही. साहेब,
माझा तुमचा
पहिला परिचय ‘सुहाग’
सिनेमात झाला. परभणीच्या
नाझ टॉकीजमध्ये अमिताभ बच्चन,
शशीकपूर,
अमजदखानचा
म्हणून सुहाग पाहण्यासाठी
गेलो. त्या
दिग्गजांच्या गर्दीतही
तुम्ही
स्वत:ची
छाप सोडली होती. तुमचा
निष्ठूर गँगस्टर पाहून ७५
पैशांचे तिकीट
खरेदी केलेले
अस्सल सिनेमादर्दी परभणीकर
तुमच्यावर कमालीचे संतापले
होते,
हे
मला आजही आठवतंय. पुढे
औरंगाबादला मुकद्दर का सिकंदर
पाहिला.
तुमच्यासोबत
पुन्हा एकदा महानायक अमिताभ
होते. तुफान
सोसाट्याचा
वारा सुटलेल्या
त्या स्मशानभूमीत महानायकाला
तुम्ही अशा काही शब्दांत
जीवनाचे तत्वज्ञान ऐकवले की
सारे थिएटर अवाक होऊन गेले
होते.
मिस्टर
नटवरलाल, नसीब,
यारानामधील
तुमच्या भूमिका तुमच्यातील
खलनायकी अभिनयाचे वैविध्य
दाखवणाऱ्याच होत्या.
पण,
नाविन्याची
आस
म्हणून तुम्ही विनोदी
भूमिकांकडे वळालात.
जितेंद्र,
श्रीदेवीचा
हिंमतवाला पाहून
आलेला माझा
एक मित्र म्हणाला,
‘कादरखानसाठी
पाहा. फार
धमाल उडवलीय.’
आणि
मग मी पण तुमच्या अनोख्या
अंदाजातील विनोदाचा आनंद
मनमुराद लुटला.
माझ्यासोबतचे
लोक तुम्ही पडद्यावर येताच
लोटपोट होऊन हसत होते.
तरीही साहेब,
हिंमतवालाच्या
चित्रपट परीक्षणात एका स्थानिक
समीक्षकाने
तुमची अवहेलना
केली. तुम्ही
एक सुमार दर्जाचे विनोदी
अभिनेते आहात,
असे
म्हटले. देशभरातील
समीक्षकांचा असाच सूर होता.
पण तुम्ही
त्याला
दाद दिली नाही.
भूमिकेशी
प्रामाणिक राहत प्रेक्षकांचे
भरपूर मनोरंजन
करण्याच्या
मूळ उद्दिष्टापासून ठळला
नाहीत. आणि
मग जस्टीस चौधरी, मवाली,
पाताल भैरवी,
जानी दोस्त,
मकसद गिरफ्तारमध्येही
तुमच्यातील विनोदवीराची
अनेक
रुपे आम्ही मनात साठवली.
त्याचा मनसोक्त
आनंद घेतला.
‘घर
एक मंदिर’मधील तुमचा सेठ धरमदास
कोण विसरू शकेल. शोभा
खोटे,
असरानींसोबतची
तुमची जुगलबंदी म्हणजे शाब्दिक
करामतीचा अस्सल नमुना होता.
त्यात जितेंद्र,
मिथुन हिरो
असले तरी खरे हिरो तुम्हीच
होतात.
गोविंदासोबतचा कुली नं. १
तर केवळ अफलातून. त्यात
तुम्ही रुपेरी
पडद्यावरील
विनोदी अभिनय किती निखळ,
सात्विक असू
शकतो, हे
सिद्ध करून दाखवले.
अंगारमधील
तुमच्या ‘डॉन’ने समीक्षकांची
तोंडेच बंद
करून टाकलीत.
साहेब,
तुम्ही दिग्गज
नाट्यकर्मी, ताकदीचे
लेखक. त्याचा
अनुभव मी घेतला. औरंगाबादेतील
१९९० च्या सुमारास एका एकांकिका
स्पर्धेत भगवान होमिओपॅथीक
महाविद्यालयाच्या संघाने
‘
भुखे पेट भजन न होए गोपाल’
एकांकिका सादर केली.
भिकारी,
अनाथांच्या
जीवन संघर्षाविषयी तुम्ही
त्यात हृदयापासून केलेले
भाष्य प्रत्येक संवादागणिक
डोळ्यात अश्रू आणणारे होते.
एकांकिका
संपल्यावर
टाळ्यांचा कडकडाट
झाला. कलावंतांचे
कौतुक तर झालेच पण दिग्गज
अभिनेते
कादर खान यांचे लिखाण
असल्यानेच त्यात एवढा अणकुचीदारपणा
आल्याचेही
सांगितले गेले.
एक रंगकर्मी,
चित्रपटप्रेमी
म्हणून माझ्या मनात तुमच्याबद्दलचा
आदर आणखीनच उंचावला.
कादरखान साहेब,
दहा-बारा
वर्षांपूर्वी तुमच्याविषयी
अनेक वावड्या उठवल्या जात
होत्या. त्यातील
एक होती की, कादरखान
यांच्या बंगल्यावर आयकर
खात्याची धाड पडली आहे.
तुम्ही बंगल्यातून
चॅनेलच्या अँकरला फोन केला
आणि सांगितले...‘माझ्या
घरात कोणी आयकरवाले आले असतील
तर तुम्हीच
त्यांना मला भेटण्यास
सांगा. कारण
मी तर घरात निवांतपणे बसलो
आहे.
हल्ली
इकडे कोणी फिरकतही नाही.
आणि माझ्याकडे
कोणतीही अवैध संपत्ती नाही.
असलीच तर ती
अगणित चाहत्यांच्या प्रेमाची
आहे. ती
हवी असल्यास आयकरवालेच
काय
तुम्हीही घेऊन जाऊ शकता.’
असेही तु्म्ही
जाहीर केले.
एक
माणूस म्हणूनही तुम्ही खरेच
किती उंची व्यक्तिमत्व होता,
याचा अंदाज
यावरून त्या नाठाळ चॅनेलवाल्याला
आला नाही. पण
माझ्यासारख्या कोट्यवधी
चाहत्यांना नक्कीच ते पुन्हा
एकदा ठामपणे कळाले. साहेब,
तुमचा पुर्नजन्मावर
विश्वास आहे की नाही माहिती
नाही...पण
माझी त्या विधात्याकडे नक्कीच
प्रार्थना राहिल, तुम्हाला
त्याने काहीशी विश्रांती
घेऊन पुन्हा पाठवावे...
तुमच्या
अभिनयाने आमचे जीवन समृद्ध
करून टाकण्यासाठी...
No comments:
Post a Comment