Sunday 3 March 2024

ओम शं शनैश्चराय नमः

चवचाल

ऐसे अनंत देह

बरबटले, सडले,

बुडाले ... आकंठ

डोहात वासनेच्या

पण  ...

देह संपता संपेना अन्

डोह वासनेचा

आटता आटेना

॥ ग ॥

हजारो वर्षांपासून चालत आलंय हे. थांबलेलं नाही कधीच. कुठल्याही काळात, कुठल्याही संस्कृतीत, कोणत्याही देशात थांबलेलं नाही. तुम्ही अगदी तुमच्या आजूबाजूला थोडं खोलात जाऊन नीटपणे बघा. गुप्त  चौकशी करा. हजारो पुस्तकाच्या ढिगाऱ्यात एका पुस्तकाचं जास्त शाई लागलेलं पान असतं ना तसं शोधा. नीटपणे बघा. पण माझा तो पॉईंट नाहीच. मला म्हणायचंय की, कुठंही डाखाळलेला, भैसटलेला पुरुष म्हटला, की त्याच्यात चार ठिकाणी लफडी करण्याची धगधग असतेच. चेहऱ्यावर, बोलण्यात चारित्र्याचा आव आणून तो सारखं सावज शोधत फिरत असतो. सावजाच्या मागावर असतो. कुठे कोणी मिळते का, कोणी जाळ्यात ओढलं जातंय का हे चाचपून पाहत असतो. पण हां ...  तुम्हाला म्हणून सांगतो हां ... जो पक्का, खरा लफडेबाज असतो ना तो कितीही डाखाळला तरी खाज भागवण्यासाठी, बिछाना ओला करण्यासाठी कुंटणखान्यात जात नाही. त्याला एखादीला पटवून, तिच्यावर स्वार होऊन म्हणजे ताब्यात घेऊनच वासना काही तासासाठी शांत करायची असते.असं अगदी तत्वज्ञान्यासारखं त्या तरुणानं म्हणजे जनकनं बोलण्यास सुरुवात केली.

त्याच्या या अशा भडक बोलण्यानं शशीरंजन अतिशय अस्वस्थ झाले. तीस-पस्तीस वर्षांच्या कारकीर्दीत पहिल्यांदाच त्यांच्या कार्यालयात असा कोणी घुसखोर घुसला होता. ते रागानं फुलले होते. रुपेरी होऊ लागलेले चमकदार केस वारंवार मागे सरकवत होते. मोठमोठ्यानं श्वास घेत होते. त्यांच्या कपाळावर आठ्यांचे जाळे उमटले होते. पण जनकला त्याची काहीच तमा नव्हती. तो त्यांच्याकडं दुर्लक्ष करत एकेक शब्दावर जोर देऊन सांगत होता.

पैसे घेऊन रात्र रंगवण्यात तरबेज असलेल्या बायांमध्येही हा लफडेखोर गुंतत नाही. अशा बायांना खरेदी करण्यासाठी नोटा खर्च करणं काही फार अवघड नसतं त्याला. पण खिसा हलका करून शरीरसुख कशासाठी, असं त्याला वाटत असतं. एखाद्या यंत्रासारखी ठोकमपीट नाही जमत त्याला. कंबर लचकवत, ठुमकत चालणाऱ्या मुली, बाया त्याला आवडतात. जड ओझ्याच्या छात्या, काजळ भरल्या डोळ्यांच्या बायांवरून त्याची भुकेली नजर फिरत असतेच. काहीजणींमध्ये तो जिवापाड अडकतो. काहीजणींभोवती फक्त मनानं घुटमळत राहतो. वर्षानुवर्षे. कदाचित आयुष्यभर. या जगातला पहिला पुरुष जन्माला आला. तेव्हा तो शौर्य, साहस, धोकेबाजी, दगाबाजीसोबत हे घेऊन आला असणार. बाईलच्या मागं फिरत राहणं. निसर्गाची देणगी आहे ही. खरंचयात काहीही अतिशयोक्ती नाही. निसर्गानंच त्याला हे दिलंय. निसर्ग आणि नियतीच्या कोंडीत असतो तो. पण ... पण काही बाया, पोरी अशा असतात ना ... की त्या त्याला फक्त अडकवतात. त्याच्याशी, त्याच्या शरीराशी हलकासा स्पर्श करत खेळत राहतात. त्याच्या कणाकणात घोंगावत राहतात. विचारांच्या चक्रात फिरत राहतात. आणि तोही अशा बाया, पोरींच्या मागं भटकत राहतो. कधीतरी ती आपल्याला तृप्त करेल. देहाचा भोग चढवेल, या आशेवर राहतो. काहीजणांना हा भोग सहज मिळून जातो. हा भोग त्याला नियतीनं दिलेला असतो.’ 

शशीरंजन यांनी मध्येच मोठ्यानं नापसंतीचा हुंकार देऊन पाहिला. तरीही त्याचं बोलणं सुरूच होतं.

तुम्हाला सांगतो साहेब, काही डाखाळलेल्या माणसांना अशा काटेदार बाईसाठी फारच तडफडावं लागतं. ती त्याला झुलवत, फिरवत, खेळवत राहते वर्षानुवर्षे. केवळ माणसाचंच असं होतं असं नाही. एखादी काटेवाली बाईसुद्धा तळमळत राहते. पण त्याच्या अंगांच्या गंधाचं उटणं तिला लागत नाही. दोघंही भुक्खीच राहतात. हा खेळ सगळीकडं सुरू असतो. 

अशा भुकेल्या बाया - माणसांना शोधून काढणं मला फार आवडतं. अ ... हा s s ... तुम्ही म्हणाल, ही शोधाशोध तर जगात अनेकजण करत असतील. पण आपली खासियत वेगळीच आहे. मी फक्त शोधून काढेपर्यंत थांबत नाही. एक प्रकारची चारित्र्य शोध मोहीम चालवतो मी. आवडच लागली तशी मला. अशा बाया-माणसांनी त्यांच्या वासनांविषयी बोलावं. लफडी सांगावीत. मन एकदम मोकळं करावं. मनसोक्त सांगावं, यासाठी मी जाळं विणत राहतो. आणि त्यात एक जबर स्वार्थ असतोच. तिचं उखळ शोधताना जमलं ... तर एखाद्या उफाड्याच्या, डाखाळलेल्या बाईनं थोडं तुप आपल्याही ताटात वाढावं, तिचं शरीर स्वतःहून आपल्या स्वाधीन करावं, असं मला वाटत राहतं. त्यासाठी मी तिचा मनापासून पाठलाग करत राहतो. 

कधी हा डाखाळलेला पुरुष असंल तर त्यानं आपलं मनोरंजन करावं, असं मला वाटतं. अशी डाखळू माणसं तर थोड्याफार प्रयत्नात सांगून टाकतात. दोन-चार पेगमध्ये मोकळी होतात. नाहीतर समुद्र किनाऱ्यावरील मुक्कामात सहज खुलून जातात. त्यांनी शोधून शोधून भोगलेल्या बायकांची नावं बदलून, लपवून का होईना सांगून टाकतात. त्यांची भानगड कळू शकते आपल्याला.

पण काटेवाल्या, उफाड्याच्या बायका मोकळ्या होणं, आपल्याकडून पकडल्या जाणं फार कठीण. आणि फारशी ओळख नसलेल्याकडं त्यांनी मनमोकळं करणं तर अशक्यच. त्यामुळं बहुतांशवेळा अशा बाईचा पाठलाग करणं माझ्या मनाच्या खेळातच असतं. म्हणजे कधी कधी मला वाटतं, की मीच आदल्या जन्मीचा जगद्विख्यात मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्रॉईड आहे. बाई-माणसातील भानगडीमागं हात धुवून लागलेला फ्रॉईडआणि लफडेबाजही.असं बोलून त्यानं डोळे मोठे करत एक मोठा श्वास घेतला.

आपलं नाव जनक आहे, असं तो खुर्चीवर बसतानाच म्हटला होता. पण आपण नेमके कोण आहोत, कुठून आलोत, काय काम आहे, असं काहीही सांगितलं नाही. न सांगता थेट ऑफिसमध्ये शिरणाऱ्यांचा शशीरंजन यांना भयंकर राग. आणि हा तर थेट आत घुसून बायकांविषयी काहीतरी उथळ बडबड करू लागला होता. स्वतःला चक्क फ्रॉईड म्हणवून घेत होता. वेडसरपणाची झाक वाटली त्याच्या बोलण्यात. म्हणून आवाज चढवून शशीरंजन म्हणाले

अहो, डोक्यावर परिणाम झालाय काॽ किती कमाल करताय. कोण आहात तुम्हीॽ पूर्ण नाव-गावॽ कसे काय घुसलात तुम्ही इथं. आणि तुम्ही हे मला का सांगतायॽ कोण हवंय तुम्हाला. हे एशियन लँड सर्व्हे अँड कुरिअर्सचं ऑफिस आहे. तुम्हाला शेत जमीन, प्लॉट मोजायचा असेल किंवा कुठं कुरिअर करायचं असेल. बाहेरगावचं पार्सल मिळत नसेल तर बोला. नाहीतर चला, निघा इथून. हे ... हे ... हे असलं मला सांगून तुम्हाला काय मिळणार आणि मला काय मिळणार? सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या बायकांच्या खासगी भानगडी, पिवळ्या पुस्तकातल्या गोष्टी ऐकण्याइतकं आपलं जवळचं, खासगीतलं नातं आहेॽ तुम्ही त्या बायकांच्या चारित्र्याची पत्रावळ हुंगत फिरणार आणि ते मी ऐकायचं काॽ’ 

या प्रश्नावर त्याच्या डोळ्यात किंचित राग साठल्यासारखा वाटला. तो एकाएकी गप्प झाला. टेबलावरील कुरिअर एजन्सीच्या पाकिटांशी चाळा करत त्यानं स्वत:च्या भावनांना आवर घातला. ऑफिसच्या इंटेरिअरवर नजर फिरवणं सुरू केलं. 

शशीरंजन यांना संताप आवरेनासा झाला होता. त्यांनी सगळी शक्तीपणाला लावून त्याच्यावर नजर खुपसली. आपण त्याच्याकडं रागानं पाहत राहिलो तर तो आपोआप निघून जाईल, असा त्यांचा अंदाज होता. रागारागानं ते त्याला आपादमस्तक न्याहाळू लागले.

तो पंचवीस-सव्वीशीतला तरुण असावा. बऱ्यापैकी उंच होता. गोरापान. भुवयांच्या मधून उगवलेलं सरळ नाक. केस दाट आणि कुरळे. दाढीची खुंटं वाढली होती. डोळ्यात एक बेफिकिरी. आणि सोबत समोरच्या माणसाला फारसं काही कळत नाही, असा भाव. गुलाबी रंगाचा आणि त्यावर भलीमोठी सोनचाफ्याची फुलं असलेला शर्ट. बाह्या नीटपणे वळवून कोपऱ्यापर्यंत आणलेल्या. हिरवट रंगाची जीन्सची बऱ्यापैकी महागडी पँट. खिशाला दाट पिवळ्या रंगाचा गॉगल अडकवला होता. एकूण या साऱ्यावरून तो गुलछबू पोऱ्या दिसत होता. शशीरंजन यांच्या संतापलेल्या डोळ्यांनी तो किंचित वरमल्यासारखा वाटला. संधीचा फायदा घेत त्यांनी त्याला हातानेच बाहेर जाण्याची  खूण केली. पण एक क्षण थांबत, घसा खाकरत शांत स्वरात तो त्यांना उद्देशून उत्तरला

साहेब, तुमचा हा ॲटिट्यूड, स्पष्टपणा आवडला मला. चारित्र्य ही किती गुंतागुंतीची गोष्ट आहे, हे तुम्हालाही पक्के माहिती आहे. तुमच्याच कशाला अनेक लेखकांच्या कथांच्या मुळात बायका-माणसांचे चारित्र्य असतेच. कधी उघडपणे, कधी छुपे. पण ते असतेच. त्यावर बोलेनच. नक्की बोलेन. पण आधी तुमच्या फायद्याचं थोडंसं सांगतो. अं ... हं. उगाच कपाळावर पुन्हा आठ्या नको. मी सांगतो तो फायदा पैशावाला, नोटांचा नाही हां. तुमच्यातील कला कौशल्याचा, गुणांचा फायदा करून देण्याचा आहे. त्यामुळं मला थांबवू नका.असं म्हणत त्यानं पुन्हा सुसाट बोलणं सुरू केलं.

बघा, मला तुम्हालाच भेटायचंय. तुमच्याशीच बोलायचंय. तुमची माझी ही पहिलीच भेट आहे. तुम्ही मला ओळखत नाहीतच. मी पण तुम्हाला असं व्यक्तिगत ओळखत नाही. मात्र, मी तुम्हाला, तुमच्यातील लेखकाला जाणून आहे. आणि त्या लेखकाशीच मला बोलायचंय. खरं पाहिलं तर कोणी सामान्य वाचक लेखकाच्या प्रेमापोटी असं काही करत नाही. पण मी करतोय. मला काही सांगायचंय तुम्हाला. कदाचित इंटरेस्टिंग असं. नक्की तुमच्यात सुधारणा करणारं. असंय ना की, इतक्या वर्षांपासून लिखाण करताय तुम्ही. माझ्या माहितीप्रमाणं तीस वर्षे नक्कीच झालीत. एवढ्या वर्षात काही कट्टर चाहते तयार झाले आहेत का तुमचेॽ पाच-सात जण सोडा. एखाद्या चाहत्याशी कधी चांदण्यानी आभाळ गच्च भरलेलं असताना रात्रभर मैफल रंगवून बोलला आहात काॽ आपल्या लेखन प्रतिभेबद्दल त्याला काय वाटतं असं विचारलंयॽ

शशीरंजन यांच्या चेहऱ्यावरील नकार वाचत तो म्हणाला

नाही नाॽ माझी खात्री होती की तुमच्यात आणि तुमच्या चाहत्यात, वाचकांत फारसा संवाद झालेलाच नाही. खरं पाहिलं तर आपल्या इथल्या आणि राज्यातील काही वाचनालयांनी तुम्हाला व्याख्यानाचं निमंत्रण दिलं होतं. मात्र, लँड सर्व्हेच्या व्यवसायात गुंतल्याचं कारण दाखवून तुम्ही जाण्याचं नाकारलं. पण खरं कारण म्हणजे ती वाचनालयं फार प्रसिद्ध नव्हती. फार मोठ्या शहरात नव्हती. दुसरं म्हणजे मुख्य प्रवाहातल्या साहित्य संस्थांनी आपल्याला वळचणीत टाकलं. काही बड्या साहित्यिकांनी आपल्या लिखाणावर खासगीत कडाडून टीका केली. काही नामवंत पत्रकारांनी त्या बड्या साहित्यिकांच्या इशाऱ्यावर आपली जाहीर धुलाई केली, याचं दुःख बाळगून तुम्ही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणं नाकारत गेला. तुमचं लिखाण ऐन भरात असतानाच तुमचा वाचकांसोबतचा संवाद तुटत गेला. त्यामुळं बऱ्यापैकी कसब, लिखाणात सखोलता आणि धक्का देणारे नाविन्य असूनही तुम्ही उंची गाठू शकला नाहीत. तुमच्या कथासंग्रहांना फुटकळ संस्थांचेही पुरस्कार मिळू शकले नाहीत. एवढ्या थेटपणे बोलल्याचा राग मानू नका. कारण मी तुमच्या किती फायद्याचं बोलतोय, हे हळूहळू तुमच्या लक्षात येईल. तर ... तुमच्या काही कथा वाचल्यात मी. त्या अपूर्ण, अर्धवट वाटल्या. काहींमध्ये मनोरंजन, थराराची कमतरता होती. विशेषत:लीला, दर्पगंध आणि ऑन बेड एनकाऊंटरया दीर्घकथांमध्ये तर ते स्पष्टपणे लक्षात येतं. शेवटच्या दोन-तीन पानांमध्ये ठळकपणे जाणवतं. ज्या बाया-माणसांविषयी तुम्ही वाचकाच्या मनात सर्वाधिक उत्सुकता निर्माण करता. त्याच्याबद्दलचं औत्सुक्य तुम्ही अचानक सगळं गुंडाळून टाकता. एखादा खड्डा पुरून गाडावं तशी त्या बाई, तिच्या भानगडी गाडता. तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हालाही हे माहिती असलंच तरीही सांगतो. कसंय ना लेखकसाहेब ... तीन-चार चेहरे पांघरून समाजात फिरणाऱ्या  प्रतिष्ठितांविषयी वाचकांना वाचायला आवडतं. त्यात जर ती बाई असेल तर विचारायलाच नको. तुम्ही अशा काही डाखाळलेल्या, भैसटलेल्या म्हणजे पुरुषांना स्वतःभोवती नाचवत ठेवणाऱ्या चवचाल बायांबद्दल कथा लिहिल्या. पण त्यात तो डंख असा पसरून पसरून येत नाही. पुन्हा एकदा तेच उदाहरण देतो ... लीला, दर्पगंध आणि ऑन बेड एनकाऊंटरचं. आणि ‘चाटण’ नावाच्या कथेचंही.’

त्याच्या या बोलण्यानं आश्चर्यचकित होण्यापलिकडं शशीरंजन यांच्याकडं पर्याय नव्हता. या कथा तर आठ-दहा वर्षांपूर्वी कुठल्यातरी मासिकांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. जनक आता जे काही सांगत होता. ते त्यांनाही तेव्हा जाणवलं होतंच. अजूनही ती टोचणी कायम होतं. काही पत्रकार, समीक्षकांनीही त्यांच्या लिखाणातीलकिलिंग इन्स्टिंक्टबद्दल सांगितलं होतं. वाचकांवर निर्णायक घाव घालण्याच्या क्षमतेविषयी सुचवलं होतं. त्यामुळं आपण कितीही चर्चित लेखक झालो असलो, दिवसेंदिवस आपलं लेखन वादग्रस्त, मसालेदार होत असलं तरी दहाव्या मजल्यावर पोहोचत नव्हतं. म्हणूनच या पोराच्या अचूक निरीक्षणाला उचलून फेकता येणार नाही, अशी नोंद शशीरंजन यांनी केली. 

त्यांनी कथा लेखनाच्या प्रांतात काही पावले टाकली तेव्हा सुरुवातीच्या काळात एका कॉलेजात त्यांची मुलाखत झाली होती. त्यात एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी असं म्हटलं होतं की, जागरुक, चाणाक्ष वाचकाचं काय म्हणणं जाणून घेणं मला आवडेल. त्यानं चार चुका दाखवल्या. माझ्या कथा-कादंबऱ्यांमधील व्यक्तिरेखांबद्दल टिप्पण्या केल्या तर ते मला हवं आहे. ते उत्तर शशीरंजन यांच्यासमोर नाचून गेले. मग त्यांनी स्वतःवर नियंत्रण मिळवत मनाला शांत केले. अन् संवादाला सुरूवात केली.

तुम्ही कुठे वाचल्या माझ्या कथा? म्हणजे कोणत्या कथासंग्रहात. मासिकात.

सर, माझे वडिल प्रभूदास तल्हारे. तुम्ही ओळखत असाल त्यांना कदाचित. पेपर, मासिक, पुस्तक वितरणाच्या व्यवसायात होते. वारले ते सात ‌वर्षांपू्र्वी. तेव्हा त्यांच्या खोलीतील रद्दी काढताना त्यात मासिकं सापडली.

ओ ह ...

मासिकं विकली. पण त्यातल्या तुमच्या चौदा कथा वाचल्यात मी. त्याचवेळी तुम्हाला शोधण्याचा बराच प्रयत्न केला. पण शक्य झाले नाही. मासिकांच्या कार्यालयात फोन केले. तिथं जाऊनही आलो. पण बहुधा तुम्ही त्यांना दमबाजी केली असावी. त्यामुळं त्यांनी नंबर दिला नाही तुमचा. अखेर मी एका मासिकवाल्या संपादकाला पटवून शोधलं तुम्हाला. त्याला बोललो. तर तो म्हणाला तुम्ही लेखकाला भेटा आणि सांगा काय सांगायचं ते. त्यांच्याकडून तुमचा पत्ता घेतला. तुमच्या घरी असण्याची वेळही शोधली. आणि पोहोचलो. एवढं सगळं करून तुमच्यापुढं येऊन बसलोय. आता सांगू का जे सांगायचंय तेॽत्यानं आवाजात एक खट्याळ विनय आणत विचारलं. होकारानं मान हलवत शशीरंजन यांनी त्याच्या बोलण्याकडं कान लावले. तो बोलू लागला. 

मी जे काही सांगतो ते ऐकून तुम्हाला वाटेल की, मी कोणी फार अभ्यासू, हुशार वाचक आहे. पण मी काही जगभरातलं वाचलं नाही. फक्त बारावी पास झालोय. कधीकधी वडिलांनी कान उपटले तर दुकानावर बसायचो. तेव्हा वेळ घालवण्यासाठी पुस्तक वाचू लागलो. त्यामुळं वाचनाची आवड लागली. मधल्या काळात हातात लागेल तो कागद वाचून काढायचो. ग्राफिक डिझायनिंगचं काम करत करत सिलेक्टिव्ह, निवडक वाचलं. नंतर दुकान मोठ्या भावानं चालवायला घेतलं. मी दुसरी कामं करू लागलो. त्यामुळं आता तेवढं वाचन राहिलं नाही.

पण मूळ मुद्दा असा की, तुमच्या लिखाणाचा एकूण सूर अभ्यासला मी. तर असं जाणवलं की, तुम्ही कायम माणसाला त्यातही बाईला खोलात शोधण्यासाठी धडपडत असावेत. उठवळ बायकांनाही शोधत असाल. पण तुम्हाला त्यांच्या फार आसपास जाता आलं नाही. गेलात तर पकडता आलं नाही. पकडलं तर पेटवता आलं नाही. एखादा कुत्रा शेपटीचं तुटकं टोक पकडण्यासाठी स्वतःभोवती फिरत राहतो. त्याला काय शेपटीचं टोक सापडतच नाही, तसं तुमचं झालंय. कारण अशा बायका तुमच्या जीवनात आल्या नाहीत. तुम्ही अशा बायकांच्या जीवनात जाऊन मुक्काम केला नाही. थरार, धाडस म्हणून कोणीतरी उचकवलं म्हणून तरुणपणी कधीतरी दोन-तीन जणींच्या मागं लागला असाल, चावट बोलला असाल फार झालं तर किस, मिठीत घेणं, अंगाला अंग घासणं झालं आणि तिनं हात धरला तर पळून गेला असणार नक्की. त्यामुळं उठवळ बायकांवरचं तुमचं लिखाण आमच्यासारख्या वाचकांच्या विहिरीत उतरत नाही. म्हणजे तुमचा पोहरा फक्त दोरीनं खाली सोडला जातो. वर येताना पोहरा पूर्ण भरून येत नाही. कारण एकच तुम्हाला स्वतःला अनुभव नाही आणि असा अनुभव असलेला तळतळून सांगणारा तुम्हाला भेटलाच नाही. असं त्या कथा वाचून माझं ठाम मत झालं. आणि मी माझ्या आयुष्यात जे काही केलं, अनुभवलं ते तुमच्या कथेसाठी कामाला येईल, असं मला वाटू लागलं. भानगडींच्या भोवऱ्यात फिरून नावारुपाला आलेल्या, पेप्रात फोटो आणून घेणाऱ्या उठवळ बायका खरंच कशा असतात. त्या कशा पकडाव्या लागतात. आणि अशी बाई पकडल्यावर डाखाळलेया माणसाचं काय होतं. त्याला काय मिळतं, हे तुम्हाला सांगावं, असं वाटल्यानं तुमच्याकडं आलोय. तुम्ही म्हणत असाल तर थांबतो अन् सांगतो नाहीतर जातो.असं एकेका शब्दावर दाब देऊन म्हणत जनक जागेवरून उठू लागला.

थेट कुत्र्याशी तुलना केल्यानं शशीरंजन खरंतर संतापले होते. काय मुर्ख माणूसंय. माती मऊ लागली तर कोपरानं खणू लागलाय. याला सरळ उचलून बाहेर फेकलं पाहिजे’, असं त्यांचं एक मन सांगत होतं. पण मनाचा दुसरा भाग तयार नव्हता. त्यांनी डोळ्यानं इशारा करताच तो थांबला. त्याच्या चेहऱ्यावर किंचित हास्य दिसलं. पाण्यानं भरलेला ग्लास त्यानं स्वतःजवळ ओढला. आणि चक्क खिशात ठेवलेली दारूची बाटली काढली. घेणार का, असं शशीरंजन यांना खुणेनंच विचारलं. त्यांनी नकार देताच त्यानं क्षणाचीही वाट न बघता पेग भरला. एक घोट घेत खिडकीपाशी गेला. तिथं पाठ टेकवत म्हणाला,

फार वेळ घेणार नाही. माझ्याकडंही तेवढा वेळ नाहीये. म्हणून तुमच्यासाठी महत्वाचं तेवढं सांगतो. सांगण्याच्या ओघात काही राहिलंय, असं वाटलं तर नक्की विचारा. तुम्हाला माणसं जाणून घेण्यात स्वारस्य आहे. तसंच मलाही आहे. त्यात माझं वेगळंपण म्हणजे मला बाईच्या खूप खोलात शिरायला आवडतं. खूप खोलात. खरंच तिच्या मनाच्या अंतरंगात काय चाललं आहे. ती जे समोर दिसते. तशीच आहे का? की खूप सारे बुरखे पांघरले आहेत तिनं. हे उकरून, उकरून पाहणं, असा छंदच मला जडला. हा छंद असल्यामुळंच की काय प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा नाद असलेल्या काही बाया माझ्या आयु्ष्यात आल्या. त्यातल्या एकीबद्दल सांगणार आहे. एवढी बाटली संपेपर्यंत सांगून होईलच माझं. पण समजा ते नाही झालं आणि माझं सांगणं आवडलं. तर तुम्हाला बाटली मागवावी लागेल. अट फक्त एकच. मध्येच एखादा प्रश्न विचारून मला भरकटून टाकायचं नाही कळालंॽ मान्यॽ

एवढ्या तणावातही शशीरंजनना त्याच्या हक्क गाजवल्यासारखं बोलण्याची गंमत वाटली. 

नुकताच पाऊस पडून गेला होता. संध्याकाळ झाकोळून आली होती. ऑफिसमध्ये ते एकटेच होते. घरची मंडळी दोन दिवसांसाठी बाहेरगावी गेली होती. घर ऑफिसच्या वरच्याच मजल्यावर असल्याने उशिर झाला तरी चिंता नव्हती. एक अजब तरुण आलाय आणि काहीतरी बडबड करतोय तर करू द्या. आपल्यालाही दोन दिवस काही काम नाही. तो म्हणतोय तर एखादी कथा सापडेलही, असा विचार करून त्यांनी त्याला बोलणं सुरू करण्याचा इशारा केला. पंख्याचा वेग वाढवला आणि खुर्चीवर रेलून बसले. ते त्याच्याभोवती गुंतू लागलो अशी त्याला खात्री पटली असावी. त्यानं आणखी एक घोट घेतला. आणि संथपणे, घोगऱ्या आवाजात सांगणं पुढं केलं. 

॥ म ॥

माझी अन् चित्राची पहिली भेट त्या मेडिलाईफ हॉस्पिटलच्या उद्घाटन समारंभात झाली. चित्रा …. म्हणजे कुबेर चौकात जी दोन मजली बिल्डिंग आहे ना. निळ्या रंगाच्या काचा लावल्यात समोरच्या बाजूने आणि मोठा बोर्ड पण आहे बघा ... त्या ग्लॅम ॲडसची मालक. तुम्ही तर तिचं नाव ऐकून असालच. फोटो तर पाहिलेच असतील तिचे.

जनकच्या या प्रश्नावर शशीरंजन यांनी जोरात नकारार्थी मान हलवली. त्यांना   प्रसिद्ध बायकांच्या वलयात चित्रा नाव कुठंतरी ऐकल्यासारखं  वाटत होतं. पण नेमकं कुठं ते लक्षात येत नव्हतं. चेहरा तर नाहीच. त्यामुळं त्यांनी दोनदा नाही, नाही अशी मान हलवली. पण जनकचं त्याकडं लक्ष नव्हतं.  तो बारीकसारीक तपशीलानं तिच्याविषयी सांगू लागला होता.

 11

 ‘... तर डॉ. रेड्डीचं होतं ते हॉस्पिटल. मी काम करायचो त्या एजन्सीला मंडप, खुर्च्या, पिण्याचं पाणी आणि चहाची व्यवस्था करण्याचा ठेका मिळाला होता. उद्घाटन समारंभात हजार भर लोकांसाठीचा हा ठेका तिनं मिळवून दिलं होतं आमच्या मालकाला. दिवाकररावांना. मला कोणीतरी सांगितलं की, तिनं तो फुकटात दिलाय. अर्थात माझा विश्वास बसला नाही. कोणी कोणाला काहीही फुकट देत नाही, असं तत्वच आहे माझं. आणि तिला पाहिल्यावर तर अजिबातच विश्वास बसला नाही.

दारूच्या पहिल्या घोटाचा जनकच्या जिभेवर अजिबातच परिणाम झाला नव्हता. तो प्रत्येक शब्द तोलून मापून बोलत होता. त्यानं दुसरा घोट घेतला. पंख्याच्या वाऱ्याने फडफडणाऱ्या कॅलेंडरमधील एका बाईच्या फोटोकडं बोट दाखवत म्हणाला,

कोणालाही पहिल्या नजरेतच आकर्षक वाटेल. डोळ्यात भरेल अशा चेहऱ्याची नव्हती ती. मुळीच नव्हती. म्हणजे तेव्हा ... दहा-बारा वर्षांपूर्वी. खरं सांगायचं तर तिच्यात कोणी आरपार खेचलं जावं, असं काहीच नव्हतं. म्हणजे ... मला तसं सुरुवातीला वाटायचं. कारण रंग जवळपास सावळा. भुवया, नाक ठीकठाक. कपाळावर गोल, ठसठशीत कुंकू. गळ्यात अगदी जाडजूड मंगळसूत्र. खांद्याच्या बऱ्यापैकी खाली रुळणारे काळेभोर केस. त्यांचा कधी ती अंबाडा बांधायची कधी मोकळे सोडायची. वेणी फारच क्वचित. दात एका रांगेत, स्वच्छ पांढरे. पण ओठ जाडसर. पावाच्या लादीसारखे. त्याला नीट आकारच नव्हता. पण एक होतं हा ... अंगावर अजिबात जास्तीचं मांस नव्हतं. मान ताठ असल्यानं ती बऱ्यापैकी उंच वाटायची. साडी नेसलेली असूनही तिच्या मांड्या एकदम मजबूत. मांसाने गच्च भरलेल्या असाव्यात, हे पूर्ण लक्षात येत होतं. आणि  तिच्या डोळ्यात ना असा  एक वेगळाच जडपणा होता. दोन घोट दारुची नशा जढल्यासारखे जडावलेले होते ते. त्यामुळं तिनं एखाद्याकडं रोखून पाहणं म्हणजे त्यालाही नशा चढून जायची. 

सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिला ना खूप मोठी छाती आणि खूप मोठी हिप्स होती. कोणत्याही साधारण बाईला असतात त्यापेक्षा चांगली मोठी. गरगरीत. टप्पू. आणि चालताना ते दोन्ही हिप्स एकमेकांना जोरजोरात घासायचे. अन् समोरून पाहिलं तर बूब्स जोरजोरात हालायचे. हिप्स म्हणजे काय लक्षात आलं काॽ’ 

असा प्रश्न विचारण्यामागे शशीरंजन बोलणं ऐकतात की नाही, असाही त्याचा हेतू असावा. ते काहीच बोलले नाही. फक्त मिश्किल हास्य केलं. ते पाहून तो मोठ्यानं हसला आणि लगेच मुद्याकडं वळाला.

‘- हां ... तर त्या हॉस्पिटलच्या कार्यक्रमात तिची माझी पहिली भेट झाली. ती प्रमुख पाहुण्यांना भेटण्यासाठी आली असावी. डॉ. रेड्डींनी सिनेमातील कोणत्या तरी दोन साईड हिरोंना बोलावले होते. अर्थात चित्राच्या मदतीनंच रेड्डींनी या हिरोंना गाठलं होतं. तेव्हा तिची लगबग, धावपळ आणि पाहुण्यांना घेऊन येणं नजरेत भरण्यासारखं होतंच. पण त्याहीपेक्षा तिचं आत्मविश्वासानं चालणं, बोलणं उठून दिसत होतं. ती अगदी सहजपणे फिरत होती. एखाद्या जंगली, गुबगुबीत, केसाळ रानमांजरीसारखी. एवढ्या सगळ्या घोळक्यात आपण अनेकांच्या नजरेत खुपणाऱ्या, झिरपणाऱ्या बाई आहोत. मध्यरात्रीनंतर पाझरणाऱ्या आहोत, हे तिला पुरतं माहिती असावं. म्हणून ती अधूनमधून सर्वांवर नजर भिरभरवत होती. साडीचा पदर खांद्यावरून थोडासा खाली घसरवून उचलवत होती. ती आल्यापासून माझी तिच्यावर नजर होतीच. त्यात दोन-तीनदा ती काही फुटांवरून माझ्याजवळून गेली. तेव्हा तिच्या शरीराच्या काहीशा धुरकट, मादक गंधानं माझ्या अंगातून करंट फिरू लागला. तुमच्या लेखनशैलीत सांगायचं झालं तर ‘पहिलं एनकाऊंटर’ झालं.

रेल्वे इंजिनासारखा थडथडू लागलो. आपण तिच्याशी काहीतरी बोललं पाहिजे, जवळिक साधली पाहिजे, असं मन उसळी घेऊ लागलं होतं. पण काय बोलावं हे सुचत नव्हतं. बोलण्यासाठी शब्द फुटत नसल्यानं तिच्याकडं दुर्लक्ष करावं, असं एक मन वारंवार म्हणत होतं. दुसरं तिच्याकडं धावत होतं. मला वाटतं माझी ही अस्वस्थता चित्राला कळाली असावी. माझ्याकडं येत ती अगदी गोडव्यात, काहीशा अनुनासिक स्वरात म्हणाली,

तुमच्या एजन्सीनं खुर्च्या, टेबल आणि मंडपाचे किती रुपये लावलेतॽ काय रेटॽ

मोठे बुब्स, भलामोठ्या हिप्स, मादक गंधासोबत आवाजातील गोडवाही तिचं सामर्थ्य होतं. पुरुषांना खेचण्याची पॉवर होती, हे माझ्या लक्षात आलं. अजिबात ओळख नसतानाही अगदी हक्काच्या सुरातल्या तिच्या या विचारण्यानं मी थोडासा गांगरलो. कारण ती अगदी माझ्याजवळ ... अगदी एखाद्या इंचाच्या अंतरावर उभी होती. मी थोडासा झुकलो असतो तर तिच्या टप्पू बूब्सलाच चिटकलो असतो. हे तिलाही कळत होतं. पण तिला त्याची पर्वा नसावी. मी दचकून थोडा मागं सरकलो. आणि म्हणालो

नाही नाही ... मला काही माहिती नाही. भय्यासाहेबसरच बघतात ते सर्व. दिवाकरसरांचे मोठे चिरंजीव भय्यासाहेब. मी ... मी फक्त सामान इथं व्यवस्थित पोहोचलं का आणि कार्यक्रम संपल्यावर गोडावूनवर गेलं का, एवढंच बघतो. बाकी रेटचं काही नाही.

एखाद्या पौगंडावस्थेतील मुलाचे स्वप्नरंजन वाटावे, असं काहीसं हा पोरगा सांगतोय की काय, अशी शंका शशीरंजन यांना वाटू लागली. त्यामुळं त्यांनी त्याला 

अरे बाबा, पण माझ्या कथांचं ...असं म्हणून पाहिलं. तेव्हा जनकनं त्यांना हातानंच थांबण्याची खूण केली. आणि त्याचा तो किस्सा आणखी मोकळा करत म्हणाला,

माझं असं तुटक उत्तर चित्राला अपेक्षित नसावं. ती थोडी नाराज झाल्यासारखी वाटली. पण तिनं बोलणं थांबवलं नाही. उगाच दोन-तीन प्रश्न विचारलेच. कदाचित कार्यक्रम संपेपर्यंत काय करावं. तेवढाच टाईमपास, असं तिला वाटत असावं. पण मी एकदम अडकून पडल्यासारखा झाल्यानं ती निघून गेली.

तिच्या पाठमोऱ्या देहाकडे पाहत असताना तिचे मोठमोठाले हिंदकळणारे हिप्स माझ्या डोळ्यात खोल शिरले. तिच्या चालण्यात एक वेगळाच झोक आहे. ठुमक आहे. ती एखाद्या लाटेसारखी चालते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेंबी दिसत राहिल, अशी साडी नेसते. मधूनच डावा हात पोटाजवळ साडीत खुपसते आणि एक बोट घालून बेंबी उचलते, असं मला दिसलं. माझ्या डोक्यातले डाखाळलेले करंट दाट झाले. मांड्यामध्ये लहरी तरंगू लागल्या. शेगडी धगधगू लागली. आणि या बाईच्या खोलात जावंच लागेल, अशी जोराची उबळ मला आली. 

मी मांड्यामधील लहरींच्या आधीन जात असतानाच डॉ. रेड्डींचे दूरचे नातेवाईक, अकाऊंटंट कम् ॲडमिन ऑफिसर बाणेश्वरस्वामींच्या खाकरण्यानं भानावर आलो. पन्नाशीला पोहोचलेले स्वामी जनकच्या चांगल्याच परिचयाचे होते. तीन वर्षांपूर्वी ते हॉस्पिटल उभारणीसाठी डॉ. रेड्डींना मदत म्हणून खास विशाखापट्टणम्‌मधून आले. तेव्हा त्यांना भाड्याचे घर मिळवून देण्यासाठी जनकनंच धावपळ केली होती. त्यानंतर दोन-तीन वेळा स्वामींनी त्याला खास फ्रान्समधून आणलेली वाईन दिली होती. त्यांना दोन बायका होत्या. आणि हेही कमी म्हणून की काय त्यांनी अलिकडंच एकीजणीवर दोरे टाकून ठेवले होते. महिलांच्या गमतीशीर, चावट गोष्टी ते आवर्जून सांगत. प्रेमाच्या खेळात आपण पारंगत आहोत. आता इथं डॉ. रेड्डींची कडक नजर असल्यानं हॉस्पिटलमध्ये आणि या शहरात काही खेळ करत नसल्याचं ते सांगत. पण डोळा सगळ्यांवर अगदी बारकवाईनं ठेवत. मी नेमकं कोणाला शोधतोय हे त्यांना कळालं होतं तरी त्यानं विचारलंच,

अरे हिरो ... किसको ढूँढ रही है नजर...

अरे, कोणाला नाही ... असंच.माझी सारवासारव.

कशाला झूठ बोलता ... चित्रा नावंय त्या बाईचंतो कानापाशी येत कुजबुजला. मी त्याच्याकडं रोखून पाहिलं तर म्हणाला

खूप वजनवाली आहे. रेड्डीसाहेबांच्या गुड बुक्समध्ये आहे. त्यामुळं जपून.

अहो, बाणेश्वर कमालंच करताय. मी कशाला ...

साब ... तुमची एज आहेच हे सगळं करण्याची. ट्राय करा. फक्त मी जे ऐकलं ते सांगून ठेवतो. म्हणजे तुम्हाला काही कामाला आलं तर पहा.

माझी भीड चांगलीच चेपली होती. शिवाय बाणेश्वरस्वामी कोणाला काही सांगणार नाही, याची खात्री होती. मी विचारलं,

काय ते मोकळं सांगा ना... का तुमचं काही ...

अरे नाही. नाही. अपना कुछ नही. पण असं म्हणतात की ही बाई फक्त चालूपणाचा आव आणते. अनेक जणांसोबत नाव जोडलं गेलं तरी पर्वा करत नाही. पण कोणालाच स्वतःच्या अंगाशी जोडू देत नाही. अंगावर चढू देत नाही. नुसती खेळवत राहते.

हं ... असू शकतं.

लगेच माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला म्हणजे बाईनं तुम्हाला घायाळ केलंय

स्वामी काहीही बोलू नका. मला असं कोणी घायाळ बियाळ करू नाही शकत. तुम्हाला माहिती आहे आपण फार सेफ चालतो, अशा भानगडीत.मी त्रासिक स्वरात म्हटलं. त्यावर स्वामी मधाळपणे म्हणाले

एवढं नाराज होऊ नका. चांगली ओळख करून घ्या आणि ही बाई खरंच कशी आहे, याचा अनुभव घ्या ना.

अहो ... तुम्ही भलतंच काय बोलताय.

खरंच. करून तर पहा. म्हणजे शंका मिटून जाईल आणि जमलं तर काही रात्रींची सोय होऊन जाईल. काहीच झालं नाही तर बाईविषयी बोलतात ते खरं की खोटं हे तर कळलंच नाॽ ... पण घाबरत असाल तर सोडून द्या.

त्यांनी माझ्या वर्मावरच बोट ठेवले. 

यात घाबरण्यासारखं काय आहे. मला तर आवडतं असं कोणालाही शोधणं.

हा ... माझ्या लक्षात आलं ते. तुमच्या नजरेवरून कळालं. तुम्ही त्यांच्याशी बोलत असताना पाहत होतो मी. तुम्हाला जमून जाईल.

हं ... मला वाटतं की ती एवढी चालू नसावी. पुरुषांच्या जगात स्वतःचं जग निर्माण करण्यासाठी पुरुषांना हातभर दूर ठेवून वापरत असावी.

पण तसं असतं तर तिची चालचलवणूक एवढी मोकळी कशीॽ  आजकाल अशा ओपन बायका वाढल्या आहेत.बाणेश्वरांनी मनमोकळं होत शंका व्यक्त केली.

स्वामीसाहेब, मोकळ्या म्हणजे वापराच्या असं थोडंच आहे. आता आपणही एवढे मोकळे आहोत. म्हणजे काय भेटेल तर त्या बाईसोबत झोपतो काॽ

जनकभाई, माणूस अन् बाईत फार डिफरन्स. तिच्याजवळ गेल्याशिवाय कसा कळणार तुम्हालाॽ म्हणून एक चान्स घेऊन पहा. जवानीची मजा तर नक्कीच होईल.

वरवर बाणेश्वरांच्या बोलण्याला विरोध दाखवत असलो तरी आतून जनकला उकळ्या फुटत होत्या. चित्राकडं सरकण्यासाठी त्याला कोणाच्या तरी आधाराची गरज होती. स्वतःच्या मनाला समजावण्यासाठी एक निमित्त हवं होतंच. ते बाणेश्वर स्वामींनी मिळवून दिलं. 

॥ द ॥

काळोख दाटला होता. बाहेर नीरव शांतता होती. खोलीतला पंखा जोरजोरात फिरत होता. जनक सांगत होता. - चित्रा काही तेव्हा फार प्रसिद्धीच्या लाटेवर नव्हती. आता जशी महत्वाची झाली तेव्हा तसं काही नव्हतं. त्यामुळं आपलं हे छोटंसं शहर असलं तरी तिच्याविषयी कोणाकडून लगेच काही खात्रीलायक कळेल. तिच्याशी सलगी करता येईल, असं नव्हतं. म्हणून मी तिचा पाठलाग करायचं ठरवलं. अर्थात माझा पाठलाग मला वेळ मिळेल तेव्हा असतो. रोजच्या धबडग्यातून अर्धा, एक तास काढून मी मागं लागतो. त्या बाईशी काहीतरी निमित्त काढून बोलतो. किमान तिच्याभोवती एक चक्कर तर मारतो.जनक आता स्वतःचं कौतुक करत मोकळा होत चालला होता.

खरं तर चित्राच्या पाठलागासाठी खूप काही करण्याची योजना मी तयार करून ठेवली होती. त्याबद्दल नंतर कधी सांगेन. पण महत्वाचं म्हणजे तिचं ऑफिस शोधलं. तिच्या कामाचं वर्तुळ अभ्यासलं. त्यात आपल्याला कुठून शिरकाव करता येईल, याचं डोकं लावलं. तशी शिरकाव्यासाठी फार धडपडण्याची गरज पडली नाही. मालकांचा, दिवाकरसरांचा मुलगा भय्यासाहेबसर आणि चित्राचं व्यवसायातलं नातं फारच वेगानं पळत होतं.

त्या वर्षात त्यांनी एकत्रितपणे चार-पाच हॉस्पिटल, दुकानं, हॉटेलांच्या उद्घाटनाचे कार्यक्रम केले. आमच्या एजन्सीची जबाबदारी माझ्यावरच असल्यानं आमच्या भेटीगाठी होत गेल्या. ती गप्पांना फारच मोकळी होती. आणि बोलता बोलता चांगली अंगचटीला यायची. कधी कधी माझ्या छातीपासून बोटभर अंतरावर येऊन प्रश्न विचारायची. मला सुरुवातीला ते खूपच आवडलं. पण ती माझ्या मनोविहारात जास्त वेगानं फिरू लागली. तेव्हा असं वाटायचं ही आपल्याकडं ओढल्या जाण्यासारखं आपल्यात काय आहे. ना आपण पैसेवाले, ना आपलं घर. साधी दोन चाकाची गाडीपण नाहीये. बरं, दिसायलाही काही खास नाही. फक्त उंची चांगली आणि केस कुरळे. नाक, डोळे ठीकठाक. पण तेवढ्यावर तिला आपल्याबद्दल डाखाळल्यासारखं का वाटंल. ती खरंच अंगाला अंग लावू देते ... का उगाच वासनांना आव्हान देते. खोड्या का काढते, हे समजून घेणं मला वेटोळं घालू लागलं. बाणेश्वरस्वामींशी बोलणं आठवायचं. 

पण एक सांगू, मी कधी तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला तर ती लगेच थोडंसं मागं सरकायची. मला पूर्ण स्पर्श करता येणार नाही. चिटकल्यासारखं वाटेल पण चिटकणार नाही, याची पुरेपुर काळजी घ्यायची. त्यामुळे तिला जाणून घेण्याचं माझं कुतूहल वाढत चाललं होतं. ती नेमकी कशी आहे, हे समजलं नाही तर तो आपला पराभव आहे, असं वाटण्यापर्यंत अवस्था गेली. मात्र, तिच्या आणखी जवळ कसं जावं, हे काही उमजेना. बरं आपण काही बोलावं आणि तिनं ते भय्यासाहेबांना सांगितलं तर नसती भानगड व्हायची अशी भिती होती. शिवाय ही पडली बाई. इतक्या पुरुषांसोबत सहजपणे वावरणारी. तिच्यात मोकळेपणा असणारच. तो जाणून घेऊन आपल्याला काय मिळेल, असा प्रश्न पडायचा. बरं, आपण काही जास्त केलं आणि तिला आवडलं नाही तर एका फटक्यात आपल्याला आयुष्यातून उठवून टाकेल, असंही वाटत होतंच. शिवाय लोक तिच्याबद्दल खूप काही बोलत असले तरी त्यात पुरुषी, धंदेवाईक असूयाच असावी, असंही वाटत होतं. कारण काही महिन्यांमध्ये ती थोडीशी चर्चित महिला झाली होती. पेप्रामध्ये तिचं बऱ्यापैकी नाव येऊ लागलं होतं. अधूनमधून एखादा फोटो असायचा. काहीवेळा ती प्रमुख पाहुण्यांसोबत मंचावरही दिसायची. तिनं कुठंतरी भाषण ठोकलंय, असं कळायचं. त्यामुळं मी जवळपास तिचा पाठलाग करण्याचा नाद सोडून दिला होता. उगाच वेळ घालायचा नाही. त्यापेक्षा पोटापाण्याची नोकरी करून चारपैसे जमवायचे, असं ठरवू लागलो होतो. पण एका छोट्याशा घटनेनं सगळं बदलून गेलं.असं म्हणत जनक किंचित थबकला. मग खूप मागं गेल्यासारखे भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटले. तो म्हणाला,

तुम्हाला मी बोलण्याच्या ओघात सांगितलं की नाही मला आठवतं नाही. पण दोन व्यक्ती एकमेकांना जेव्हा भेटतात. बोलतात. स्पर्श करतात. एकमेकांपासून अंतर राखतात किंवा जवळ येतात. त्यावरून त्यांच्यातील नातं कळतं, हे तर तुम्हाला माहिती असेलच. पण या सोबत त्या दोन माणसांचं अंतरंगही कळू शकतं. अर्थात त्यासाठी खूप चांगली निरीक्षणशक्ती, अभ्यास लागतो. या दोन्ही गोष्टी कुठून कोणास ठावूक माझ्यात आहेत, असं मला कायम वाटत राहिलं.’ 

जनकवर दुसऱ्या घोटाचा अंमल बऱ्यापैकी चढला की काय, अशी शशीरंजन यांना शंका आली. म्हणून त्यांनी म्हटलं की

ती छोटीशी घटना सांगताय नाॽ तुमच्या आणि चित्राच्या स्पर्शाची. पहिल्या स्पर्शाची.

तसं तो खळखळून हसत म्हणाला,

काय साहेब, चेष्टा करताय का. मला चढलेली नाही. माझ्या बोलण्यात तिच्या आणि माझ्या स्पर्शाचा विषयच काढलेला नाही मी. मोबाईलवर रेकॉर्ड केलं असतं बोललेलं तर पुरावा आला असता समोर.

त्याच्या या हल्ल्यावर शशीरंजननी गडबडून म्हटलं

अहो, तसं नाही. तुमच्या आणि चित्राच्या नव्हतं ... चुकून माझ्या तोंडून निघून गेलं. माझ्या कथातील महिला ... तुम्ही आणखी एक पेग घेऊ शकता.आणि त्याच्यापुढं पाण्याची बाटली सरकवली. त्यानं माझ्याकडं रोखून बघत पेग भरला. आणि विचारलं,

तुम्हाला इंटरेस्ट येतोय नाॽ बाईच्या भानगडीत ...

होय ... होय तर. तसं नसतं तर मी पेगचा आग्रह धरला नसता.’ 

माझ्या या उत्तरानं तो खुश होत मिश्किल हसू लागला. 

साहेब, तुमच्या मनाला गुदगुल्या होऊ लागल्या आहेत. चित्रा नावाची बाई डोळ्यासमोर उभी राहू लागली आहे. म्हणजे उभी राहते आणि पुन्हा थोडी गायब होते ... होय नाॽ

हो ... हो ...’ 

आता तुमची जशी स्थिती झालीय ना ... तशी माझी त्या दिवसापर्यंत होती.’ 

माझ्या तोंडून चटकन कोणता दिवस ... असा प्रश्न पडलाच. त्यानं तो खुश झाला. आणि म्हणाला,

जितु आणि चित्राची भेट झाली माझ्यासमोर. त्या दिवसापर्यंत.’ 

जितु? ओह ... तुमचा मित्रॽ

नाही. नाही. मित्र नाही. ओळखीचा होता. कुठं अधूनमधून भेटलो तर आम्ही गप्पा मारायचो. चहा वगैरेही घ्यायचो. फक्त चहाच. तो सारखी बायकांवर नजर ठेवून असायचा. जाळ्यात ओढण्यासाठी. काहीजणींना तो भोगतो. दोन बायका तर नवऱ्याच्या नाकावर टिच्चून त्याच्यासोबत फिरत असतात, असं माझ्या कानावर होतं. त्यामुळं त्याच्याशी फार जवळिक साधणाऱ्या बाईमध्ये बारीकशी का होईना गडबड आहे, असं माझं बाईला जाणून घेण्याचं

अभ्यासण्याचं तंत्र सांगत होतं. 

तुम्ही जितुबद्दल काही सांगत होता नाॽ’ 

हो ... जितु ... तो एका फूड सप्लाय एजन्सीसाठी काम करत होता. दिसायला एकदम तगडा. मजबूत अंगपिंडाचा आणि तडाकफडाक बोलणारा. बुलेटवर फिरायचा. अस्सल ग्रामीण शिव्या हासडणारा. त्यामुळे बायांमध्ये त्याची एक इमेज तयार झाली होती. एकदा एका ढाब्यावर रात्रीच्या सुमारास मी त्याला त्या दोन बायांसोबत दारू पिताना पाहिलं होतं. माझी त्याची दोस्ती नव्हती अन् दुश्मनीही नव्हती. हां ... त्याच्याबद्दल कधीकधी असूया दाटून यायची. कारण तो बायांसोबत मोकळंढाकळं वागायचा आणि त्याही त्याला रिस्पॉन्स द्यायच्या. त्यामुळं त्याला रिस्पॉन्स देणारी बाई म्हणजे गडबड असा एक ठोकताळा माझ्या डोक्यात फिट होता.असं म्हणत त्यानं खिडकीबाहेर पाहत बोलणं सुरू केलं.

त्या दिवशी मी दुपारी असाच चित्रासोबत तिच्याच ऑफिसात गप्पा मारत बसलो होतो. म्हणजे मी काही बोलत नव्हतो फारसं. तिच बोलत होती. तिच्या नव्या कामांबद्दल आणि त्या कामात नवरा कसा इन्व्हॉल्व्ह झालाय ते सांगत होती. नवऱ्याविषयी सांगताना तिचा ऊर आनंदानं भरून आला होता. त्याचं उगाच जास्त कौतुक करतेय, असं माझं मत होत चाललं होतं. म्हणून मी तिला दुसऱ्या विषयाकडे वळवण्याचा प्रयत्न करत होतो. तेवढ्यात शिपायानं आत येऊन जितु आल्याची खबर दिली. व्हिजिटिंग कार्ड पाहून चित्राच्या चेहऱ्याचा नूर पालटला. ती एकदम शांत झाली आणि माझ्याकडं पाहून 

आणखी काय ... काय विशेषॽअसं म्हणाली. 

असं कोणी विशेषत: एखादी बाई तुम्हाला म्हटली ... बोलता बोलता गप्प बसली की तिला तुमच्यात फार स्वारस्य नाही. तिला तुम्हाला कटवायचं आहे. तुम्ही तिच्यासाठी अडचणीचे ठरत आहात, हे समजून घेतलं पाहिजे. तसं मी समजून घेतलं पण मला चित्रापासून लगेच ढळायचं नव्हतं. जितु आणि तिची काय भानगड हे कळण्यासाठी एवढा चांगला प्रसंग कधी चालून येणार नव्हता. त्यामुळं मी तिच्या किंचित त्रासिक चेहऱ्याकडं दुर्लक्ष केलं. शिपाई पुन्हा आला तेव्हा तिनं त्याला आत पाठवण्याची हातानं खूण केली. आणि काही सेकंदातच चेहऱ्यावरून थोडासा हात फिरवून घेतला. केस नीटनेटके केले. साडीचा पदर सावरला. ते पाहून एका सभ्य, मोकळ्या स्वभावाच्या महिलेकडं आपण किती वेगळ्या नजरेनं पाहतोय, असं वाटून माझं मन एकदम भरून आलं. पण हे भरून येणं पुढल्या एक-दीड मिनिटातच तुटून गेलं. 

मी दालनात बसलोय हे शिपायानं त्याला सांगितलं नव्हतं. चित्रालाही शिपायामार्फत तसा निरोप देणं शक्य झालं नाही. आणि मी पार्टिशनच्या अलिकडच्या सोफ्यावर असा काही बसलो होतो की दालनात येणाऱ्या कोणालाही मी पटकन दिसलोच नसतो. तसा जितुलाही दिसलो नाही. तो आत आला आणि त्यानं थेट चित्राच्या गळ्याभोवती मिठी मारली. तेव्हा त्याचे ओठ तिच्या कानाच्या पाळीला चिटकले होते. त्याच्या ओठांचा स्पर्श होताच तिनं दीर्घ श्वास घेत दाट डोळे मिटून घेतले. तो काहीतरी पुटपुटला. नेमकं काय ते मला कळालं नाही. पण गुड आफ्टरनूनच्या पलिकडं, त्यांच्यातील सांकेतिक असं काहीतरी म्हटला असावा. आणि काही सेकंद त्याची जीभ तिच्या कानाच्या पाळीला चाटू लागली. तिलाही कदाचित ते अनपेक्षित असावं. पण तिनं अजिबात विरोध केला नाही. उलट त्याचं तसं करणं तिला सुखावत असावं, असं मला वाटलं. बरं त्यानं ही चाटाचाटी इतकी झटपट केली की तिला ते स्वीकारण्याची संधीच मिळाली. तो एवढ्यावर थांबला असता तरी चाललं असतं. पण त्यापुढं जात त्यानं शेकहँडसाठी तिच्यापुढं हात केला. आणि तिला मी तिथं असल्याचा तिला विसर पडला किंवा माझ्या असण्या-नसण्याविषयी काही फिकीर नसावी. तिनं दिलखुलासपणे त्याच्या हातात हात दिला. बराच काळ ठेवला. शेवटी त्यानंच तिच्या हातातून सुटका करून घेतली. 

पण असं करण्यापूर्वी हाताचं मधलं बोट तिच्या तळव्यात शिरवून जोरात टोचलं, फिरवलं. जणूकाही तिच्या मांड्यामध्येच त्यानं जिभ टाकून फिरवली असावी. त्यानं ती एकदम शहारून गेल्यासारखी झाली. ती त्याच्या डोळ्यात डोळे घालून पहात राहिली. तिला कोणत्याही पुरुषाजवळ चिटकून उभे राहण्याची सवय, आवड होती. पण ती कोणाला इतक्याजवळ येऊ देईल आणि त्याच्याजवळ येण्यानं, वासनेत बुडालेल्या स्पर्शानं रोमांचित होऊन जाईल, अशी मी कल्पनाच केली नव्हती. बाणेश्वरस्वामींचं बोलणं डोक्यात घुमू लागलं. चित्राविषयी माझ्या मनात असलेली थोडीफार आपुलकी एका क्षणापेक्षाही कमी वेळात भस्मसात झाली. आणि त्याची जागा एका वेगळ्याच भावनेनं घेतली. 

भावना म्हणजे वासना? शारीरिक आकर्षण ... ’  शशीरंजन यांनी न राहवून म्हटलं. 

काहीसं खिन्नपणे हसत त्यानं डोळे मिटून घेतले. जणूकाही त्याला काही जुन्या आठवणी येत असाव्यात. त्यांना आवर घालत तो बोलू लागला. 

हं ... तुम्ही म्हणू शकता तसं. खरंतर मला तिच्याविषयी प्रचंड असं शारीरिक आकर्षण मुळीच नव्हतं. ती उपभोगाची आहे काॽ तिच्या चेहऱ्यावरला मोकळेपणा खरा आहे की त्या मागे काही पुरुषांच्या वापराचा खेळ दडलाय, हे आधी मला जाणून घ्यायचं होतं. तिचे काहीजणांसोबत संबंध आहेत, असं जे म्हटलं जायचं ते खरंय की खोटंय. आणि खरं असेल तर तिनं हा रस्ता का निवडला हे मला जाणून घ्यायचं होतं. आणि तुम्हाला सांगू नियतीनं बहुधा माझा रस्ता आखून ठेवला असावा. 

॥ क ॥

एका संध्याकाळी डोक्यात काही नसताना भटकत होतो. चालत चालत निघालो तर चित्राच्या घरी जावं का, असा विचार आला. आणि खरंच सांगतो. पाय अक्षरश: ओढत ओढत मला तिच्या घरासमोर घेऊन गेले. पण घराला कुलूप होतं. शेजारच्यांनी सांगितलं की, तिनं समोरच्या कॉलनीत नवं घर घेतलंय. छोटासा, टुमदार बंगला. एक मन म्हणालं की, कशाला जावं अशा स्थितीत. नवीन घरामध्ये नक्कीच पाहुणे असतील. तिचे किंवा तिच्या नवऱ्याच्या नातेवाईक, भाऊ-बहिणीची गर्दी असणार. आपण उगाच आगांतुकासारखे गेलो तर तिला अवघडल्यासारखं होईल. तिच्या नवऱ्याला तरी काय सांगणारॽ त्याला आपलं येणं खटकलं आणि त्यानं आवाज चढवत कशाला आलासॽ असं विचारलं तर काय उत्तर द्यावं. असा माझ्या मनात गोंधळ सुरू झाला. पण मी तो मोठ्या निकराने मागे ढकलला. चित्राजवळ जाणं, तिच्याशी सलगी वाढवणं, तिचं खरं रूप जाणून घेणं. तिच्या चेहऱ्याच्या आतला चेहरा, त्या चेहऱ्यावरील रेष न रेष पाहणं ही जणूकाही माझ्या आयुष्याची दिशा ठरली होती.  

तिला कोणत्याही परिस्थितीत भेटणं माझं ध्येय झालं होतं. अचानक तिच्यासमोर जाऊन उभं राहून तिला चकित करायचं होतं. म्हणून तिच्या नव्या घरी, टुमदार बंगल्याच्या दरवाजाजवळ जाऊन उभं राहिलो. आत खूप गर्दी आहे, असं वाटत नव्हतं. म्हणजे अगदी कोणीच नाही, इतपत शांतता होती. मला खूप छान वाटलं. चला पाहुण्यांची गर्दी नाही म्हणजे तिच्याशी थोडंसं बोलता येईल. बेल वाजवणार, तेवढ्यात आतून तिचा आवाज आला. मी कानाचा द्रोण करून ऐकू लागलो. ती तिच्या गोड पण ठाम स्वरात फोनवर बोलत होती,

साबळे, तुम्ही विचारलं होतं तेव्हाच मी साडेतीन लाखात होईल, असं म्हटलं होतं. तुम्ही फक्त अडीच दिले आणि एक नंतर देतो म्हणालात. त्याला चार महिने होऊन गेले. अजून एक हजारही मिळाले नाहीत. आँ ... ते काही नाही. मला चालणार नाही. तुम्ही पैसे दिले तरच पुढं काही होईल. शिक्षणाधिकाऱ्याची बदली म्हणजे चेष्टा वाटते काॽ सगळ्यांना वाटावे लागतात. मी काहीही ऐकून घेणार नाही. संध्याकाळी पैसे पाठवून द्या. पैसे आले नाही तर मला काम करता येणार नाही ... अडीच परतही देता येणार नाहीत.असं काहीसं म्हणत तिनं मोबाईल कट केला. आता घरात शांतता पसरली होती. खरं तर अशा वेळी कोणाच्याही घरात अनाहुतासारखं जाणं चुकीचंच. पण  तिचं हे पैसे वसुलीचं नवं रुप पाहण्याच्या लाटा माझ्या मनात उसळू लागल्या होत्या. त्यातल्या एका लाटेवर स्वार होऊन

मी बेल वाजवली. तसं तिनं पटकन दरवाजा उघडला. तिनं कॉलनीच्या बागेतील माळ्याला रोपटी सांगितली होती. तिला वाटलं तोच आलाय. पण समोर मी उभा पाहून ती गोंधळली. माझं काहीशा अनिच्छेनंच स्वागत करत

अरे, इकडं कसं काय ... या ... याअसं म्हणत तिनं सोफ्याकडं हात दाखवला. सिनेमाच्या टॉकीजमध्ये आपलं आवडतं सीट मिळाल्यासाखं मी सोफा पटकावला. एक खुर्ची ओढून ती बसली. मी नजर फिरवू लागलो. चांगलीच सजावट होती. डोळ्यात खुपेल इतकी कपाटे. त्यात चांदीची भांडी. तिच्या कंपनीला मिळालेले अवॉर्डस्. प्रमाणपत्रं. काही मोठ्या लोकांसोबतचे तिचे फोटो. भलामोठा टीव्ही. त्याच्या बाजूला उंची दारूच्या अर्धवट संपलेल्या तीन-चार बाटल्या. खरेदी केल्यापासून कपाटातच अडकलेली, धुळीच्या अस्तरातली अनेक पुस्तकं.  

माझ्या अशा येण्याचा तिला राग आला नसला तरी मी अनपेक्षितपणे धडकल्याने उडालेली स्वत:ची तारांबळ तिला पसंत पडली नव्हती. त्यामुळं तिनं लगेच थोड्याशा त्रासिकपणे आवरासावर करत, माझ्याकडं न पाहता बोलणं सुरू केलं.

अरे, आधी कळवायचं नाॽ किमान मोबाईलवर रिंग द्यायची होतीस. किती पसारा पडलायॽ कालच सगळे पाहुणे गेलेत. बोल कसा काय आलासॽ’ 

मी अनाहूत होतो. पण अपरिचित नव्हतो. त्यामुळं तिनं एकदम असं टोकाचं बोलणं मला आवडलं नाही. मी पण आवाजात ठामपणा आणत म्हटलं,

बंगला केव्हा घेतलाॽ केवढ्यातॽ काही खबरबात नाही. मार्केटमध्ये कुणाला माहिती नाही. एक दीड कोटीचा असेल ना हाॽ आणि मी कॉल करणार होतो तर तुम्ही कोणाशी तरी फोनवर बोलत होतात. बदलीसाठी एक लाख रुपये पाठवा असं म्हणत होता ...’ 

मी बहुदा वर्मावरच घाव घातला होता. जाहिरात एजन्सीचं काम करताना आपण राजकीय नेत्यांसाठीही काही उद्योग करतो, हे तिला लपवून ठेवायचं होतं. पण ते मला अगदी सहजपणे कळाल्याचं लक्षात येताच ती गडबडून गेली. आणि जणू काही घडलंच नाही, असं खोटं हसू चेहऱ्यावर आणत  लाडिक रागात म्हणाली,

काय तिखट कान आहेत तुमचे. पण असं कोणाचं बोलणं ऐकणं चांगलं नाही हां ... अहो, लोक काहीही कामं सांगतात. तुम्हाला तर माहितीय आपल्याला सगळ्या प्रकारच्या लोकांशी डील करावंच लागतं. जाहिराती एजन्सीचं जगच तसंय. त्यात आता माझ्या चार-पाच राजकारणी नेत्यांशी ओळखी आहेत. त्यांच्याकडून काम करून घेणं खूपच कठीण. पैसा लागतोच. पण काही जणांना पैसा दिला तरी काम करतीलच याची गॅरंटी नसते.तिचं बोलणं बडबडीकडं वळालं होतं. पैसा कमावण्यासाठी ती करत असलेल्या भानगडीवर तिला पडदा टाकायचा होता. मला शक्य तितक्या लवकर घरातून बाहेर काढायचं होतं. आणि मला आणखी काही वेळ घालवायचा होता. म्हणून मी चिवटपणे बसून राहिलो. हॉल, आतल्या बाजूच्या खोलीवर नजर फिरवून मी तिच्यावर डोळे आणले. 

आणि मला वाटलं की, आपण घरात आल्यापासून तिच्याकडं आधीच का पाहिलं नाहीॽ सुवर्णक्षण हातातून घालवलेत आपण. 

चित्रानं बऱ्यापैकी पारदर्शक गाऊन घातला होता. आत अक्षरश: काहीच नव्हतं. नेमका तिच्या खुर्चीच्या डावीकडं छतावर दुधाळ लाईट लागलेला होता. त्यामुळे तिचा चेहरा खूपच चमकदार दिसत होता. डोळ्यात जडावलंपण होतं. रात्री उशिरापर्यंत जागल्यासारखं. तिचे भलेमोठे छातीवरचे चेंडू आव्हान देत होते. अनेकांची नजर चाळवणारी तिची भली मोठी बेंबीही दिसत होती. त्यानंतर चड्‌डीचं संरक्षण घेतलेलं नव्हतं. मी आणखी खाली नजर आणली. एक क्षण वाटलं की तीकाय हा घाणेरडा, विकृत माणूसअसा विचार तिच्या मनात येईल आणि तो चेहऱ्यावरही उमटेल. तो पाहून आपणच आपल्या नजरेतून खाली पडू. पण तिला फारसा काय काहीच फरक पडला नाही. उलट तिनं गाऊन आणखी वर येईल अशी पायाची घडी बदलली. आणखी स्पष्टपणे स्तन पाहावेत, अशी व्यवस्था केली, असं मला ठामपणे वाटू लागलं. संधीचा फायदा घेत मी ते न्याहाळून घेतले. नकळत माझ्या पायाची घडी बदलली गेली. मला तिच्या आणखी जवळ सरकण्याची इच्छा होती. तसं मी मनात आणलेलं तिला कळालं. ओठांवरून जीभेचं टोक फिरवून मला आव्हान देत ती किंचित मागं सरकली. ते बरंच झालं. 

कारण आतून कुठलं तरी रागदारीतलं गाणं गुणगुणत रामदास आला. चित्राचा नवरा. रामदास. उंचापुरा. मजबूत शरीरयष्टी. बोलके डोळे. डोळ्यात एक मिश्किल हास्य. तरतरीत नाक. दिसायला तो चित्रापेक्षा दोन हात उजवा. एका हातानं दाट केसात कंगवा फिरवत होता. दुसऱ्या हातात काचेचा ग्लास. तो पाहून माझ्या चेहऱ्यावर उमटलेले भाव त्यानं अचूक ओळखले. मनमोकळं हसत म्हणाला

दारू नाहीये. आयुर्वेदाचा काढा आहे. दोन तीन दिवसांपासून कफ झालाय. हे घरातलं सामान हलवाहलवीमुळं धूळ उडाली खूप. कफ कमी होतो या काढ्यानं. फ्रेश होतं. घेणार का? घेऊन टाका.’ 

त्याचं असं आपलेपणानं, मित्रत्वाचं बोलणं ऐकून मी वरमलो. वाटलं आपण या बाईबद्दल असा वासनेत लडबडलेला विचार करतोय आणि हा आपल्याशी किती छान बोलतोय. मग मी निघायची घाई केली. चित्राला तेच हवं होतं. तिनंघर आवरल्यावर निमंत्रण देईन मी. काही महत्वाचं काम असेल तर ऑफिसवर भेटू.असं म्हणण्यामागं घरी येऊ नको आता, असंच तिला सुचवायचं होतं. पण माझं तिच्या बोलण्यापेक्षा पुन्हा शरीराच्या चढांकडे होतं. मी नाईलाजानं सँडल चढवलं. चित्रानं दरवाजा जोरात लोटून घेतला. मी दोन चार पावलं टाकली. आणि पायात एक जबरदस्त कळ आली. सँडल आणि अंगठ्याच्या मध्ये टोकदार खडा अडकला होता. मी वाकून खडा काढू लागलो तोच पुन्हा चित्राचा आवाज कानावर येऊ लागला. मी चटकन चोरट्यासारखा खिडकीला लागून असलेल्या झाडामागे उभा राहिलो. चित्राचा वाढलेला आवाज स्पष्टपणे ऐकू येऊ लागला होता. बऱ्यापैकी दिसतंही होतं.  

‘‘दोन रात्र आले नाही. म्हंजे कोणातरी सोबत झोपलेच, असं आहे काॽ नवऱ्याला न सांगता घराबाहेर पडलेली बाई म्हंजे रस्त्यावरची. गेलेली. पार वाया गेलेली. बाजारबसवी. ... होय नाॽ वीस वर्षात हीच किंमत ठेवलीय ना तु माझीॽ कोणी असा रस्त्याने चाललेला, थोडासा ओळखीचा पुरुष असला तर त्याला स्वतःकडे ओढून घेते मी. नादाला लावते. फिरवते. त्यांच्या शरीराला झुलवते, असंच म्हणायचंय ना तुलाॽ पण ते तु कधी स्पष्ट शब्दात बकत नाहीस. घुळघुळ करत राहतोस.’’ 

एका संथ लयीत ती रामदासवर नजर रोखून विचारत होती. जणूकाही आधीच मलूल होत चाललेल्या त्याच्यातल्या पौरुषत्वाला प्रत्येक शब्दानिशी तुडवत होती. छतावरचा पंखा जोरजोरात फिरत होता. आलिशान बंगल्यातल्या भल्या मोठ्या खिडकीतून वाराही सोसाटत होता. त्यामुळे सारखे उडणारे, चेहऱ्याला वेटोळे घालणारे केस आवरत ती बोलत होती. रात्रभर कमालीचं जागरण झाल्यानं तिचे डोळे पेंगुळले असावेत. पण त्याच्याशी बोलणंही महत्वाचं असल्यानं तिनं झोप काही वेळासाठी मागे ढकलली असावी. खरं तर दोन दिवसांपूर्वी साडी घालून ती बाहेर पडली. पण पँट, शर्ट घालून कशी आलीॽ कोणी खरेदी करून दिलेॽ महत्वाचं म्हणजे साडी कोणी फेडली, असंही विचारणं रामदासच्या जिभेवर आलं असावं. पण तिचं विलक्षण थंडपणे बोलणं, नजर रोखणं त्याला असह्य झालं होतं. बरं, तिच्याशी अजून काही बोलणं म्हणजे वाद वाढवणं. तिनं धाय मोकलून रडणं, त्रागा करणं, काम थांबवणं, बोलणं बंद आणि पुन्हा आपल्याकडून काहीतरी कबूल करून घेणं या पलिकडं काहीही नसल्याचं त्याला अनुभवावरून कळालं असावं. म्हणून सोफ्यावर आडव्या पडल्यापडल्या त्यानं आणखी एक उशी घेत तोंडावर धरली. 

रामदासनं चेहरा लपवल्याची खात्री करून घेत तिनं एक मोठा सुस्कारा सोडला. त्यानं शरणागतीचे पहिलं निशाण फडकवलं होतं. अलिकडं तो शरण येण्यास फार काळ लावत नाही, हे तिच्या पुन्हा एकदा लक्षात आलं. 

‘‘यापुढे असं काही फालतू बोललेलं मला चालणार नाही हां. कामाच्या निमित्ताने दहा लोकांना भेटते. काहीजणांसोबत रात्री बाहेर जाते म्हणजे त्यांच्याखाली झोपते असं होत नाही. कळालं काॽ यापुढे तुझं असं बोलणं मुळीच खपवून घेणार नाही,’’ असं म्हणत तिनं तिथंच एका झटक्यात गाऊन उतरवला. आणि माझे डोळे विस्फारले. चित्राच्या चेहऱ्यात फारसा दम नसला तरी कपड्याविना तिच्या शरीराचे उभार आणखीनंच मोठे, चमकदार दिसत होते. खूप वर्षांपासून भुकेजल्या समोर एकदम ताटभर पंचपक्वान्न आल्यासारखी अवस्था झाली. हेच अन्न अनेक वर्ष खाणाऱ्या रामदासचीही नजर उभारावरून फिरली. वीस वर्षांपूर्वी होते तसेच आहेत. लोक हिचा इतक्या पुरुषांसोबत संग आहे असं म्हणतात. पण त्या संगाचा तिच्या उभारांवर फार काही फरक पडलेला नाही, असा भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटला. आणि पाठोपाठ आपल्याला तिच्यात आता खरंच काही स्वारस्य राहिलेलं नाहीये, असंही त्याचे ओठ पुटपुटले. त्याची पुटपुट तिला नजरेतूनच कळाली. आणिपुन्हा याचा लुटुपुटीचा प्रतिकार मोडून काढला. आता महिनाभर तरी नादी लागणार नाही,’ असा विचार करत ती बाथरूमकडे वळाली. आतून शॉवरचा जोरात आवाज येऊ लागला. 

मी जिथं उभा होतो ती खिडकी बाथरुमजवळच होती. तिची आंघोळ पाहण्याची इच्छा मनात धडका मारू लागली. मी थोड्या टाचाही उंचावल्या. पण कोणाच्या तरी येण्याची चाहूल लागली. आता जास्त थांबणं धोक्याचं आहे, एवढं समजण्याइतका मी हुशार आहेच. म्हणून गाऊनविना दिसलेली चित्रा डोळ्यात साठवत झटपट निघालो.

॥ ड ॥

आठवणींच्या तळघरात खूप काळजीपूर्वक दडवून ठेवलेली, खूप आवडती अन् मनाला गुदगुल्या करणारी एक खूप मोठी गोष्ट सांगून संपल्यासारखा जनक थांबला. या गोष्टीबद्दल, विशेषतः चित्रा, रामदासबद्दल मला काय वाटतंय हे त्याला जाणून घ्यायचं असावं. पण माझी तेवढी तयारी नव्हती. चित्राचे काही फोटो, बातम्या मी पेप्रात पाहिल्या होत्या. एक-दोनदा लोकल टीव्ही चॅनेलवरही अंधुकशी दिसली होती. त्यामुळे मी तिचा चेहरा डोळ्यासमोर कुठं दिसतो का, याचा शोध घेऊ लागलो. 

तेवढ्यात जनकनं विचारलं, पेन्सिल आहे तुमच्याकडंॽ मी टेबलच्या कोपऱ्याकडं डोळे दाखवले. त्यानं तेथून पेन्सिल उचलली. आणि कागदावर फिरवली. मिनिटाभरानंतर कागद उंचावला. त्याचं चित्र काढण्याचं कौशल्य बऱ्यापैकी होतं. तो म्हणाला,

असे उभार आहेत तिच्याकडं. एवढे मोठे. संपत्ती आहे तिची ती. रात्रभर अनेक रात्री पूर्ण तिच्या नुसत्या उभारात अडकून पडू शकतो आपण. आणि हो तिच्यात कमालीचा आत्मविश्वास आहे. खूपच. एखाद्याकडं जेव्हा ती भरभरून काजळ लावलेल्या डोळ्यांनी टक लावून बघते. तेव्हा त्याला झपकन स्वत:कडं खेचते. आता तुम्हीही एक नजर मी काढलेल्या या चित्रावर टाका. दूधाची तहान ताकावर.मिश्किल हसत त्यानं तो कागद माझ्या हातातून घेतला. मधाळलेल्या नजरेनं न्याहाळून घडी घालून खिशात टाकला. आणखी एका पेगची त्याला गरज असावी. पण त्यासाठी माझ्या मदतीची गरज राहिली नव्हती. त्यानं स्वत:च पेग भरला. घोट घशाखाली उतरवला. 

पुढं काय झालं, असं विचारलं नाहीत तुम्हीॽ

तुम्ही सांगालच ना. का सांगायचं नाहीये.

हं ... तुम्ही एकदा चित्राला भेटायला हवं होतं. पण जाऊ द्या. वेळ निघून गेलीय. तिच्याबद्दल मीच सांगतो सगळं. ती नेमकी कुठून या शहरात आली. देखण्या रामदासनं सुमार दिसणाऱ्या या पोरीला बायको म्हणून कसं स्वीकारलं ते सांगतो. म्हणजे तिच्याशी काही वेळा गप्पा मारताना, एकदा तिच्या मूळ गावी गेल्यावर तिच्या खास मैत्रिणीशी बोलल्यावर आणि काही भानगडबाज लोकांकडून मी ते खोदूनखोदून मिळवलं. सांगू?’

हो ... हो त्यासाठीच तर मी इथं असा बसलोय ना.

गुड. तर चित्राचं गाव कुशापूर. खळखळ वाहणारी नदी. दोन-तीनशे वर्षांपूर्वी कोणत्या तरी सरदारानं दोन्ही बाजूंनी घाट बांधले. साऱ्या शहराचं वैभव म्हणजे ही नदी आणि घाट. संध्याकाळची चाहूल लागताच अख्खा घाट पिवळसर सूर्यप्रकाशात भिजून जायचा. ते पाहून घाटावर पाय पसरून बसलेली चित्रा हरखून जायची. तिला वाटायचं किती भाग्यवान आपण. इतकं विस्तीर्ण, लांबलचक पसरलेलं नदीचं पात्र. स्वच्छ, नितळ पाणी. गावात बाकीच्या हजार भानगडी असतील पण नदीचं न् घाटाचं पावित्र्य कायम ठेवलं होतं गाववाल्यानं. 

हे पावित्र्य ठेवण्यात तिचे बाबा विष्णुकांत आणि भाऊ रमेश, निलेशचा मोठा वाटा होता. तिचं एका गिरीराज नावाच्या चित्रकार, कवीसोबत प्रेमप्रकरणही होतं. पण तो पोऱ्या बेरोजगार. कामधंद्याची शाश्वती नाही. म्हणून तिची मैत्रिण उमानंच ते प्रकरण मोडून काढलं. पुरुषाची कर्तबगारी महत्वाची असती. दिसण्याला कसा आहे, याला फारसं महत्व नसतं. रामदास सोबत चित्रानं लग्न करावं, अशी समजूतही त्या उमानंच घालून दिली. उमाचं म्हणणं होतं, कथा, कविता, सिनेमा, कादंबरीतलं जग आणि खरं जग यात फार फरक असतो. लग्नासाठी साधा सरळ मुलगाच पाहिजे. म्हणजे पोरीच्या ऐकण्यात राहतो. रामदासच्या जाहिरात एजन्सीमध्ये तुला स्वत:ला डेव्हलप करून घेता येईल. त्याच्या वडिलाचं त्या शहरातल्या राजकारणातही थोडंसं वजन आहे. त्याचाही तुला उपयोग होऊ शकतो. हे सगळं पाहिलं तर त्याचं शिक्षण, दिसणं याकडं तु फार लक्ष देऊ नये. तुला मर्जीप्रमाणं वागता येईल. एकदम मोकळेपणाने. नवऱ्याला मनासारखं हवं तसं फिरवता येणं, यात एक वेगळंच सुख असतं. ते मिळवायचं असंल तर हे रामदासचं स्थळ एकदम बेस्ट आहे. त्याचा बाप काही फार जगणार नाही. हा पोरगा तुझा फोटो पाहून आधीच पागल होऊन जाईल. स्वतःचं घर, जाहिरात एजन्सी, बऱ्यापैकी पैसा. बघ पुन्हा एकदा विचार कर.कविता करून, नाटकं लिहून पोट भरत नाही. किराणा दुकानावर नोकरी मिळवून तुझं पोट भरायला गिरीराजला पाच वर्ष लागतील. त्या पेक्षा रामदास दिसायला तुझ्यापेक्षा बराच चांगला आहे. आणि शिक्षणात कमी असला तरी सेटल्ड आहे. तुझे वडिल - अप्पा आता उतारवयात आहेत. त्यांच्याकडून तुला सांभाळणं शक्य होणार नाही. आणखी काही वर्ष अशीच पडून राहिलीस तर ... उमाचं एवढं कठोर बोलणं ऐकून चित्रा रात्रभर धुमसून, धुमसून रडली. पण रडण्याचा काही उपयोग होणार नाही. कोणीही मदतीला धावून येणार नाही, असं तिच्या लक्षात आलं. सकाळी तिनं वडिलांना होकार कळवून टाकला. 

॥ इ ॥

त्या जुनाट शहरातल्या अति जुनाट वाड्यात पहिलं पाऊल ठेवताना चित्रा थरथरून गेली. कोणत्या तरी पुरातन संस्कृतीत आपल्याला आता आयुष्य काढावे लागणार, या विचारानेच ती अर्धमेली झाली. आणि उरलेला अर्धा प्राण रामदाससोबत पहिली रात्र घालवताना गेला. दिसायला उजवा असला तरी पुरुष म्हणून याच्यात फारशी  चव नाही. आतमध्ये शिरण्याऐवजी उगाच अंगाशी झोंबतोय. असं तिला वाटू लागलं. हे तिचं वाटणं पुढं कायम राहिलं. अगदी गंधालीचं जन्म होऊन ती कॉलेजात जाऊ लागेपर्यंत. मधल्या काळात अनेक पुरुष भेटले. वेगवेगळ्या चवीचे. गंधाचे. शरीराचे. असं सांगत जनकनं खुर्चीवर बसकण मारली. 

आता मी तुम्हाला जे सांगतो ते जास्त कान देऊन ऐका. म्हणजे तुम्हाला गरज पडली तर तुमच्या कथेत टाकता येतील’, असं सांगत त्यानं कहाणी पुढच्या पानावर नेली. 

चित्राच्या आयुष्यात एका पाठोपाठ एक पुरुष येण्याची सुरुवात रामदासनंच करून दिली. उमानं सांगितलं होतं तशी त्याची जाहिरात एजन्सी होती. शहराच्या मध्यवस्तीत मोक्याच्या ठिकाणी. स्वतःच्या जागेत. अल्फाबेट ॲडस्. पण त्यासाठी काम मिळवण्यात त्याला फारसा इंटरेस्ट नव्हता. त्या छोट्याशा गावात तशी फार संधीही नव्हती. पण गाव वाढत चाललं होतं. वाढणार होतं. ते लक्षात घेऊन हातपाय हलवायला पाहिजे, असं चित्राला वाटत होतं. पण हा तर काहीच हलवत नाही. हातपाय काय हलवणार, हेही तिच्या लक्षात आलं. त्यातच तो हिंदुत्ववादी संघटनेचं काम करू लागला. वह्या पुस्तकं वाटणं, झाडं लावणं, कोणाला अँब्युलन्स मिळवून दे, अशी छोटी कामं करू लागला. त्याचा परिणाम एजन्सीवर होऊ लागला. क्लाएंटस् बोंबा ठोकत घरी येऊ लागले. तेव्हा वैतागलेल्या अण्णांनी नाईलाजानं तोंड उघडलं. म्हणाले,

तु असा उडाणटोळासारखा फिरत राहशील तर उद्या हिला भुकं मारशील. आता हिलाच काम बघू दे. एजन्सीच्या ऑफिसची जागा हिच्या नावावर करून टाकतो. नावही बदलून टाकू.’ 

कशालाच फारसा विरोध करायचा नाही, असा रामदासचा स्वभाव होता. जबाबदारीचं ओझं नकोच होतं. म्हणून त्यानं अजिबात खळखळ केली नाही. उलट उत्साहात जाऊन प्रॉपर्टी नेम चेंजिंगचा फॉर्म उत्साहात घेऊन आला. ऑफिसच्या किल्ल्या चित्राच्या हातात दिल्या. तिला पहिल्या दिवशी स्कूटरवर सोडूनही आला. स्टाफमध्ये दोन तरुण मुली छाया, रेखा आणि दोन उत्साही मुलं प्रदीप, रत्नाकर होती. पन्नाशीकडं झुकलेले पण नवं काही करण्याची उमेद असलेले गोटेकाका होते. आणि सारखी पळापळ करण्यास तयार असलेला शिपाई अंबर. चित्रानं सगळ्यांची मिटिंग घेतली. पण मुख्य खुर्चीवर स्वतःऐवजी गोटेमामांना बसवलं. दोन्ही मुली, मुलांचे म्हणणं तर एकदम शांतपणे ऐकून घेतलंच. पण अंबरलाही आग्रह करून करून बोलायला लावलं. सगळ्यांची एकच मागणी होती. नवीन काम आणि थोडी पगारवाढ. घरून थोडासा अभ्यास करून आलेल्या चित्रानं एका क्षणात ते मान्य करून टाकलं. आणखी दोन महिन्यांनी सर्वांना पगारवाढ मिळेल. पण हे दोन महिने सतत काम करावं लागेल, अशी अट घातली. ती सर्वांनी टाळ्या वाजवून मान्य केली. पहिल्याच दिवशी चित्रानं वातावरण बदलून टाकलं. ग्लॅम ॲडस् असा बोर्ड लागला. त्या छोट्याशा गावातील जाहिरातीच्या दुनियेत एका महिलेचं मालक म्हणून आगमन ही मोठीच बातमी होती. चार न्यूज पेपरमध्ये आणि राजकारण्यांच्या वर्तुळात ती जणूकाही आगीच्या वणव्यासारखी पोहोचली. तिला भेटण्यासाठी गर्दी वाढली. जुने, तुटलेले आणि नव्यानं मार्केटमध्ये आलेले जाहिरातदार वाढीव दराने काम घेऊन आले. त्या पाठोपाठ अफवांचे पेव फुटले. त्यातल्या सगळ्या अगदी झाडून पुसून सगळ्या चित्राच्या चारित्र्याबद्दल होत्या. महिनाभरात त्या चित्रापर्यंत स्टाफमार्फत पोहोचल्या. छाया आणि रेखा, प्रदीप आणि रत्नाकरनं वेगवेगळ्या वेळात चित्राची भेट घेऊन अफवा काय आहेत, याची माहिती दिली. त्यांना वाटत होतं की मॅडम चिंताक्रांत होतील. घाबरतील. पण तसं काहीच झालं नाही. उलट चित्रा प्रत्येक अफवा ऐकून खळखळून हसत होती.

एकदा एखादी बाई पुरुषांच्या जगात उतरली की, तिला हे भोगावंच लागणार. तिच्या चारित्र्याची सालपटं काढली जाणारच. त्यामुळं तुम्ही माझी काळजी करू नका. मन लावून काम करत राहा.अशा शब्दांत तिनं गोटेमामांनाही समजावून सांगितलं. त्याचवेळी एखाद्या अफवेबद्दल रामदासनं विचारावं, असा विचार तिच्या मनात आला. पण तसं काही घडलं नाही. ती जणू त्याच्या दुनियेत राहिलीच नव्हती. खरं पाहिलं तरनवऱ्याचा बायकोवर किती गाढ विश्वासअशी समजूत करून घेणं सोपं होतं. पण तिला ते लगेच शक्य झालं नाही. मात्र दोन-तीन वर्षांनी पूर्ण चित्रच बदलून गेलं. एका पाठोपाठ एक पुरुष तिच्या आयुष्यात धडकू लागले. 

सुरुवात मनजितसिंगनं झाली. तो शहरातील मोठा रस्त्यांचा ठेकेदार होता. एक मंत्री आणि  दोन अधिकाऱ्यांच्या लपूनछपून भागीदारीत उड्डाणपुल बांधायचा. शिवाय त्याची दारूची दोन दुकानं होती. एक लेडीज बार होता. वयाच्या पन्नाशीत असला तरी त्याच्या चेहऱ्यावर, हालचालीत वयाचा मागमूस नव्हता. शब्दांच्या खट्याळ करामती करणं त्याला फार आवडायचं. पैसा कमावणं आणि उधळणं त्याचा शौक होता. त्याची बायको दिलप्रीत दोन मुलींमध्ये मग्न होती. तिला मनजितचा किंचित बाहेरख्यालीपणा मान्य होता. बाहेरची बाई बाहेरच पटवेल. बाहेरच मौज मजा करेल आणि त्या बाईला बाहेरच सोडून आपल्याकडं येईल, यावर दिलप्रीतचा ठाम विश्वास होता. रेल्वे पुलाच्या उद्घाटनाची कुठल्याशा सरकारी एजन्सीनं दिलेली जाहिरात नेमकी कशी झालीय बघण्यासाठी पाच-सहा वर्षांपूर्वी मनजीत पहिल्यांदा चित्राच्या ऑफिसमध्ये गेला. तेव्हा दिलप्रीतसोबत होती. चित्राच्या वागण्याबोलण्यातला आत्मविश्वास, सहज वावर, कामावरील पकड पाहून ती खुश झाली. या छोट्याशा शहरात असं काम करणारी बाई तिनं यापूर्वी पाहिली नव्हती. मनजीतला मात्र फार काही वाटलं नाही. हिची छाती आणि मागचा पुठ्ठा खूपच मजबूत आहे, असं नोंदवून तो जाहिरातीचं प्रिंट आऊट पाहण्यात मग्न झाला होता. त्यात एक-दोन दुरुस्त्या सुचवून तो बाहेर पडला. जाण्यापूर्वी त्यानं बिल ॲडव्हान्स दिलं. एक लाख तीस हजार रुपये. पण एवढ्यावरच तो थांबला नाही. जाहिरात चांगली झालीय असं म्हणत दोन्ही आर्टिस्टच्या हातात एक-एक हजाराची बक्षिसीही कोंबली. तेव्हा चित्राचे डोळे चमकले. पैसा तिच्यासाठी अत्यंत प्रिय गोष्ट होती. त्यात जर एक दिलखुलास, उंचापुऱ्या, तगडा पुरुष पैसा बाळगून असेल तर तिच्यासाठी ते महत्वाचं होतं. अर्थात त्यांची पहिली भेट एवढी छोटी आणि काहीच न घडलेली होती. पण पुढील महिनाभरात नव्या जाहिराती देणं आणि जुनी बिलं देण्याच्या निमित्ताने चार वेळा त्याला तिच्याकडं जावं लागलं. त्यातील चौथ्यांदा तर ऑफिसमध्ये ती एकटीच होती. मनजीतनं डोळ्यातून इशारा केला. तेव्हा ती आधी रागावली. संतापली.

मी काय तशी बाई वाटले काॽ तुमची हिंमतच कशी झाली असा विचार करण्याची. मला वाटलं की तुम्ही सभ्य माणूस आहात. म्हणून मी तुमच्याशी चांगलेपणाने बोलले तर तुम्ही त्याचा गैरअर्थ काढला. पैसेवाले आहात म्हणजे काहीही विकत घेऊ शकता, असं वाटणाऱ्याला मी चपलेनं मारत असते’, असंही म्हणाली. एवढी आग ओकूनही मनजीतवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. आधीच मिश्किल असलेले त्याचे डोळे आणखीनच खेळकर झाले.

तुम्ही मला कायमसाठी आवडल्या आहात. कधीही अंतर देणार नाही. आता अंतर ठेवू नका.असं तो तिच्या किंचित जवळ जात म्हणाला. त्यावर तिला हसू फुटलं.चा s s लू मर्दअसं लाडिकपणं पुटपुटत ती आतल्या खोलीत निघून गेली. दरवाजा जोरात लोटून घेण्यापूर्वी तिनं साडीचा पदर खांद्यावरून ओढला. पण असं करताना आपली बऱ्यापैकी उघडी पाठ मनजीतच्या नजरेत खोलवर बसेल, याची काळजी घेतली. 

मग त्या छानपैकी सजवलेल्या खोलीत दोघांनीही दहा-पंधरा मिनिटं एकमेकांना खूप दमवलं. मनजीतनं तिच्या शरीरातील एकही भाग जिभेच्या स्पर्शाविना ठेवला नाही. सगळीकडं नुसतं चाटत सुटला होता. चित्राला वाटलं जणूकाही ती एखाद्या जादूनगरीत फिरतेय. मनजितच्या मांडीवर बसून ही भटकंती वर्षानुवर्षे चालत रहावी, असं तिला वाटत होतं.

लग्नानंतरच्या काही रात्री वगळल्या तर रामदासमुळं उपाशी राहिलेली चित्रा तुटून पडली होती. त्यानंही तिला मनसोक्त जेवू दिलं. ताटात भरभरून वाढलं. बाहेर पडताना पन्नास हजाराचं पुडकं टेबलावर ठेवलंच. शिवाय चार मोठ्या जाहिरातींची कामंही दिली. हेही कमी पडले म्हणून की काय तो म्हणाला की, माझ्याकडं आठ कार आहेत. मला तीन आणि बायकोला दोन पुरे पडतात. त्यामुळं एक कार पाठवून देतो. वाटेल तेवढी वापर. तु नवीन घेशील तेव्हा ही पाठवून दे. चित्रा दिलदारीनं हरखून गेली. साफ बुडाली. काय बोलावं, काय म्हणावं तेच तिला कळालं नाही. या सगळ्याच्या मोबदल्यात हा किमान पाच-सात वेळा तरी आपल्याशी खेळेल असं तिला वाटलं. पण तसं काही घडलं नाही. त्याची दुसऱ्या राज्यात कामं सुरू झाली. मग परदेशातही गेला. त्यानं विचारपूस केली नाही किंवा तु मला फोन का केला नाही, असंही चित्राला विचारलं नाही. जणूकाही तो सगळं विसरून गेला. एकदा शहरात आल्यावर तिनंच खूप आग्रह करून त्याला बोलावून घेतलं होतं. तेव्हा पुर्वीच्याच आवेशानं तो तिच्याशी खेळला. तिला वरपासून खालपर्यंत भिजवलं. स्वतःही भिजला. आणि निघून गेला. जाताना पुन्हा पैशाचं पुडकं ठेवण्यास विसरला नाही. मात्र, नंतर तो त्याच्या स्वभावानुसार नव्या मैत्रिणींच्या गोतावळ्यात चित्राला विसरून गेला. तिलाही त्याच्यात कायमस्वरूपी अडकायचं नव्हतं. 

कारण 

पैशासोबत ती एक कर्तृत्ववान बाई असल्याचं सगळ्या जगाला सांगणारा निरंजन तिला भेटला होता. साडेपाच फूट उंची, बसकं नाक, मजबूत हाडापेराचा अन् खांद्यापर्यंत आलेल्या दाट  कुरळ्या केसांचा तो तरुण भलताच करामती होता. थेट नेपाळमधून कागद आणून पेपरवाल्यांना पुरवण्याचा त्याचा धंदा होता. त्यामुळे शहरातल्या सर्व मोठमोठ्या संपादकांशी त्याची घसपट होती. महिन्यातून एकदा कोणत्या ना कोणत्या कारणानं रात्री पार्टी आयोजित करायचा. त्यात ज्या संपादकाला जी दारू आवडते. त्या दारुच्या किमान चार बाटल्या असायच्या. गाण्याची मैफल आणि दारूचा पूर यात संपादक पूर्णपणे बुडून जायचे. काही तर रात्रभर हिरवळीवरच लोळायचे. त्यांना पहाटे उचलून हॉटेलातील खोल्यांमध्ये आणि सकाळी घरी पोहोचवणे अशी कामं तोच करायचा. सर्वाधिक खप असलेल्या पेपरच्या संपादकांना स्वत: घरी नेऊन सोडवायचा. त्यानिमित्तानं त्याच्या संपादकांच्या कुटुंबांशीही परिचय होत गेला. त्यांच्यासाठीही तो कधीकधी पार्ट्या भरवायचा. कधी बाहेरगावी सहलीवर घेऊन जायचा. दिवाळी, नव्या वर्षाला साडी, मिठाई आणि घरगुती उपयोगाची वस्तू हमखास द्यायचा. आणि या मोबदल्यात त्याच्या ट्रॅव्हल्स, इलेक्ट्रिक वायर सप्लायसारख्या चार-पाच धंद्यांना संरक्षण मिळवायचा.  

एकदा तो संपादक शिखरेंच्या केबिनमध्ये गप्पा झोडत बसला होता. तिथं त्यांचे जाहिरात मॅनेजर देवरत्ने आले. त्यांना पाहून तो निघू लागला. पण त्यांनी त्याला आग्रह करून थांबवले. ते म्हणाले,

अहो, असं काय करताय. तुम्ही काय परके थोडीच आहेत. आमच्या दैनिकाच्या कुटुंबातील एक आहात. आता मी जे काम घेऊन आलोय संपादसाहेबांकडे ... त्यात तुम्हीही सहभागी होऊ शकता. 

त्यांचा एवढा आग्रह पाहून शिखरेंनीही डोळ्यांनी इशारा केला. त्यामुळं निरंजन निवांतपणे बसला. त्याला त्यावेळी कल्पनाही नव्हती की पुढील दहा मिनिटात त्याच्या आयुष्यात काही महिन्यांसाठी एका अजब स्त्रीचं आगमन होणार आहे.

देवरत्नेंनी एक महिला गौरव पुरवणी काढायचं ठरवलं होतं. शहरातल्या एकवीस कर्तृत्ववान महिलांचे प्रोफाईल पानभर फोटोसह छापायचे. त्यांचा एखाद्या हॉटेलात जंगी सत्कार करायचा. रात्री पार्टी करायची. या साऱ्या मोबदल्यात महिलेकडून पन्नास हजार रुपये काढायचे. सगळा खर्च जाऊन कंपनीला पाच लाख रुपये फायदा होईल. असा त्यांचा प्लॅन होता. चांगलं काम करणाऱ्या, थोडीफार प्रसिद्धी मिळालेल्या एकोणीस महिला त्यांनी शोधल्या होत्या. दोघीजणी तुमच्याकडून मिळतील का, अशी विचारणा करण्यासाठी ते शिखरेंकडे आले होते. प्लॅन नीटपणे ऐकून घेतल्यावर ते म्हणाले, यादगार स्टुडिओचा मालक संजयकुमार माझा जवळचा मित्र आहे. त्याच्या बायकोचं प्रोफाईल करता येईल. तुम्ही माणूस पाठवून पैसे घेऊन टाका. मी कोणाला तरी सांगून त्यांची मुलाखत, फोटोही करून घेतो. संपादकांनी एवढ्या झटपट मदत केल्याने खुश झालेले देवरत्ने म्हणाले, व्वा साहेब. मानलं. आता आणखी एका महिलेचं नाव सांगून टाका. त्यावर शिखरेंनी बराच विचार केला. पण त्यांच्या डोळ्यासमोर कोणी येईना. मग ते निरंजनकडे पाहत म्हणाले

एक हा देईल. निरंजन. एवढा सगळीकडं फिरत असतोस. तुझ्यापण एखाद्या जवळच्या मित्राची बायको, बहिण, वहिनी असेल ना सामाजिक कार्यात.

अचानक अंगावर आलेल्या कामानं गडबडलेला निरंजन म्हणाला

आँ... एवढ्या अर्जंटॽ

देवरत्ने मदतीला धावले.

दोन दिवस घ्या. तुम्ही फक्त नाव सुचवा. बाकी आम्ही बघून घेऊ. नाही म्हणू नका. माझं काही नाही. संपादकसाहेबांचा शब्द वाया जाईल.

अशी गळ घातल्यानं नकार देणं शक्यच नव्हतं. पण अशी महिला आणायची कुठून असाही प्रश्न होताच. अखेर बघतो, करतो, असं म्हणत तो ऑफिसच्या पायऱ्या उतरला. महत्वाचं काही काम असेल तर ते डायरीत टिपून ठेवण्याची त्याची सवय होती. त्यानुसार त्यानं डायरी काढली. आणि खिसा चाचपडला. तर पेन नव्हता. च्यायला, असं पुटपुटत त्यानं नजर फिरवली. तर समोर नव्यानंच सुरू झालेलं  पेनाचं दुकान होतं. हे बेस्टच, असा विचार करत तो दुकानात शिरला.

कॉलेजातली दोन तीन पोरं पोरी सोडलं तर फार गर्दी नव्हती. दुकानमालक निवांत होते. निरंजनला ते ओळखतही होते. त्यामुळं त्यांनी मनापासून स्वागत केलं. दोन गरमागरम चहाची ऑर्डर दिली. आणि देशी-विदेशी बनावटीच्या पेनांचा नुसता पाऊस पाडला. चहाचे घोट घेत त्यातील काही निवडत असतानाच आपल्या आजूबाजूला घमघमाट पसरला. कोणीतरी अत्तर शिंपडतंय, असंच त्याला वाटलं. त्यानं वळून पाहिलं तर चित्रा आत आली होती. आल्या आल्या तिनं मालकांना – ‘हाय’, असं म्हटलं आणि जणूकाही निरंजनसाठी मांडलेले पेन तिच्यासाठीच आहेत, अशा अविर्भावात ती ते न्याहाळू लागली. आणि असं करताना तिचं त्याच्याकडं अजिबात लक्षही नव्हतं. दुकानातला एखादा कर्मचारी अशीच गणना ती करत असावी. 

त्या दिवशी ती बरीच नटून थटून निघाली होती. परफ्युममध्ये बुडालेली, डोळ्यात घट्ट काजळ, चमकी लावलेली काळी साडी, स्लीव्हलेस ब्लाऊज. त्यातही पाठ चांगलीच, वीतभर उघडी. सतत घसरणारा पदर. दर मिनिटाला केसात बोटं फिरवून ते उगाचच नीट बसणार नाही, याची ती काळजी घेत होती. कुठल्यातरी समारंभाला निघाली होती. तिथं भेट देण्याकरता पेनसेट खरेदी करायचा होता. थोडासा महागडा. म्हणून तिनं दुकानमालकांना आवाज उंचावूनदोन हजार, दोन हजारअसंही म्हटलं. आकडा ऐकून तो चकित झाला. एवढा महागडा पेन घेणारी ही कोण, असा प्रश्न त्याला पडला. तो तिला निरखून पाहू लागला. ते तिच्या लक्षात आलं. तिनं त्याच्याकडं हलकी नजर फिरवली. आणि काऊंटरवर दोन हजाराच्या नोटा ठेवून निघून गेली. 

चित्रा मॅडम आहेत त्या. ग्लॅम ॲडसच्या मालक.मालकांनी त्याच्या ज्ञानात भर टाकली. आणि त्यांना पळायचंय हरणासारखं पण पावलं पडतायत मुंगीची.अशी त्याचे डोळे चमकवणारी माहिती जोडली. त्याला आता वेळ घालवायचा नव्हता. संपादक शिखरे, देवरत्नेंना खुश करण्यासोबत चारचौघांचे लक्ष खेचणाऱ्या चित्राशी थोडंसं बोलता येणार, याचा त्याला आनंद झाला. खरंतर त्यानं कधी तिला पाहिलं नव्हतं. तिच्याबद्दल ऐकलंही नव्हतं. ग्लॅम ॲडस् नावाची एक एजन्सी आहे, हे मात्र त्याच्या कानावर पडलं होतं. दुकानमालकांनी त्याचा चेहरा वाचला. त्याच्या खिशाला पेन लावत ते म्हणाले,

तुमचं काही काम असंल तर संध्याकाळी चारनंतर असतात त्यांच्या ऑफिसवर. रात्री साडेआठ वाजेपर्यंत भेटू शकता.

अं ... हं ... थँक्यू अभयराव. मॅडमना हरणाच्या पावलानं पळायला मदत करूयात.

त्याला दुसऱ्या दिवशीच्या चार वाजेचे वेध लागले होते. रात्री दोन पेग घेताना आणि पलंगावर लोळताना त्यानं दहा वेळा चित्राचा चेहरा डोळ्यासमोर आणला. आणि इकडं चित्राला त्याची गंधवार्ताही नव्हती. निरंजन नावाचा एक नवा मित्र आपल्या जीवनाच्या दरवाजावर धडका देतोय, हे तिला माहितीच नव्हतं. अर्थात त्याची चौथ्यांदा भेट होईपर्यंत.

असं म्हणून जनक थांबला. ‘नुसती किती वेळ प्यायची. थोडा चकना पण पाहिजे ना. काहीतरी मागवा’, असं म्हणाला.

एखाद्या इंटरेस्टिंग गोष्टीत सहज शिरणं आणि त्यातून बाहेर पडण्याची जबर शक्ती त्याच्याकडं होती. त्याला सॅल्यूट करत शशीरंजन म्हणाले,

‘मागवायसाठी कोणी नाही इथं. तुम्ही सांगा काय हवं ते. मी प्रयत्न करतो.’

काहीशा नाराजीच्या, अविश्वासाच्या सुरात तो म्हणाला, ‘काजू पाहिजेत आणि तिखट लावलेले खारे फुटाणे. मिक्स.’  

ओठापर्यंत आलेलं हसू थांबवत त्यांनी टेबलाचं एक ड्रॉवर उघडलं. त्यातून पांढरी शुभ्र, नक्षीदार प्लेट काढली. दुसऱ्यातून काजू, फुटाण्याची पाकिटं काढून त्याच्यासमोर ठेवली. एखाद्या खंड्या पक्षानं अलगद तळ्यातून मासा उचलावा तशी त्यानं ती उचलली. खिशातली किल्ली काढून पाकिटांची तोंडं मोकळी केली. चार-पाच दाणे तोंडात टाकून तो चघळू लागला. मी आता तो पुढं काय सांगतो, याकडं शशीरंजनांचं लक्ष लागलं होतं. त्यानं फार काळ ताणलं नाही. लागोपाठ दोन घोट घेऊन तो जुन्या आठवणी उलगडून लागला.

तर आपला हा गडी निरंजन माझ्याही बऱ्यापैकी ओळखीचा होता. तो पोहोचला चित्राच्या ऑफिसला नेमकं त्या दिवशी मी पण एका कंपनीचा लोगो तयार करण्यासाठी तिथंच होतो. त्यानं पेप्रात तिची मुलाखत छापायचं म्हटलं तर ती एकदम खुश झाली. मात्र, पैशाचा विषय काढताच गप्प झाली. तो तयारीनंच आला होता. त्यानं थेट ऑफरच ठेवली. 

‘मॅडम ... एवढा मोठा पेपर आहे. तुमचीही ये-जा आहे तिथं. पण तुम्ही कधी स्वतःच्या जाहिरातीच विचार केला नाही. तो आता करा. पैशाचं सोडा. तीन महिन्यात पेमेंट केलं तरी चालेल. ते माझ्यावर सोडून द्या. तुम्ही फक्त होकार द्या. बाकीचं मी बघून घेतो.’ 

शहरातील सर्वाधिक खपाच्या पेप्रात आपला भला मोठा फोटो. सोबत आपल्या कर्तृत्वाची माहिती. प्रसिद्ध झाल्यावर त्याचे काय पडसाद उमटतील. आपल्या एजन्सीला किती फायदा होईल, याचा अदमास ती घेऊ लागली. सौदा फायद्याचा आहे, असं तिचं मन सांगत होतं. पण पैसे खर्च करण्याची तिची तयारी नव्हती. एवढा पैसा कशासाठीॽ या प्रश्नाचं उत्तर तिला मिळत नव्हतं. त्यामुळं थोडासा निश्चय करून ती त्याला म्हणाली,

सॉरी, सध्या तर काही शक्यता नाही. आणि माझी स्वतःची एवढी ॲड एजन्सी आहे. मीच लोकांची प्रसिद्धी करते. नवनवे प्लॅटफॉर्म मिळवून देते. त्यांच्यासाठी पत्रकार परिषदा भरवते. मला प्रसिद्धीची काही गरज नाही. जेवढी आहे, तेवढी पुरेशी आहे. तो पुढं काही बोलण्याच्या आत तिनं हात जोडले. तेव्हा तिच्या चेहऱ्यावर निरोप घेण्याचे भाव होते. तो मोठ्या नाराजीनं बाहेर पडला. मग माझ्याकडं वळत ती म्हणाली,

‘काय भयंकर माणूस आहे हा. फारशी काही ओळख नाही. कुठं तर म्हणे त्या पेनच्या दुकानात भेट झाली होती. मला तर काही आठवतच नाही. बरं, प्रपोजल काय तर म्हणे पेप्रात पानभर जाहिरात.’

मी तिच्या होकाराला होकार दिला. तिनं त्याला कटवल्याचा मला बराच आनंद झाला होता. उगाच पैसा खर्चून प्रसिद्धी मिळवण्याला माझाही विरोध होता. त्याचं व्हिजिटिंग कार्ड पर्समध्ये टाकत ती पुढं म्हणाली,

‘उगाच प्रसिद्ध होऊन काय करायचं. म्हणजे प्रसिद्धी नको असं नाही. पण आपलेच पैसे देऊन आपणचॽ हां. कोणी आपल्यासाठी खर्च केले तर खरी प्रसिद्ध व्यक्ती असल्याचं वाटेल नाॽ तुला काय वाटतं.ॽ’

मला ते काही पटलं नाही. पण तरीही का कोणास ठावूक मी तिच्या  होकारात होकार मिसळून टाकला. मग ती इतर कामात गुंगून गेली. तिनं तिच्यापुरता विषय संपवून टाकला, असं मला वाटलं. पण ते खरं नव्हतं. आठ-दहा दिवसांनी मी सकाळी उठून पेपर हातात घेतला तर धक्काच बसला. चित्राची खूपच आकर्षक छबी आणि तिची पानभर माहिती होती. तिचं शिक्षण, तिनं केलेली सामाजिक कामे, तिच्या आवडी-निवडी असं बरंच काही होतं. रामदास किंवा घरच्या कोणाची एक ओळही नव्हती. त्या दिवशी तर पैशाची कुरकुर करत होती. बहुधा नंतर तिनं निर्णय बदलला. निरंजननं तिला पटवलं असणार, असं दिसलं. दुसराही एक अंदाज माझ्या मनात भरधाव घोड्यासारखा उधळून गेला. 

महिनाभर उलटून गेला. त्या महिनाभरात आणखीही चार - पाच छोट्या पेप्रात चित्राच्या जाहिराती झळकल्या. सोबत काही मुलाखतीही होत्या. ते मला चांगलंच खटकलं होतं. कारण एकतर त्या मुलाखतीत काहीही दम नव्हता. उगाच आरती ओवाळलेली होती. ती एवढी हुशार नव्हती. तिचं सामाजिक भान जेमतेम होतं. कुटुंबाविषयी तिला किती ओढ होती, हे मला माहिती होतं. पण मुलाखतीतून वेगळंच दिसत होतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दोन पेप्रात तिचे फोटो काहीसे बोल्ड स्वरूपातले होते. म्हणजे ती केसातून हात फिरवताना कॅमेऱ्याकडं खट्याळपणे टक लावून बघतीय, असे ते फोटो होते. खासगी अल्बममधले होते ते. पेप्रात तिच्या मर्जीशिवाय छापून येऊ शकत नाही. तिनेच ते पेपरवाल्यांना दिले, हे तर उघड सत्य होते. माझ्या तोंडात कडवट थुंकी जमा झाली. महिनाभरातल्या मधल्या कुठल्या तरी रविवारी एका मोठ्या, पंचतारांकित हॉटेलात जंगी समारंभ झाला. त्यात चित्राला एका राज्यमंत्र्याच्या हस्ते पुरस्कार मिळाला. प्रेरणादायी तरुण महिला व्यावसायिकअसं काहीतरी नाव होतं. पुरस्कार घेतानाचाही भलामोठा फोटो छापून आला होता. तिला जाहिरातीपेक्षा पुरस्काराचं आकर्षण वाटलं असावं. त्या फोटोतही तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळेच भाव असावेत, असे वाटलं. 

असेच काही दिवस गेले. माझ्या डोक्यातून चित्रा, तिच्या जाहिरातीचा विषय बऱ्यापैकी निघून गेला. प्रसिद्धीच्या मागं लागलेल्या बाईचा पाठलाग करणं धोकादायक असं मला वाटू लागलं. पण पुन्हा एकदा सांगतो की, नियतीनंच माझा प्रवास ठरवला असावा.

जनकचे डोळे आता चकाकू लागले होते. त्याला जे काही आठवत होतं ते अतिशय स्पष्ट दिसत असावं. एखाद्या सिनेमातला प्रसंगासारखं. तो बारीकसारीक अगदी किरकोळ तपशीलासह प्रसंग रंगवून सांगू लागला.

‘सिंचन विभागातले एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर तरडेसाहेब तुम्हाला माहिती आहेत नाॽ त्रिलोक कॉलनीत राहतात. मोठ्ठा बंगला आहे पहा. लेफ्टसाईडला. अंगणामध्ये बांबूची झाडं आहे. तुमची कदाचित भेटही झाली असेल नाॽ’

माझ्या होकार नकाराची वाट न पाहता त्यानं रेल्वे भरधाव सोडली. ‘मूळ परभणीचे राहणारे. घरची प्रचंड गरिबी. आई-वडिल शेतमजूर, पाच भाऊ, सात बहिणी असं मोठं खटलं. पण माय-बापाची जिद्द की पोरांना शिकवून मोठं करायचं. सगळीच पोरं-पोरी हुशार निघाले. शिक्षक, वकिल झाले. काही राजकारणात गेले. तरडेसाहेब इंजिनिअर झाले. तुम्हाला सिंचन विभागातला कारभार माहिती आहे. त्यातल्या रॅकेटमध्ये मिसळावेच लागतं. जो मिसळत नाही, त्याला आयुष्यातून उठवलं जातं. पण गेल्या पाच-पन्नास वर्षात असा कोणी निघाला नाही. सगळे मिसळून जातातच. तसं तरडेसाहेबही गेले. थोडे जास्तच गेले. थेट मंत्र्यापर्यंत त्यांची उठबस सुरू झाली. कोणी तक्रार करू नये म्हणून त्यांनी चार-पाच संघटनांचे नेते हाताशी धरले. दरवर्षी त्यांना विशिष्ट रक्कम पोहोचवू लागले. चाळीस लाखाच्या जागेवर दीड कोटीचा बंगला उभा केला. पंचवीस-तीस एकर जमिन झाली. तीन-चार आलिशान गाड्या आल्या. पण एवढ्या मोठ्या ऐश्वर्याचा उपभोग घेण्यासाठी एकच मुलगी. म्हणजे त्यांना दोन मुलं आहेत. पण त्यातल्या एकाचं मानसिक संतुलन बिघडलेलं. तर दुसऱ्याच्या पायावरून लहानपणीच वारं गेल्यानं त्याला नीटपणे चालता येत नाही. त्यामुळे तरडे नवरा-बायकोचा सारा जीव मुलीत म्हणजे संजनामध्ये गुंतलेला. ती देखील चांगली हुशार. इंजिनिअरिंगच्या तिन्ही वर्षात विद्यापीठातून पहिली आली. ती आधी सिंचन विभागात अभियंता म्हणून काम करेल. आणि काही वर्षात कलेक्टर होईल, असं ठरलंही होतं. पण वर काही वेगळंच ठरलं. तरडे तर काही देव वगैरे मानत नव्हते. त्यांचे सगळे जीवन देवाचं, नियतीचं अस्तित्व नाकारण्यात गेलं होतं. तर झालं असं की, एक दिवस संध्याकाळी तरडेसाहेबांचे कोणी दूरचे नातेवाईक त्यांच्या दोन-तीन तरुण मुलांना घेऊन आले होते. त्यांनी नवीन भारीची जीप खरेदी केली होती. संजना नुकतीच कार चालवायला शिकली होती. भल्या मोठ्या टायरची, उंचीपुरी, परदेशी बनावटीची जीप पाहून संजनाला मोह पडला. तरडेसाहेबांना सांगून, नातेवाईकाची परवानगी घेऊन त्यांच्या तीन मुलांसोबत ती जीपची ट्रायल घेण्यासाठी बंगल्याबाहेर पडली. कॉलनीत पाच-सहा राऊंड झाल्यावर तिला आणखी लांब कुठंतरी जावंसं वाटू लागलं. म्हणून तरडेसाहेबांनीच विद्यापीठात चक्कर मारून ये, असं म्हटलं. तेव्हा त्यांना पुढे काय भयंकर घडणार याची कल्पना नव्हती. संजनानं विद्यापीठाच्या विस्तीर्ण रस्त्यावर गाडी घातली. तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते. सगळीकडं शुकशुकाट होता. पण तिनं वेग वाढवला नाही. सोबतची पोरं आग्रह करत होती तरीही ती ठाम राहिली. मग सोबतच्या रोहननं तिला चिडवलं

काय ताई, एवढी भारीची जीप. दीडशेच्या स्पीडनं चालतीय. तुला चाळीसनं चालवायची तर मोटारसायकलच घ्यायची ना.

ते ऐकून संजनानं ॲक्सिलेटरवर कचकन पाय दिला. गाडीनं एकदम तुफान वेगानं धावू लागली. पोरं खुश होऊन टाळ्या पिटत असतानाच पुलावारून अचानक दोन म्हशी रस्त्याच्या मध्यभागी आल्या. ते पाहून गडबडलेल्या तिला काय करावं  तेच सुचलं नाही. तिनं म्हशींना वाचवण्यासाठी गाडी रस्त्याखाली घातली. नुकत्याच होऊन गेलेल्या पावसामुळे खूप चिखल झाला होता. त्यात चाकं वेडीवाकडी झाली आणि जीप उलटली. तरडेसाहेबांचं दुर्दैव असं की, फक्त तीच जीपबाहेर फेकली गेली. तिचं डोकं एका भल्या मोठ्या झाडाच्या खोडावर आपटून फुटलं होतं. सोबतच्या पोरांना अगदीच किरकोळ मार लागला होता. जीपचं अगदीच शुल्लक नुकसान झालं होतं. तरडेसाहेबांची मुलगी अपघातात जागीच गतप्राण झाल्याची बातमी पाहता पाहता सगळीकडं पसरली. मी तेव्हा एका लग्न समारंभाचं काम आटोपून आलोच होतो. तेव्हा भय्यासाहेबसाहेब तरडेंकडेच निघाले होते. सिंचन विभागातील सभा, समारंभाचा चहा, जेवण, नाश्त्याचं काम आमच्याकडंच होतं. त्यामुळं माझी तरडेसाहेबांची थोडी ओळख झाली होती. ज्या मुलीवर ते सर्वाधिक विसंबून होते. तीच गमावल्यानं त्यांच्यावर किती भयंकर संकट  कोसळलंय, याची जाणिव होऊन मी शहारून गेलो. त्रिलोक कॉलनीत पोहोचलो. तरडेंना भेटल्यावर बंगल्याबाहेर असाच उभा थिजून उभा राहिलो. 

रात्रीचा एक-दीड वाजला होता. मला झोपेची झापड येऊ लागली होती. सकाळी अंत्यसंस्कार किती वाजता आणि कुठं होतील, याची माहिती घेऊन मोटारसायकल काढली. आणि गल्लीतून बाहेर पडताना आत शिरणारी भलीमोठी कार पाहून माझी झोप कुठल्याकुठं पळाली. आधी माझा माझ्या डोळ्यावर विश्वास बसला नाही. वाटलं आपण काहीतरी चुकीचं पाहतोय. एका चेहऱ्यासारखा दुसरा असू शकतो. पण तसं नव्हतं. मी जे पाहत होतो तेच खरं होतं. वास्तव होतं. 

गाडीत चित्रा आणि निरंजन होते. साडीचा पदर छातीवरून घरंगळला होता. केस विस्कटलेले. जणू काही कोणीतरी केसात बोटं फिरवलीत. आणि बोटं फिरवता फिरवता जवळ खेचलंय. निरंजनच्या काहीतरी विनोदी बोलण्यावर ती जोरजोरात खिदळत होती. उसळत होती. गाडीत ड्रायव्हर असल्याचं, बाहेरून कोणी आपल्याला सहज पाहू शकतं. आपण कोणाच्यातरी सांत्वनासाठी चाललो आहोत. तरुण मुलगी गमावलेल्या बापाच्या भेटीला चाललो आहोत, याचं भान तिला नसावं किंवा ते ठेवणं तिला गरजेचं वाटलं नसावं.

मी घाईघाईनं माझी गाडी पुन्हा परत वळवली. बंगल्यापासून काही अंतरावर मुद्दाम अंधारात थांबलो. कारमधून चित्रा-निरंजन उतरले. आत चालत गेले. दहा मिनिटांनी बाहेर पडले. तेव्हा तिच्या चेहऱ्यावर आपण एवढ्या रात्री परपुरुषासोबत असल्याची कोणतीही भावना नव्हती. उलट एका सुरक्षित कोशात असल्यासारखा तिचा चेहरा होता. पथदिव्याच्या उजेडात मी तिच्याकडं निरखून पाहू लागलो. तेव्हा तिनं निरंजनकडं अतिशय खट्याळ कटाक्ष टाकला. गाडीत पुन्हा बसताना त्याच्या अंगाला अंग लावलं, असं मला ठळकपणे जाणवलं. गाडी गल्लीबाहेर पडताना दोघे पुन्हा खिदळत होते. जणूकाही एखाद्या लग्न समारंभाला हजेरी लावून परत जात असल्यासारखं त्यांचं वागणं होतं. एक मन वाटलं की, तिला अशाच अवस्थेत थांबवावं. भर रस्त्यात रोखावं.एवढ्या रात्री का आलीस आणि याच्यासोबत का फिरतेसअसं विचारावं. पण ते मी टाळलं. कारण तिला असं विचारण्याचा अधिकार रामदासला आहे. नवरा म्हणून त्यानंच तिला ताब्यात ठेवलं पाहिजे. खरंतर गाडीत निरंजनऐवजी रामदास हवा होता. पण तोच ते करत नसेल. आपली बायको एवढ्या मध्यरात्री अशा अवस्थेत फिरत असेल. परपुरुषाच्या अंगाला अंग घासत असेल. पदर नीट घेण्याचंही भान मुद्दाम ठेवत नसेल तर आपण तिला कशासाठी बोलावं, हा प्रश्न होताच. शिवाय तिचा पाठलाग करण्याचा माझा पुन्हा निश्चय झाला होता. निरंजनसारख्या पैसेवाल्यासोबत ती चार रात्री घालवत असेल तर तिनं त्याच्यासोबतचं नातं आपल्याला उघड करून सांगितलं पाहिजे, असा नवाच भुंगा माझ्या डोक्यात उडू लागला. पुढल्या महिनाभरात या भुंग्यानं डोकं पार पोखरून टाकलं. कारण चित्रा प्रसिद्धीच्या दुनियेवर आरुढ होऊ लागली होती. कधी कुठल्या क्लबमध्ये अपंगांना सायकल वाटप, कधी गरिबांना धान्य देणे, कुठं ब्लँकेट वितरण अशा तिच्या बातम्या फोटोसह येऊ लागल्या होत्या. दिवसेंदिवस ती अधिक बोल्ड दिसू लागली होती. आधी खांद्यापर्यंत असलेले केस तिनं आणखी कापून टाकले होते. त्यामुळं ती बरीचशी पुरुषी दिसू लागली होती. अर्थात कोणत्याही पुरुषाशी अतिशय जवळ जाऊन त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलणे या तिच्या खास गुणवैशिष्ट्यापासून ती अजिबात ढळलेली नव्हती. उलट त्याचा ती या शस्त्राचा आणखी प्रभावीपणे वापर करू लागली होती. निरंजनच्या जाहिरातीनं कमाल केली, असं काही लोक म्हणत. मला त्या आधीपासून चित्रा माहिती होती. पण लोक तिला जाहिरातीपासून ओळखू लागले होते. हेही तेवढंच खरं होतं. आणखी एक बदल तिच्या व्यक्तिमत्वात झाला होता. जो बहुधा मलाच खटकत, जाणवत होता. चित्रानं कपाळावर लाल रंगाची टिकली लावणं जवळपास बंद केलं होतं. क्वचित कधीतरी लावलेली दिसायची. म्हणजे एखाद्या वेळा बाजारात ती खरेदीसाठी रामदाससोबत जायची. तेव्हाही सौभाग्याचं लक्षण ठळकपणे दिसणार नाही, याची काळजी ती घेऊ लागली होती. पण त्यानं तिच्या प्रतिमेला धक्का बसला नाही. उलट थोडी उजळून निघाली. तिचं वय दोन वर्षांनी कमी झालंय, असं बायांच्या जगात बोललं जाऊ लागलं. पुरोगामी चळवळीतल्या बायांचे काही क्लब नुकतेच सुरू झाले होते. मुंबई, पुण्यातून येणाऱ्या काही प्रसिद्ध बायांची भाषणे होऊ लागली होती. तिथं चित्रा हमखास हजेरी लावायची. जाहिरातीच्या व्यवसायात ती चांगलीच स्थिरावली होती. नव नव्या कामांचा, पैशांचा ओघ तिच्याकडं धावू लागला होता. 

पन्नास-साठीच्या पलिकडं पोहोचलेल्या राजकारणी, उद्योजकांनी स्वतःवर छोटीशी डॉक्युमेंटरी तयार करण्याचं नवं फॅड आलं होतं. काळाची पाऊलं ओळखून चित्रानं मुंबईतून दोन कॅमेरे आणले. ते चालवण्यासाठी दोन पोरं नेमली. डॉक्युमेंटरी लिहिण्यासाठी एका तरुण आणि एका वयस्कर पत्रकाराला रुजू करून घेतलं होतं. चित्रासारख्या दोन-तीन बायका शहरात होत्या. पण त्यांच्याकडं हे बाकीचं कौशल्य नव्हतं. प्रसिद्धीची लाट अशी पायाखाली घेणं त्यांना जमलं नव्हतं. निरंजनसोबतच्या तिच्या मैत्रीची कुजबुज वाढली होती. पण त्याचा काडीचाही परिणाम रामदासवर झाल्याचं जाणवलं नाही. कधीतरी त्याची माझी भेट झाली तर तो मर्यादित प्रमाणात दारू पिली तर कसं फायदेशीर असतं. वाईन बायकांनी का पिली पाहिजे, असं सांगायचा. मलाच एक दिवस राहावलं नाही. मी चित्रा आणि निरंजनच्या मैत्रीबद्दल आडपडद्यानं विचारलं तर त्यानं आधी लक्षच दिलं नाही. थोड्या वेळानं माझा निरोप घेता घेता म्हणाला, ‘माझा तिच्यावर प्रचंड विश्वास आहे. त्यांची शानदार मैत्री आहे. त्या मैत्रीच्या आनंदासाठी माझ्याकडून आणखी एक पेग घेऊन टाक.मिश्किल हसत तो हॉटेलबाहेर पडला. त्याचा तिच्यावरील आत्मविश्वास मला चकित करून गेला. पण हा खरंच आत्मविश्वास आहे की त्याला तिच्यात काहीच स्वारस्य नसल्याचा परिणाम आहे का, असा प्रश्न माझ्या मनात होता. त्याचं उत्तर लवकरच मला मिळालं. 

॥ फ॥ ॥

तीन तासापूर्वी काडीचाही संबंध नसलेली चित्रा नावाची बाई जनकनं शशीरंजनांच्या  डोक्यात घोंघावून टाकली होती. त्यांना तिच्याविषयी एकदम कुतुहल निर्माण झालं होतं. ते वळून स्वतःच्या लेखन प्रवासाकडं पाहू लागले. खरंच आपल्या कथांमध्ये अशी काही वळणं, थरार नसतो. एवढ्या खोलात वर्णनं नसतात. आपण अशी एकही बाई लिहिली नाही, असं वाटून ते काहीसे खजिलही झाले. जनकविषयी त्यांच्या  मनातलीहा कोण उपटसुंभ मला माझ्या लेखनाबद्दल ज्ञान देणाराही भावना बरीच मावळली होती. तो आपल्याला काहीतरी महत्वाचं सांगू इच्छितोय, हे त्यांना चांगलेच कळू लागले होते. म्हणून ते त्याच्याकडं पुढं सांगणं सुरू करावं, असं अधिरतेनं पाहू लागलो. त्यालाही त्यांच्याबद्दल काहीतरी वेगळंच वाटू लागलं असावं. कारण त्याच्या आवाजातही खरखर कमी झाली होती. डोळ्यातील चमक वाढली होती. एखाद्या जवळच्या मित्राला खास रहस्य सांगावं, असा त्याचा चेहरा झाला होता. तो रामदासबद्दल सांगू लागला.

तुम्हाला डॉक्टर मिसाळ माहिती असतील ना. स्त्री रोगतज्ज्ञ. गायनाकॉलॉजिस्ट. रेल्वे स्टेशनजवळच्या अलंकार कॉलनीत मोठा दवाखाना आहे त्यांचा. 

हो. म्हणजे ... नाव ऐकून आहे मी त्यांचं.

त्यांनी शेती घेतली होती. इथून सात आठ मैलावर. कळमगावला. तिथं एक खूप छान दत्तात्रयाचं मंदिर आहे. जागृत देवस्थान. पण येण्याजाण्याचा रस्ता खूपच खराब. त्यामुळं दत्तजयंती सोडली तर फार गर्दी नसते. तुरळक लोक येतात. मी दत्ताचा भक्त असल्यानं जायचो. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. माझी ही ख्याती थोडीशी पसरली होती. ती ऐकून की काय, एक दिवस डॉक्टरसाहेब म्हणाले, पुढच्या आठवड्यात नव्या शेतामध्ये नातेवाईक आणि काही मित्रांना पार्टी द्यायची आहे. त्यासाठी भय्यासाहेबांना सांगितलंय. तर ते म्हणाले की, नेमकं शेत कुठं आहे. जेवण्याचं सामान घेऊन टेंपो कुठपर्यंत जाईल, याचा अंदाज घेण्यासाठी आधी जनकला घेऊन जा. आता मालकानंच म्हटल्यामुळं मी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. शिवाय डॉक्टर काबरांशी माझी चांगली तार जुळली होती. त्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, नव्या जगाविषयी आकर्षण होतं. पण ते धर्माचा, देवदेवतांचा दुस्वास करत नव्हते. देवांना नावं ठेवणे, टीका करणे असा उद्योग करत नव्हते. सर्वात महत्वाचं म्हणजे चित्रा आणि डॉक्टर मिसाळ एका सामाजिक क्लबचे सदस्य होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी अनाथालयातील मुलांना कपडे वाटपाचा कार्यक्रम घेतला होता. त्याचे फोटो आले होते पेप्रांमध्ये. ते आपल्याकडं एक नवं फॅड आलंय ना. व्हिडिओ करायचं. व्हिडिओ कॅमेरा आलंय. तर चित्रानं त्याचा एक व्हिडिओ बनवला. तो मी मिसाळसाहेबांच्या घरीच पाहिला होता. त्यातही मला दोन गोष्टी ठळकपणे जाणवल्या. की कार्यक्रम अनाथाश्रमातला, गोरगरिब मुलांना मदतीचा असला तरी चित्रा तिथं चेहऱ्याला व्यवस्थित रंगरंगोटी करून आली होती. डोळ्यात मस्त काजळ घातलेलं होतं. थोडीशी बदामाच्या आकारात उघडी असलेली पाठ सर्वांना बऱ्यापैकी दिसत राहिल, असा तिचा अंगभाव होता. तुम्हीही तो व्हिडिओ पाहा. एक मिनिटभरपण ती एका जागी स्थिर दिसणार नाही. आणि माझ्या हेही लक्षात आलं की, डॉक्टर काबरांनी तिच्याकडं फार गांभीर्यानं लक्ष दिलेलं नाही. जणूकाही त्यांच्यालेखी ती त्या कार्यक्रमात नव्हतीच. त्यामुळं मला कुतुहल वाटलं होतं. आता कळमगावला, दत्तात्रयाच्या दर्शनाला जाता-येता त्यांच्याशी बोलताना चित्राचा विषय निघेल, अशी मला अंधुकशी आशा होती. अर्थात आपण त्यांच्याकडं स्वतःहून काही बोलायचं नाही. ते काही म्हटले तर तेवढ्यापुरते ऐकून घ्यायचे, असं मी माझ्या मनाला बजावून ठेवलं होतं. 

एखादी गोष्ट सांगणं कुठं थांबवायचं, हे जनकला खूप चांगलं ठावूक असावं. तो एखाद्या सस्पेन्स सिनेमाच्या पटकथा लेखकासारखा थांबायचा आणि पुढं सांगणं सुरू करायचा. आताही त्यानं तसंच केलं. करंगळी वर करून त्यानं नैसर्गिक विधीची परवानगी द्या, अशी खूण केली. शशीरंजनांनी त्याला खालच्या मजल्यावर डाव्या बाजूला जाण्याची खूण केली. 

तो गेल्यावर शशीबाबू थोडंसं विचारात गढून गेलो.आपल्याला ही चित्रा नावाची कंडाळ बाई कधी का भेटली नसावी. दोन वर्षांपूर्वी त्या सोशल क्लबमध्ये मेंबर होण्याचा आग्रह सूर्यवंशी वकिलाने धरला होता. फक्त पाचशे रुपये दरवर्षाची फीस होती. क्लबमध्ये खूप प्रतिष्ठित लोक आहेत. काही खास महिलाही दाखल झाल्यात असं त्यांनी सूचकपणे म्हटलं होतं. पण आपल्या कसं लक्षात आलं नाही’, अशी खंत त्यांना वाटू लागली. खंत खोलवर खुपण्याआधीच जनक परत आला. आल्या आल्या त्यानं सुरुवातही केली. 

तुम्हाला एक सांगायचं राहूनच गेलं. खूप मोठी मिस्टेक झाली. काय होतं की, चित्रानं जेव्हा जाहिरात एजन्सी सुरू केली ना तेव्हा तिच्या बिल्डिंगसमोर रणजितचं दुकान होतं. नंबर प्लेट तयार करायचं. पुढं त्यानं कॉम्प्युटर एजन्सी टाकली. झेरॉक्स मशिन घेतल्या. तर तो चरण तिच्यावर खूप लक्ष ठेवून असायचा. माझ्या बऱ्यापैकी ओळखीचा होता. एकदा बिअरबारमध्ये भेटला. एक एक बाटली झाल्यावर आम्ही बाई बाटलीत उतरवू लागलो. तेव्हा त्यानं पहिल्यांदा मला चित्राबद्दल ठामपणं सांगितलं होतं. तिची माझी अगदीच जुजबी ओळख असल्याचं मी दणकावून सांगितल्यावर तो अधिक खुलला. दिसायला खास नसली तरी पुरुषांना खेचून घेण्यात, त्यांच्याशी एखाद्या फुलासारखं खेळण्यात चित्रा माहिर आहे, असं तो नेहमी म्हणतो. तर जाहिरातीच्या फिल्डमध्ये खूप प्रसिद्ध असलेले नरसिंगराव एका हॉटेलात मुक्कामी होते. नरसिंगरावांबद्दल मी तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही. खूप सारे फोटो असतात त्यांचे पेप्रात. बाप माणूस. रणजित सांगत होता की, नरसिंगरावांशी  खेळण्यासाठी खोलीत गेलेली आणि तासाभरानंतर बाहेर पडलेली चित्रा त्यानं पाहिलीय. तिला निरोप देताना फक्त अंडरवेअरवर उभ्या असलेल्या नरसिंगरावांनी तिच्या ढुंगणाला जोराचा चिमटा घेतला. त्यावर ती खूप खळखळून हसत होती. 

यावरून तासभर खोलीत काय घडलं असावं, हे कळतं, असं त्यानं म्हणजे रणजितनं किमान मला दहावेळा सांगितलं. फक्त मलाच नाही तर आमच्या मित्राच्या अड्ड्यावरही बिनधास्तपणे. नरसिंगरावांमुळंच तिचं करिअर पळायला सुरुवात झाली. तिला ऑफिससाठी बाजारपेठेतली मोक्याची जागा मिळाली ना. ती त्यांनीच मिळवून दिली, असं तो सांगतो. 

जनक म्हणाला रणजितला मी म्हणालोही की, अरे थोडी मोकळेपणानं फिरणारी, बोलणारी बाई दिसली की काहीही बोलणं बंद केलं पाहिजे. तर तो म्हणाला होता की, तुला कळेल हळूहळू. कळाल्यावर माझी आठवण करत राहा. आत्ता कसं कुणास ठावूक त्याचं ते बोलणं आठवलं म्हणून तुम्हाला आवर्जून सांगितलं. जनकनं शशीरंजनांच्या डोक्यात रणजित भरवून टाकला होता. नरसिंगराव या प्रसिद्ध जाहिरात एजन्सी मालकाचा रंगीला चेहरा दाखवला होता. शशीरंजन त्यांना या साऱ्या गोष्टीतल्या खाचेत बसवत होतो. 

जनक पुढे काय सांगतोय, या कडंही शशीरंजनांचं खूप लक्ष लागलं होतं. म्हणून त्यांनी त्याला नजरेनं खुणावलं. तसं त्याच्या चेहऱ्यावर छानसं हसू उमटलं. त्याचे डोळे चमकू लागले होते. त्यात त्यांना पहिल्यांदा चवचाल, चावट, खट्याळपणाची झाक जाणवली.  सिगारेट पेटवून एक दमदार कश घेत तो गंभीर आवाजात सांगू लागला. 

तर मी आणि डॉक्टर मिसाळ कळमगावला पोहोचलो. दत्तात्रयाचं छान दर्शन झालं. तिथून शेतावर गेलो. मी डायरीत काही नोंदी करून घेतल्या. आणि परत निघाल्यावर वळणावळणाच्या त्या रस्त्यावर आम्ही एक पूल शोधला आणि त्यावर बसकण मारली. चारही बाजूंनी वेढलेल्या हिरव्यागार डोंगर, टेकड्यांना पाहून मिसाळसाहेब खुश झाले होते. मी तिथल्या प्रचंड एकांतात स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करत होता. डोळे मिटून पक्ष्यांचे, वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज ऐकत होतो. दूरदूर शांतता पसरली होती. माझा आतला प्रवास सुरू झाला होता. तेवढ्यात कोणीतरी जोडपं खळखळून हसतंय, असं वाटलं. मी चमकून पाहिलं तर एक कार मंदिराकडं निघाली होती. मी डोळे मोठे करत कारवर डोळे रोखले आणि चकितच झालो. कारण रामदास ड्रायव्हिंग सीटवर होता आणि त्याच्या बाजूला एक बाई बसली होती. ती चित्रा नव्हती. ती दुसरीच कोणी होती. रंजना. हो रंजना होती. त्याच्या काहीतरी बोलण्यावर दिलखुलास हसत होती. थोड्या अंतरावर गाडी थांबली. ती दोघं उतरली. मी स्वतःला  आवरूच शकलो नाही लेखकसाहेब. डॉक्टर काबरांना खुणावून मी त्या दोघांच्या मागं अंतर राखून काही पावलं चाललो. पुन्हा एकदा मनाची खात्री करून घेतली. साहेब, तिथं रामदास चित्रासोबत नाही रंजनासोबत फिरत होता. हातात हात घातले नव्हते. थोडंसं अंतर राखूनच होते. पण त्यांचं फिरणं खूप काही सांगणारं होतं. मला थोडासा धक्काच बसला. पण रामदासचं हे प्रकरण पाहून एक आनंदाची उकळी फुटली. रामदासचं लफडं सांगितली तर चित्रा त्याचा बदला घेण्यासाठी आपल्याला जवळ करेल. तिला सहज भोगणं शक्य होईल. पलंगावर तिच्याशी छान  खेळता येईल. खेळता खेळता तिला रामदास  - रंजनाबद्दल आणखी काही रंगवून सांगता येईल, असं वाटू लागलं, असं म्हणत जनक एक क्षण थबकला आणि म्हणाला

अरे हो, तुम्हाला प्रश्न पडला असेल ना रंजनाबद्दल.’ 

माझ्या होकाराची वाट न पाहता त्यानं उलगडणं सुरू केलं.

रामदाससोबतची बाई कोण हे त्यावेळी खरंच मला माहिती नव्हती. पण ही बाई तर खरंच छानंय, असं मी नोंदवलं होतं. चित्रकला, डान्स, कलाकुसर अशा विश्वात रमलेल्या रामदासला शोभेल अशी होती. त्याच्यापेक्षा किंचित उंच. अंगावर मास नावाचा प्रकार नाहीच. फार लक्षात  येईल अशी फिगर वगैरे काही नाही. केस मात्र ढुंगणाखालपर्यंत. त्यावर छान गजरा माळला होता’. ही कोण आहे, याचा शोध मी घेऊ लागत असताना डॉ. मिसाळ म्हणाले,

त्या बाई फिरतायत ना रामदासजींसोबत. त्या डॉ. रंजना आहेत. राजतारा सोसायटीत दवाखाना आहे त्यांचा. होमिओपॅथीच्या डॉक्टर आहेत.’ 

आँ ... तुम्हाला कसं माहितीॽ

बस्स का. म्हणजे सगळं तुम्हालाच माहिती असलं पाहिजे काॽ अहो, साहेब आम्ही पण शहरात राहतो. फिरतो. खूप साऱ्या लोकांमध्ये उठबस असते आमचीपण.

हो ... हो. ते तर आहेच. पण माझं म्हणणंय की, तुम्ही दोघांनाही ...

हो ... दोघांनाही ओळखतो चांगलं. वर्ष झालंय ना शेत घेऊन. पाचवी-सहावी चक्कर आहे माझी इथं. त्यातल्या तीनदा तर मी त्यांना पाहिलंय. आज थोडं अंतर राखलंय. मागच्यावेळी नव्हतं. त्या मोठ्या खडकाच्या मागं बसली होती ती दोघं.

हं ... पण या बाई ...

सोलापूरच्या आहेत. लग्न करून आल्या. त्यांचे यजमानपण डॉक्टर. चांगले हुशार. पण दोघांचं काही जमलं नाही. नवरा धुळ्याला गेला. आदिवासींच्या सेवा प्रकल्पात काम करतो. या बाईंना गाण्याची आवड. आवाज चांगलाच आहे त्यांचा. नृत्यकलाही पारंगत आहे. बहुधा रामदास आणि त्यांची अशाच कुठल्या कार्यक्रमात भेट झाली असावी.’ 

तुम्हाला त्या बाईबद्दल चांगलीच माहिती आहे कीॽमी डॉक्टरांना थोडंसं खवटचपणेच बोललो. त्याकडं दुर्लक्ष करत ते उत्तरले,

अशा बायकांबद्दल माहिती असावीच लागते. आपण घेतली नाही तरी ती काहीवेळा चालत येते. एकदा त्यांचा गायनाचा कार्यक्रम ठरवला होता आमच्या क्लबनं. त्या वेळी कळालं होतं त्यांच्याबद्दल. यांना मुलबाळ नाही. चाळीशी ओलांडून एक-दोन वर्षे झाली असतील. सगळे नातेवाईक सोलापूरला. बरं, नातेवाईकांशीही काही पटत नाही. आई आहे. पण नवऱ्यालाच काही वाटत नाही तर ती तरी काय बोलणार लेकीलाॽ रामदासजींबद्दल मी काही सांगण्याची गरज आहे काॽ ते मस्तमौला आहेत. मजा करतायत. मियाँ बिवी राजी. आपल्याला कायॽअसं म्हणून डॉक्टर थांबले. कोणाचा तरी कॉल आला म्हणून चालत चालत थोडे दूर जाऊन बोलू लागले. माझ्या डोक्यात भिरभिरं पिंगू लागलं.

चित्रा कुठंही भटकली. रात्र, रात्रभर बाहेर असली तरी रामदासला काहीच का वाटत नव्हतं. तो तिला काबूत का ठेवत नव्हता, याचं रहस्य मला बऱ्यापैकी उलगडलं होतं. माझ्या मनात कारंजी फुटू लागली होती. एखाद्या माशासारखी चकाकणारी पाठ उघडी ठेवून, सारखी ओठांवरून जीभ फिरवत राहणारी, बेंबी दिसेल अशी साडी नेसणारी चित्रा डोळ्यासमोर येऊन शरीरातून बारीक विजेचा प्रवाह फिरू लागला होता. एखाद्या माणसानं पाय धुण्यासाठी तलावात पाय टाकावेत आणि त्याला सोनेरी मासा सापडावा, अशी माझी गत झाली होती.  मोबाईलवर बोलणं संपवून डॉक्टरसाहेब माझ्याजवळ येऊन उभे राहिले तरी माझ्या लक्षात आले नाही. त्यांनीच माझ्यासमोर सिगारेटचं पाकिट धरल्यावर मी गुंगीतून बाहेर आलो. त्यांनी मिश्किलपणे विचारलंही,

काय, इतका काय विचार करतायॽ अहो, अशा बायका असतात. एक केस मी नुकतीच पाहिली. त्या बाईनं कार्यालयातील बॉसलाच ताब्यात घेतलं. त्याच्याकडून गिफ्ट घेतल्या. पैसे काढले. पंधरा वर्षापेक्षा मोठा बॉस आयुष्यभर शरीराला काही पुरणार नाही, हे तिला पक्कं माहिती होतं. म्हणून एक कमी वयाच्या तगड्या पोराशी सूत जमवलं. त्याच्याकडून अन् बॉसकडून पैसे काढणं सुरू. दोघांना गुलाम  केलं. पण एक दिवस भांडं फुटलंच. तर दोघांना दिवस वाटून दिलेत तिनं. पण हिचं तसं काही होणार नाही हां. तुम्हाला आवडली की काय रंजना. तसं असेल तर सांगा.’ 

आँ ... क ... कायॽ

काही नाही हो. गंमत केली. रामदासजी आहेत तुमच्याआधी रांगेत.’ 

अहो, तसं काही नाहीये. खरंच.

बरं, बरं. असं म्हणतात, आणखीही दोनजण आहेत आमच्या सिंगिंग रॉक क्लबचे. त्यामुळं तुम्हाला काही वर्षे वाट पाहावी लागेल.’  

डॉक्टरसाहेब उगाच खेचू नका. मी खूप लहान माणूस आहे. मला त्यांच्यात काहीच स्वारस्य नाही. खरंच नाही.

असं मी म्हटलं खरं. एक क्षण वाटलं आपल्याला नेमकं काय म्हणायचं आहे ते डॉक्टरांच्या लक्षात काही आलं असावं. 

रंजनामध्ये स्वारस्य नाही तर कोणात स्वारस्य आहे, असा प्रश्न डॉक्टर विचारतात की काय असं वाटलं. त्यावर मला चित्राविषयी काहीतरी जुजबी का होईना बोलावं लागलं असतं. पण सुदैवानं तसं काही झालं नाही. काही मिनिटे शांततेत गेली. आणि आम्ही परत निघालो. घरी पोहोचेपर्यंत किमान पन्नासवेळा चित्रा माझ्या मनात नाचून गेली. दोन-तीन वेळा ती खूपच ढुंगण हलवत होती. डोळे मिचकवत होती. उगाच आळोखे पिळोखे देत होती. ही नेमकी काय प्रकारची बाई आहे. ती पुरुषांशी कशी खेळत असावी. का खेळत असेल, असं वावटळीसारखं माझ्याभोवती फिरू लागलं. आता तिचा असली चेहरा, खरं रूप जाणून घेण्याची माझी भावना तडतडू लागली होती. 

त्या तडतडीतच परत निघालो. मिसाळसाहेब रोमँटिक मूडमध्ये होते. त्यांनी छान गाणी लावली होती. ते गाण्याच्या ओळी गुणगुणत होते. माझ्या डोक्यात आणखी एक भुंगा शिरला होता. ही बाई अशी. नवरा असा. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोघंही लग्नात, पार्ट्यामध्ये पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात एकत्र फिरतात. हातात हात घालून छान फोटो काढतात. कोणाच्या लग्नात गेले आणि थोडासा आग्रह झाला तर छान उखाणेही घेतात. कधीकधी तर रामदास सगळ्यांसमोर तिला जवळ खेचतो. ती त्याच्याकडे छान डोळे भरून पाहतीये. त्याच्या खांद्यावर तिनं डोकं ठेवलंय, असे फोटोही निघत असतात. मग ते खरं की आपण जे पाहतो, ऐकतो ते खरंॽ आपण विनाकारण संशयाची खुंटी पिळतोय काॽ असे प्रश्न घेऊन मी घरी गेलो. चित्राला किमान तीनदा तरी भेटायचं. तिच्याशी आणखी सलगी करून पाहायची असं मी ठरवलं होतं. पण अचानक भय्यासाहेब काही कामासाठी बाहेरगावी निघून गेले. दिवाकरसाहेबांनी माझ्यावर ढीगभर कामे ओतली. त्यात आठवडाभर कामामध्ये गुंतलो. रात्री बिछान्यावर अंग टाकलं की तिची दाटून आठवण यायची. वाटायचं सकाळीच जाऊन तिच्यासोबत एकतरी तास घालवावा. पण शक्य झालं नाही. 

॥ स ॥

निरंजनसोबत चित्राचं काय चाललंय हे मला जाणून घ्यायचं होतं. तिला भेटणं शक्य नसेल तर त्याला कुठं बोलता येईल का, हे शोधत होतो. तर एक दिवस तोच भेटला. मी रणजितसोबत बोलत त्याच्या गॅरेजवर उभा होतो. त्याच्या बिल्डिंगमध्ये तळमजल्यावर वाइन, लिकर शॉप आहे. तिथून बाटली खरेदी करून निघाला होता निरंजन. मी हात दाखवताच थांबला. खूप थकल्यासारखा वाटत होता. डोळ्यात प्रचंड शिणवटा होता. एखादा मोठा आघात झाल्यासारखा. मला आधी एक क्षण वाटलं की त्याच्या आई-वडिलांपैकी कोणाचं काही बरं वाईट तर झालं नाही नाॽ बहुधा हाच विचार रणजितनं केला असावा. त्यानं विचारलं,

काय साहेब, घरी सगळं ठीक नाॽ

खूप दूरवर नजर टाकल्यासारखं तो उत्तरला

हो. चांगली आहेत की सगळी.

मी विचारलं,

अलिकडं दिसले नाहीत तीन चार महिन्यात.

तो काहीच बोलला नाही. गप्प बसून राहिला. मी पुन्हा टोचलं. तर निग्रहानं बोलल्यासारखा म्हणाला,

पैसे गेले आणि बाईही गेली. त्या धक्क्यातून सावरायला थोडे दिवस लागतील. एखादा महिनाभर. मग सगळं नॉर्मल होईल.

मला एकदम उकळी फुटली.अरे, काय झालं पण. आम्हाला तर काहीच माहिती नाही. मला तर वाटलं की जमलं तुमचं.

नाही रे. सांगेन कधीतरी. फ्लॅटवर जाऊन बसायचंय.

रणजितनं ऑफर दिली.

दादा, तुमची हरकत नसंल तर इथंच माझ्या गॅरेजच्या मागं बसू ना. मोकळी जागा आहे. छान खुर्ची, टेबल आहे. माझ्याकडं पण हाफ आहे. बसू गप्पा मारत.

मला वाटलं हा नाही म्हणणार. पण पठ्ठ्या तयार झाला. रणजितनं सगळी व्यवस्था केली होती. त्याला सगळं सांगण्याची घाई झाली असावी. एक घोट घशाखाली पूर्ण उतरण्याच्या आधीच तो घडघड बोलू लागला.

तिच्यामार्फत मी एमएसईबीमधील दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचं काम घेतलं. उर्जामंत्री पागोरेच्या कलेक्शनमध्ये थोडासा हात मारल्यामुळं त्यानं दोघांना कर्नाटकच्या टोकावर टाकलं होतं. हे मला पेप्रातली बातमी वाचून कळालं. एक दिवस असंच एका लॉजवर मुक्कामाला असताना मी सहज तिला सांगितलं. तर ती लगेच सुरू झाली ना. तिनं आधी पागोरेच्या पीएला पटवलं. पागोरेलाही थोडा मध लावला. दोन अधिकाऱ्यांनी जेवढा हात मारला. त्याच्या चारपट परत करण्याचा शब्द दिला. यासाठी दोन्ही अधिकाऱ्यांकडून आम्ही मिळून पाच लाख रुपये काढले. पण का कोणास ठाऊक तिनं एकाचंच काम केलं. दुसऱ्याला लटकावून टाकलं. माझ्या मागं लावून दिलं. तो मलाच तंडू लागला. त्याची माणसं कुठंही गाठू लागली. मग त्याला अडीच लाख मलाच द्यावे लागले. मी ते तिच्याकडून मिळवण्यासाठी मागं लागलो तर भांडू तंडू लागली. ते बदल्याचं लफडं सुरू होण्याआधी आठ दिवसातून दोनदा तरी स्वतःहून रात्र रंगीत करण्यासाठी भेटायची. पण पैसे मागितल्यावर चक्क मला टाळू लागली. एकदा म्हणाली की, ‘माझ्यावर विश्वास नाही काॽ लवकरच होईल बदली. नंतर म्हणाली की, खर्च होऊन गेले. तिसऱ्यांदा सांगितलं की, एकदा घेतलेले पैसे परत कशाला करायचे. अधिकाऱ्याकडं ब्लॅकचे असतात. माझा ताबा सुटला स्वतःवरचा. मी भडकून तिला म्हणालो की, तुला बहुदा माझी गरज राहिली नाहीये. तु मला एक दिवस कंटाळणार हे मला पक्कं माहिती होतंच. खात्री होती मला पक्की. आणि मला जे वाटतं तेच होतं. तुझं पोट आणि पोटाखालच्या जागेला दुसरं कोणीतरी भेटलं असणार. माझ्याशिवाय दुसरा कोणी भेटलाय का तुलाॽ पोटाखालच्या जागेला खुश करणाराअसा हल्ला चढवला. तर खूप संतापल्यासारखं नुसतं बघत राहिली. अवाक्षरही बोलली नाही. तावातावानं निघून गेली. असाच एक महिना गेला कटकटीत. त्याच काळात कधीतरी तिच्या ऑफिससमोरून चाललो होतो. तर टेंपोमधून दोन खूप भारीचे सोफासेट, दोन कपाटं आणि भलामोठा टेबल-खुर्ची उतरत होते. चित्राच्या ऑफिसमधले शिपाई गोटेमामा सामान ऑफिसात नेण्यासाठी हातभार लावत होते. मी जाऊन त्यांना विचारलं तर म्हणाले की, ‘बाईंनीच खरेदी केलीय. कॅश दिलीय.ते ऐकून मी थबकलोच. काही मिनिटांनी टेंपोवाल्यानं दोन लाखाच्या बिलाची पावती गोटेमामाच्या हातात दिली. मला तिथं अधिकाऱ्याच्या पैशाचा उलगडा झाला. काय भयंकर बाई आहे. बरं, हिला पैसेच पाहिजे होते तर आपल्याला सांगायचं ना. सोडून दिले असते पैसे. चांगली शिकल्या घरातली आहे. सायन्समध्ये पदवी घेतली. दहा वर्षांपासून ॲड एजन्सी चालवते. लाखोचा व्यवहार करते आणि अशा भानगडी. छे. हे काही चांगलं नाही. आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. मग मी तिला असंच खूप प्रयत्नानं गाठलं आणि म्हटलं की, पैशाचं राहू दे. एकदा इगतपुरीच्या रिसोर्टवर दोन रात्री मुक्कामाला तर जाऊ. तर वैतागलेल्या आवाजात म्हणाली की

बाकीच्या कामाचं खूप टेन्शन आहे. रिलॅक्स मूड झाला की भेटू. सध्या नको. संधी मिळेल तेव्हा माझ्या अंगाला अंग घासणारी चित्रा अंग चोरू लागली. जेवढं मी विचारू लागलो तेवढी ती गप्प राहू लागली. हम्म ... हम्म .. करू लागली. तिच्या ऑफिस, घरासमोर चकरा मारल्या एखाद्या कॉलेजातल्या आशिकासारख्या. पण काही उपयोगच नाही. एक-दोन ठिकाणी दिसली. पण ओळख दाखवेना. डोळे इकडे तिकडे फिरवू लागली. 

काही क्षण थांबून आवंढा गिळत, रडवेल्या आवाजात तो सांगत होता

मला वाटू लागलं, यार काहीतरी गडबड आहेच. पैशासाठी ही खूपच बदलली आहे. पण फक्त पैशापुरतं नव्हतं तिचं. पैशापेक्षा खूप फैलाव होता तिचा. माझ्यातल्या उधाणलेल्या पुरुषाला आव्हान देत होती ती. माझ्या रात्री खराब होऊ लागल्या होत्या. एकदम झिरझिरीत साडी घातलेली, बेंबीत बोट घालून ते माझ्या कानात फिरवणारी चित्रा येता जाता मनात फिरत होती. आपण विनाकारण तिच्यावर ओरडलो. डाफरलो. संशय घेतला.  त्यामुळं ती नाराज झाली असणार. म्हणून मी तिला एकदा गाठलंच तिच्या ऑफिसमध्ये आणि माफी मागितली तिची. 

माफीॽ

होय, मी खूपच हतबल झालो होतो. आपण भयंकर चूक करून ठेवली. ती आपल्यालाच निस्तरावी लागणार, हे कळालं. म्हणून जबरदस्तीने भेटलो तिला आणि म्हणालो, माझ्याकडून तुला खूप काही वाईट बोललं गेलं. अपमान केला. अतिशय घाणेरडे आरोप केले.आणि तिच्या पायाकडं डोकं झुकवलं. पण तिच्या चेहऱ्यावर उभी, आडवी, तिरपी अशी कोणतीच रेष उमटली नाही. जणूकाही तिच्यासमोर मी नव्हतोच. माझं अस्तित्वच नाकारलं तिनं. माझ्या डोळ्यात पाणी साठलं होतं. ते दिसलं तर कदाचित तिला दया येईल, अशी मला खात्री  होती. पण ती फोल ठरली. अतिशय कठोरपणे तिनं सांगितलं,

जे झालं ते होऊन गेलं. आता मला त्यात इंटरेस्ट राहिलेला नाही. माझ्या वैयक्तिक आयुष्यात अजिबात डोकावू नकोस. प्लीज.

अरे, पण मी माफी मागितली आहे ना. तुझ्यावर संशय घेऊन चूक केलीय मी. खूप मोठा अपराधी आहे तुझा मी. पुरुषी अहंकारातून झालंय हे. पण तु उदार मनाने माफ कर मला. त्याशिवाय मला एक पाऊलही चालता येणार नाही.

मी वारंवार विनंती, आर्जवं करत राहिलो पण ती जणू ठरवून दगड झाली होती. दगडीपणानंच म्हणाली,

तुम्ही माझ्या परिचयाचे म्हणून कायम राहाल. पण मी काय करावे, हे तुम्हाला ठरवता येणार नाही.

पण तु मला माफ करणार आहेस की नाहीॽ

हम्म ... बघूयात, आत्ता काही सांगता येणार नाही. जे काही घडलं ते घडून गेलंय. त्यावर काहीही बोलण्याची इच्छा राहिली नाहीये. चला, माझी अनेक कामं राहिली आहेत. बाहेर जायचंय मला.असं म्हणत ती उठून उभी राहिली. माझा नाईलाज होता. पराभूत मनानं मी निघालो. काय झालं असावं, डोकं फिटू लागलं माझं.  

त्यात एकदा मंत्रालयात त्या महेबूबसोबत दिसली. त्याच्यासोबत कारमधून आली आणि गेली होती ती. आता कारमधून ये-जा करताना सीटवर बसून काय काय करते, ते मला माहिती होतं. मी तिच्या घरी गेलो तर महेबूब आरामात बसला होता. रामदास नव्हता. मी डोकं सटकलं आणि निघून आलो. तिनं मला पाहिलं पण माझ्यामागं धावत आली नाही. चार महिने झाले अजून एकदाही भेटली नाही. तिला माझ्यातल्या खेळकऱ्यात इंटरेस्ट राहिला नसावा.निरंजन फुटून फुटून बोलत होता.

खरं म्हणजे मनाच्या तळाशी दडपून ठेवलेलं, वारंवार ऊतू जाणारं हे सारं त्याला कोणाला तरी सांगायचं होतं. आमच्यामुळं त्याला दोन चांगले श्रोते मिळाले. तो मोकळा झाला होता. पहाटेपर्यंत तो तिच्याबद्दल तेच तेच सांगत होता.असं म्हणत जनक थांबला आणि माझ्याकडं रोखून पाहू लागला. मी काहीतरी विचारावं, असं तो सुचवत होता. पण मला शब्दही सुचत नव्हता. मग जनकनं झपकन एक घोट घेतला. अन् तो अधीरपणे डोळे  काहीतरी शोधार्थ असल्याचा अविर्भाव करत बोलू लागला,

लेखकसाहेब, एवढं सगळं कळत असून, दिसत असूनही माझं एक मन असंही म्हणत राहायचं की, ही बाई एवढी गेलेली नसणार. इतक्या पुरुषांसोबत खेळत राहण्याची, पुरुषांचा वापर करण्याची शक्ती तिच्यात नसणार. उगाच लोक तिच्याविषयी अतिशयोक्तीनं बोलतात. काही माणसं नाही का सात-आठ बायकांसोबत एकाचवेळी फेऱ्या मारत. त्यातल्या दोन-तीन जणींसोबतच ते पलंगावर खरं लोळतात. तसंच हिचंही असणार. त्यामुळं मी मधले काही महिने तिच्याबद्दल कोणी काही सांगितलं तर दुर्लक्ष करू लागलो होतो. तुम्ही जसं तुमच्यालॉलीपॉपआणिपोस्टातलं पत्रकथेच्या नायिका सुगंधा आणि आयेशाकडं दुर्लक्ष केलं तसंच. सुगंधाकडं पुरुषांना पलंगाच्या पायाला बांधून ठेवण्याची ताकद किती चमत्कारिक होती, हे तुम्ही उलगडून, पटवून सांगितलंच नाही वाचकांना. आयेशाला तर तुम्ही वेश्या करून टाकलं. बसस्टॉपवर उभी राहून कॉलेजच्या पोरांना घेरणारी आयेशा किती मादक होती. आणि मादकतेच्या ताकदीवर तिनं कशी मस्ती केली, याचं वर्णन तुम्ही टाळलं.

जनकनं आपलं लिखाण खूपच बारकाईनं वाचलं, याचा शशीरंजनांना आनंद तर होत होता. पण आता त्यांना त्याच्याकडून चित्रा ऐकायची होती. त्यामुळं त्याला त्यांनी मूळ मुद्याकडं वळवलं. त्यासाठी अर्थात एका छोट्या पेगची गरज होती. त्यांच्या एका मित्रानं सिंगापूरमधून पाठवलेली एक बाटली कपाटात तीन वर्षांपासून ठेवली होती. त्यांनी ती काढून टेबलवर ठेवताच तो खूश झाला.तीन टोपण द्याअसं म्हणत त्यानं ग्लास पुढे सरकवला. ते त्याच्याकडं डोळे रोखत म्हणाले,

हा पेग आता विषयांतर होऊ नये यासाठी

त्यानं गाल फुगवले. ग्लासात बर्फाचे तुकडे टाकत तो सांगू लागला.

हां. तुमचा टोमणा आला लक्षात. आता विषयांतर नाही. तर मी ना चित्राबद्दल कोणाकडून काही ऐकायचं नाही. ऐकलं तरी फार मनावर घ्यायचं नाही, असं ठरवून टाकलं होतं. पण असं ठरवणं फार काळ टिकलं नाही. कारण गुलबक्ष्या. 

हा कोण?’

हं ... तुम्हाला या निमित्तानं बऱ्याच साऱ्या गोष्टी कळताय हां. त्या पण तुम्ही तुमच्या कथा-कादंबरी लिखाणात घ्या. तर गुल्ल्या म्हणजे गुलबक्ष रफिक खान. कुठल्यातरी साप्ताहिकासाठी रिपोर्टर होता. त्याची माझी कुठं भेट झाली मला नेमकं आठवत नाही. दहा बारा वर्षापूर्वी बहुधा कुठलातरी इव्हेंट असावा. अं ... हं ... उर्दू-हिंदी पुस्तकांचं प्रदर्शन होतं. तिथं बाहेरच्या बाजूला पानाची टपरी लावलेली होती. हा तिथं आला होता. तेव्हा नेमका टपरीवाला काहीतरी कामासाठी गेला होता. तर हा लागला ओरडायला. त्याच वेळी मी स्कूटर लावून येत होतो. दिवाकरसाहेब पाठोपाठ पोहोचणार होते. त्यांना असा आरडाओरडा चालणार नव्हता. म्हणून मी धावत गेलो. तर हा पठ्ठ्या तोंडात पानाचा तोबरा कोंबला असताना दुसऱ्या पानासाठी ओरडत होता. मी टपरीपाशी जायला आणि टपरीवाला यायला एकच वेळ झाली. तर या गुलबक्ष .. गुल्ल्यानं माझं कौतुक करणारा एक शेर म्हटला. मी थोडीशी हसून दाद दिली तर त्यानं मैत्रीसाठी हात पुढं केला. गोलमटोल चेहऱ्याचा, थोडा उंच, डोळ्यात किंचित तिरळेपणा आणि कुरळे केस. उंच टाचांचे बूट, बोटात तीन तीन अंगठ्या या मुळं तो काहीतरी विचित्र दिसत होता. मी त्याच्याशी हात मिळवून प्रदर्शनाकडं पळालो. त्याला विसरूनही गेलो. पण तो चिकटपणानं बहुधा माझा पाठलाग करत असावा. तीन-चार वेळा समोरून गेला. प्रत्येकवेळी हसून हात उंचावत होता. तो दिवस तर गेलाच पण प्रदर्शनाचे चारही दिवस तो रोज यायचा. आवर्जून भेटायचा. पान चघळत हमखास एखादा शेर ऐकवायचा. मी एक गोष्ट नोंदवली की तो माझ्याशी बोलत असताना कोणत्यातरी बाईवर नजर ठेवून असायचा. पानासोबत कोणतीतरी बाई चघळायचा. जर एखाद्यावेळी नजरेच्या टप्प्यात बाई नसेल तर त्याच्या विचारात ती नक्की घोळत असायची.

जनकच्या या ओळख प्रकरणानं शशीरंजन काहीसे कंटाळले होते. जोरात जांभई देत ते म्हणाले, या तुझ्या मित्राचं, गुलछबूचं चित्राशी सूत कसं जुळलं ते सांगता येईल का आधीॽ

‘अहो, नाही नाही. काहीतरी गडबड झालीय तुमची समजून घेण्यात. गुल्ल्या आणि चित्राची कधी ओळखही झाली नाही. थोडं थांबा. पुढं ऐका.’ जनकनं जणूकाही आदेशच दिला. अन् तो जुन्या दिवसात गुंग झाला.

‘गुलबक्ष मुळचा रत्नागिरीचा. लहान होता तेव्हा टुरिस्ट हाऊसमध्ये चहा नेऊन देण्याचं काम करायचा. त्याच्या बापाची चहाची टपरी होती तिथं. टुरिस्टमध्ये जगभरातले लोक यायचे बायकांना घेऊन. काही खऱ्या बायकांना, अनेकजण खोट्यांना. त्यांचे चाळे पाहून पाहून गुल्ल्या चावट झाला. द्विअर्थी बोलण्यात तरबेज झाला. काही बायकांना आवडतं असं बोललेलं. तर त्या त्याच्याशी बोलायला धडपडायच्या. त्यामुळं त्याचा चावटपणा वाढत गेला. पण बाईलवेडा झाला नाही. कुठल्याही बाईच्या जाळ्यात अडकला नाही. अगदी बाप हात धुऊन मागं लागला तरी निकाह नाही केला. पोटापाण्यासाठी आपल्या इथं कामाला लागला. रजिस्ट्री ऑफिसमध्ये दलाली सुरू केली. चांगला पैसा मिळू लागल्यानं त्यानं गावाकडं परत जायचा नाद सोडून दिला. वर्षातून दोनदा जाऊन आला की झालं. रत्नागिरीला जायला मिळत नसलं तरी याला फिरायचा फार नाद. शनिवार, रविवारी कुठंतरी भटकणार. काहीतरी खरेदी करणार आणि इथं आणून विकणार. चार पैसे कमावणार. असा त्याचा स्वभाव.

असाच एकदा तो मला भेटला आणि मला म्हणाला

पत्त्यांचा कॅट पाहिजे काॽ फार भारी आहे.आणि लगोलग कॅट उघडूनही दाखवला. माझे विस्फारलेले डोळे पाहून त्याच्या तोंडातून लाळ गळू लागली. 

सर, थ्री डी आहे. बावन्न पत्त्त्यावर एकसे एक माल है. पत्ता थोडा तिरपा केला. फिरवला तर बाई एक एक कपडा उतरवून आपल्याकडं फेकते. आणि फार महाग नाही. फक्त चारशे रुपयांना.

हं... कुठून आणला हा. मुंबई काॽ

नाही हो. मुंबईला जायची गरज नाही राहिली आता. महाबळेश्वरला गेलो होतो ना रविवारी. तिथून आणलेत सात कॅट. सहा गेलेसुद्धा हा राहिलाय. घेऊन टाका.

अरे, बाबा मी पत्ते खेळत नाही. मला नको.

अहो, साहेब हे पत्ते खेळण्यासाठी नाहीत. पाहून खेळण्यासाठी आहे.डोळा बारीक करत गुलबक्ष म्हणाला. आणिचारशेचा आहे. तीनशे नव्वदला देतोअशी ऑफरही केली. पण मी ठाम होतो. त्याला दुसरीकडं खेचण्यासाठी मी विचारलं,

बरं, सात कॅट कोणी-कोणी घेतले ते सांग आधी.

गुलबक्ष पक्का धंदेवाईक होता. धंद्यातली रहस्य गुपित ठेवणं त्याच्या रक्ताच्या थेंबात भिनलेलं होतं. पण मी पण अडून बसलो होतो. मग तो म्हणाला,

तुम्ही काही कॅट घेणार नाहीत. ते जाऊ द्या. पण तुमच्या कामाची एक गोष्ट सांगतो.’ 

कोणतीॽ उगाच काही फेकू नकोस.

फेकत नाही. पक्की माहिती आहे. मी स्वतः पाहिलंय. महाबळेश्वरला दोन दिवस हॉटेलात मुक्काम होता माझा. शनिवारी संध्याकाळी हॉटेलातल्या बारमध्ये बसण्यासाठी चाललो होतो. काऊंटरवरल्या माणसाशी बोलत होतो. तर बाईच्या हसण्याचा आवाज आला. म्हणून वळून पाहिलं तर महेबूबभाईंसोबत चित्रा बाई होत्या.एका दमात त्यानं सांगून टाकलं आणि कसा बाँब फेकला असा चेहरा करून माझ्याकडं पाहत राहिला. 

कोणॽमाझा आवाज चांगलाच चढला होता.

बंजारा हॉटेल, फोर व्हिला रिसोर्ट, नॅशनल सुपर पेट्रोलपंपाचे मालक महेबूबभाईंसोबतचित्राबाई ... चित्राबाईचा महेबूब आपले महेबूबभाई...

च्यायला गुल्ल्या तुझी अक्कल काय शेण खायला गेलीय काॽ उगाच फालतू बोलतोय. त्या कशा असतील तिथं आणि ते पण महेबूबभाईंसोबतॽमाझ्या या प्रश्नानं गुलबक्ष उसळला.

बस्स काॽ म्हणजे मैंने बताया तो झूटा ... आमच्या बोलण्याला काही किंमतच नाही. आम्ही खोटारडे, थापेबाज. आणि तुमचा रणजित खरा.

रणजितचा काय संबंधॽ

अरे, साब... रणजित अपनाभी अच्छा दोस्त है. चित्राबाईला तो पण चांगलं ओळखतो.

माघार घेण्याशिवाय माझ्यापुढं पर्याय नव्हता. आणि चित्राचं हे नवं प्रकरण ऐकताना माझ्या कानात गरम उकळ्या फुटत होत्या. मी त्याचा हात हातात घेतला आणिनाराज होऊ नको मित्रा. फक्त मी खात्री करून घेण्यासाठी बोललो होतो. सांग बरं काय झालं ते.’ 

माझ्या विनवणीनं तो लगेच शांत झाला. खिशातून काढलेले पान तोंडात कोंबून चावू लागला. मिनिटाभरात मुखरस त्याच्या ओठाच्या कडांतून खाली उतरू लागला. तो ओघळ तसाच ठेवत गुलबक्ष प्रात्याक्षिकासह सांगू लागला.

तर मी काऊंटरवर होतो. त्याच्या लेफ्ट साईडला हॉटेलात येण्याचा जिना आहे. त्यावरून ते दोघे आले होते. हातात हात नव्हते. पण दोघं एकमेकांना  खूपच चिटकून चालत आहे. चित्राबाईंनी काळी साडी आणि काळे ब्लाऊज घातले होते. स्लिव्हलेस होतं. पाठ पार रिकामी, मोकळी होती. केस मोकळे सोडले होते. गॉगल कपाळावर चढवला होता. ते काय म्हणतात ना झुल्फे ... ती झुल्फे चेहऱ्यावर उडत होती. महेबूबभाई त्या झुल्फांमध्येच अडकले होते. जनकराव ती लईच काटा दिसत होती. मी तिला इथं अनेकदा पाहिलं. तेव्हा फार खास वाटली नाही. पण तिथं हॉटेलात काही वेगळीच दिसली.

त्यानं चित्राचा एकेरी उल्लेख करावा, हे मला खटकलं. माझ्या चेहऱ्यावर नाराजी दिसताच गुलबक्षनं स्वतःला सावरलं.

छान दिसत होत्या त्या. मेरे बाजू में काऊंटरको टेक के खडे थे. पोट टेकवलं होतं त्यांनी तिथं छान. पदर बाजूला सरकवून बेंबीत बोटं घालत होत्या. आणि काऊंटरवाल्याकडं आलिशान रुमची चावी मागू लागल्या. मी हळूच डोळ्याच्या कोपऱ्यातून नजर टाकली तर महेबूबभाई त्यांच्या ढुंगणावर रेलले होते. नुसते रेलले नव्हते तर अंग घासत होते. मांडीला मांडी चाटवत होते. मी तर थक्क झालो. पण काऊंटरवाल्याला मजा येत होती. त्याला माझा थोडासा अडसरही वाटू लागला. त्यामुळं तो माझ्यावर डोळे वटारू लागला. म्हणून मी पतल्या गलीनं निघालो. काहीतरी विसरल्यासारखं म्हणून माघारी वळून पाहिलं तर चित्राबाई, महेबूबभाई लॉबीतून चालत निघाले होते. चित्राबाई को पुरा बगल में लेके चल रहे थे उनो.गुलबक्षनं पुन्हा जे पाहिलं ते माझ्या डोळ्यासमोर उभं केले. त्या रात्री बहुधा त्यानंही स्वप्नात चित्राला भोगली असावी.  

मी एकही शब्द बोललो नाही. माझ्या शरीरातून तुफानी लाटा उडत होत्या. त्या काऊंटरवर तिच्या अंगावर मीच रेललोय. तिच्या मांडीला मांडीला चाटवतोय, असं वाटू लागलं. पण गुल्ल्याला वाटलं की, तो जे सांगतोय, त्यावर मी विश्वासच ठेवत नाहीये. तो काहीसा चिडून म्हणाला,

भरोसा नसंल तर हाटेलाचा नंबर देतो. काऊंटरवाला दोस्त झालाय आपला. साडेनऊ हजार बिल झालं त्यांचं. एका नाईटचं. ते महेबूबभाईनं दिलं. पावती आहे त्याची. नाहीतर एक काम करा उद्या जाऊन या महाबळेश्वरला.’ 

त्याच्या ओरडण्यानं मी थोडासा भानावर आलो.

नाही, नाही गुल्ल्या तुझ्यावर विश्वास नाही असं कसं. त्या महेबूबसोबत फिरतात याची वार्ता होतीच मला. आणि तु कशाला खोटं बोलशील मला. तुझी त्यांच्याशी काही दुश्मनी नाही अन् दोस्तीही नाही. आणि मला फार अभिमान आहे यार तुझा.’ 

आँ ... अभिमान कशालाॽ

असंच रे. असू नये का अभिमानॽ

बरं, बरं.म्हणत काहीतरी काम आठवल्यानं तो निघून गेला. आणि जनकनं ठरवलं की, फार झालं. आता निग्रह करायचा आणि ही बाई नेमकी कोण आहे, हे शोधून काढायचंच. त्यासाठी तिच्या हात धुऊन मागं लागायचं.  

आणि ती संधी अक्षरशः चालून आली. इतके महिने तो चित्रासाठी आतूर झाला  होता. आठ दिवसातून दोनदा अंडरपँट ओली करत होता. तिला बिनाकपड्याचं नखशिखांत न्याहाळत होता. ते प्रत्यक्षात आणण्याची वेळ समोर उभी होऊन ठाकली.जनक अगदी भरभरून सांगू लागला. त्याच्या चेहऱ्यावर तजेला उमटला होता. जिभेतून लाळ टपकतेय की काय असे वाटू लागले.

‘भर उन्हाळ्याचे दिवस होते. उकाड्यानं सारे हैराण झाले होते. गरम वाऱ्याच्या लाटेवर लाटा अंगावर आदळत होत्या. अंगातलं पाणी शोषून घेत होत्या. पण पोटासाठी रस्त्यावर फिरावं लागणाऱ्यांपुढं दुसरा पर्यायच नव्हता.डोळ्यात वाढू लागलेलं वासनांचं जाळं मागं खेचत जनक सांगत होता. 

मी एका लग्नामध्ये होणाऱ्या नाचगाणी इव्हेंटच्या तयारीत होतो. त्या साठी माइक सिस्टिम दुरुस्त करून निघालो होतो. तर चित्राचे विश्वासू शिपाई गोटेमामा दिसले. चांगल्या भारीच्या कारमध्ये. आँ, ही काय भानगड ... गोटेमामांना लॉटरी लागली की काय. का वडिलोपार्जित जमिन मिळाली हायवे टचवरची, असं मला वाटत असतानाच चक्क कार माझ्यासमोरच येऊन थांबली. गोटेमामा खाली उतरले. त्यांच्या हातातली पिशवी पाहून मला लक्षात आलं की, मामा अजूनही शिपाईच आहेत. कार त्यांची नाहीये. तोपर्यंत माझ्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्ह पाहून ते म्हणाले,

बाईसाहेबांनी दोन कार घेतल्यात. एक साहेबांसाठी आणि एक त्यांच्यासाठी. नवा बंगलाही घेतलाय. टेप खरेदी केला होता साहेबांनी. त्याची डिस्क सारखी अडकतीय म्हणून दुरुस्तीसाठी टाकला होता. तो घ्यायला आलोय. ड्रायव्हरपण ठेवलाय आता. किशनदास नावंय. चांगला पोऱ्या आहे. बसलाय गाडीत तो.’

माझ्यावर तर नव्या माहितीचा बाँबमाराच झाला. त्यातून स्वतःला सावरत मी विचारलं,

हा बंगला कुठंयॽ

आधीच्या घराच्या समोरच्या बाजूला कॉलनी आहे नं, ब्ल्यू स्काय नावाची. तिथं ६९ नंबरचा प्लॉट आहे.असं सांगून गोटेमामा दुकानात वळाले.

आपल्याला काही कळवलं नाही तिनं नव्या बंगल्याचं. बरं, नव्या घरात राहायला गेली की नाही, हे गोटेमामांना विचारायचं राहूनच गेलं. मग थेट नव्या घरात जावं काॽ तिला ते आवडेल का. आणि जाऊन काय बोलायचं. घरी जाऊन बोलावं असं काही काम नाहीये. तिनं विचारलं की कशासाठी  आलास तर काय सांगावं. तुझा खरा चेहरा कळून घेण्यासाठी, तुझ्यासोबत खेळ रचण्यासाठी आलोय, असं सांगून टाकावं का. आणि आपण एवढे थेट बोललो अन् तिनं हाकलून दिलं तर, अशा एक ना अनेक विचारांनी मी गुंग होऊन गेलो. बाकीची काही कामंच सुधरंना. भय्यासाहेबसर, दिवाकरसाहेबांच्याही ते लक्षात आले.काय रे काय झालंयॽअसंही त्यांनी विचारलं. आता यात फार वेळ घालवता येणार नाही. जे काही आहे ते करून टाकावे किंवा पूर्ण सोडून द्यावे, अशा निर्णयापर्यंत आलो. पण सोडून देणं योग्य नाही. अशी बाई  जाऊ देणं म्हणजे मुर्खपणा होईल, हे माझं एक मन सारखं ओरडून  ओरडून सांगत होतंच. मग दोन दिवस धीर धरून मी दुपारच्या वेळी तिच्या नव्या बंगल्यात पोहोचलो. गेटवर तिच्या आणि रामदासच्या नावाची एकत्रितचित्रादासअशी वेलबुट्टीदार अक्षरातली पाटी रोवलेली होती. दोन गुलाबी रंगाचे दिवे भर दुपारी त्यावर प्रकाश टाकत होते. पार्किंगला दोन आलिशान कार उभ्या होत्या. मी साशंक मनाने आत शिरलो. मुख्य दरवाजा लोटलेलाच होता. बहुधा बेडरुममध्ये फर्निचरचं जोरदार काम सुरू होतं. चित्रा हॉलमधल्या सोफासेटवर निवांत डोळे मिटून बसली होती. तिचा चेहऱ्यावर छान बटा येत होत्या. ओठाच्या उजव्या बाजूच्या तीळाला ती हळूच जिभेने स्पर्श करत होती. समोरच्या खुर्चीवर रामदास कागदाच्या भेंडोळ्यांवर आकडेमोड करत मग्न होता. स्वयंपाकखोलीतल्या एसीची मंद झुळूक येत होती. 

माझी चाहूल लागल्यानं चित्रा एकदम दचकल्यासारखी उठली. मला पाहून तिला आश्चर्य वाटलं. पण माझ्या अपेक्षेनुसार ती काही चिडली, वैतागली, संतापली नाही. पण तिला आनंद झाला असंही नव्हतं.

अरे, कसं कायॽ अचानक...

रामदास तंद्रीतून ढळला नाही. मात्र, मान कागदातच मोडत त्यानं 

व्वा  ... व्वा ... वेलकमअसं म्हटलं.

बसा ...  बसा ना. खूप पसारा पडलाय. प्लीज या. गोटेमामा नाहीत. मी पाणी आणते.असं म्हणत ती किचनकडे वळाली. मी  तिच्या पाठमोऱ्या देहाकडं पाहू लागलो. घरात खूप सारे लाईट लागले होते. किचनकडे जाणाऱ्या लॉबीत फूटलँप होते. त्यांच्या प्रकाशात जणूकाही ती भिजत चालली होती. माझं रक्त उसळू लागलं. कारण फुट लँपचा प्रकाश तिच्या गाऊनमधून आरपार चालला होता भोंगळी होती ती. पूर्ण नागडी. स्लीव्हलेस, भल्या मोठ्या गळ्याचा गाऊनपण आरपारवाला होता. ती पाण्याचा ग्लास घेऊन आली तेव्हा मी तिला अक्षरशः डोळ्यांनी गिळून टाकलं. मला वाटलं आपल्या मनातला खळबला तिला नक्कीच कळाला असणार. ती अस्वस्थ  होईल किंवा प्रतिसाद देईल. पण दोन्ही झालं नाही. जणू आपण साडी घालूनच आहोत, अशा थाटात ती खुर्चीवर रेलली. आणि पाय उचलून मांडी घालून बसली. तेव्हा तिनं गाऊन चांगला गुडघ्यापर्यंत वर आणून खाली टाकला. मी तिच्याकडं खिळून पाहतोय. तिचं शरीर पिऊन टाकतोय, हे तिच्या लक्षात आलं असावं. पण जणू काही घडलंच नाही, असा तिचा अविर्भाव होता. 

काय, कसं येणं केलंॽतिनं मला तिच्या विळख्यातून बाहेर आणलं.

अं ... असंच.

नाही ... नाही ... तुम्ही असंच येणार नाहीत. काहीतरी काम घेऊन आले असाल.तिच्या बोलण्यात बराच तुटकपणा होता.

नवीन बंगला घेतला. खूप सारं फर्निचर केलं. भला मोठा टीव्ही घेतला. हे सारं तिला जणू लपवायचं होतं. हा विषय मी काढू नये, असा तिचा प्रयत्न होता. पण मला आधी तेच उकरून काढायचं होतं. मी उगाच जागेवरून उठल्यासारखं केलं तर तिला माझा हेतू लक्षात आला असावा. ती एकदम दचकल्यासारखी झाली आणि रामदासकडं मधाळ, कौतुकाची नजर टाकत, त्याचा आदरपूर्वक उल्लेख करत म्हणाली,

यांचा खूप आग्रह होता. थोडं मोठं घर पाहिजे असा. किमान एक मोठा हॉल, चार-पाच बेडरुम. पंचवीस - तीस कुंड्या लावता येतील एवढं अंगण पाहिजे.

ती आपल्याला विनाकारण महत्व देत असल्याचं बहुधा रामदासलाही माहिती असावं. त्यानं कागदातून अजिबात नजर न काढताखरंय, पण तुमचं बोलणं चालू ठेवा. थोडावेळ मला नका घेऊ त्यात. हे एका कंपनीचं कामंय. ते पूर्ण करतो. किचकटंय.असं सांगितलं. थोडक्यात त्याला चित्रा काय सांगतेय, यात अजिबात स्वारस्य नव्हतं. मात्र, मी निघून जावं, अशी त्याची इच्छा नव्हती. मलाही ठाण मांडायचं होतं. पण आम्हा दोघांपेक्षा ती अधिक शक्तीमान आणि हुशार होती. तिनं मोठ्यानं जांभई देत म्हटलं की,

चहा घेणार की कॉफी.

मी चहा असं म्हणण्याच्या आत तिनंमला तर खूप झोप आलीय. फर्निचर कामाच्या आवाजानं थकवा आलाय.

मी निघावं, असं तिनं अप्रत्यक्षपणे सुचवलं. मला निघावंच लागलं. ही आपल्याला वश होईल की नाही, अशी शंका मनात येण्यास आणि तिची माझी नजरानजर होण्यास एकच वेळ झाली. तिच्या डोळ्यात आर्जव असावं, काहीतरी वेगळंच सांगण्याचा ती प्रयत्न करत असावी, असं मला वाटलं. कदाचित तो माझा लाळघोटेपणा असावा किंवा तिच्या  शरीराची आस. मी पराभव किंवा माघार मान्य करण्यास तयारच नव्हतो. ती माझ्यासोबत पलंगावर खेळण्यास खूप आसुसलेली  आहे. पण रामदासमुळं ती सांगू शकत नव्हती, असा ग्रह मी करून घेतला. तसं नसतं तर तिनं माझ्यासमोर बसताना गाऊन गुडघ्यापर्यंत का ओढला असता. माझ्या डोळ्यात डोळे का घातले असते. माझ्यासाठी पाणी का आणलं असतं. असे प्रश्न मीच  स्वतःला विचारून विजयी स्मित केले. मला एकदम जितुसोबतचा तिचा शेकहँड आठवला. वाटलं आपणही तिच्यापुढं हात करावा. पण तेवढ्यावर समाधान मानणं शक्य नव्हतं. म्हणून मी पुन्हा एकदा तिला नजरेनं पिऊन बाहेर पडलो. तरंगतच खोलीवर पोहोचलो.

जनक आता खूपच उत्साहित झाला होता. माझ्यासारख्या लेखकाला मोहीत करण्याची कला आपल्याला प्राप्त झाली आहे. गेली वीस वर्षे ज्याच्या कादंबऱ्या वाचत आहेत. त्यातील व्यक्तिरेखांबद्दल कायम चर्चा करत आहेत. अशा लेखकाला आपण एका वेगळ्याच जगात घेऊन जात आहोत. त्यानं मांडलेल्या महिलांची वर्णनं कशी अपुरी आहेत, हे पटवून देण्यात आपल्याला किती छान यश मिळतंय, असा त्याचा चेहरा झाला होता. मीच त्याला थांबवत एखादा पेग घेण्यास सुचवलं. ते त्याला खूप आवडलं. 

लेखकाकडून ऑफर म्हणजे नाकारणं कठीणअसं म्हणत त्यानं झटपट पेग भरला आणि घशाखाली उतरवला. अहा ... हा मजा आली. तुम्हालाही येईल आता. त्यानं खिडकीत उभं राहून सांगणं सुरू केलं. तो तिच्यात गुंतला होता. तिला गुंतवण्यासाठी तो धडपडू लागला होता. पुढं जे झालं. ते त्यानं सांगितलं. ते तुम्हाला शब्दशः ऐकवतो.

अशा अवस्थेतल्या चित्राला पाहून डाखाळलेल्या जनकला चारही बाजूनं घेरल्यासारखं झालं होतं. आपण या पूर्वी अनेकवेळा तिचं खरं रूप जाणून घेण्याचं ठरवलं आणि सोडून दिलं. पण आता अशी संधी वारंवार येणार नाही. असं त्यानं त्या रात्री मनाला लाखवेळा बजावलं. मनाला जे वाटतंय ते प्रत्यक्षात आणण्यासाठी तो अतिशय उत्सुक होता. तिला एकांतात भेटण्यासाठी तो धडपडू लागला. तिच्याशी चार-पाच भेटीगाठी झाल्या. त्यातली एखादी रात्रीला झाली तर चित्रा आपल्यासोबत पलंगावर असेल अशी त्याला खात्री वाटू लागली. आणि त्याला वाटलं की, खरंतर हिला आपण शहराबाहेर भेटलं पाहिजे. म्हणजे आपण अधिक मनमोकळं बोलू शकतो. बोलण्यापेक्षा वागू शकतो. तिच्या जवळ, खूप जवळ जाऊ शकतो. जसं ती कोणासोबत हॉटेलात मुक्काम करते. तसा आपल्या सोबतही केला तर ... तर ... तिच्यासोबत खूप खेळता येईल. स्वर्ग हॉटेलातल्या खोलीत पलंगावरच उतरेल. बाथटबमध्ये, शॉवरखाली तिच्यासोबत भिजता येईल. स्वप्नरंजनात भिजून जनक ओला झाला होता. नियतीनं त्याला तिच्यासोबत बांधण्याची संधी मिळवून देण्याचं ठरवलंच होतं. 

॥ फ ॥

गोटेमामा आणि चित्राचा अकाऊंटंट शिरीष बोंडे स्टेशनरीच्या दुकानात शिरताना जनकनं पाहिलं. गोटेमामांशी त्याचा चांगला परिचय होताच. बोंडेशी फक्त तोंडओळख होती. त्यामुळं त्याच्यासमोर गोटेमामाशी चित्राबद्दल कसं काय बोलावं, असं त्याला वाटलं. पण ते काहीक्षणच टिकलं. तुफान वेगानं वाहणाऱ्या नदीकडं काठावरची वाळू जशी ओढली जाते. तसा तो तिच्याकडं ओढला जात होता. त्यानं लगेच  गोटेमामांना गाठलं. 

अरे, जनकभाऊ ... खूप दिवसांनी ... कुठं आहात.

इथंच आहे की. सध्या बरीच कामं सुरू आहेत ना.

व्वा. वा. चांगलंय. हाताला काम असलंच पाहिजे.

तुमचं कसं चाल्लंय मामा.

आमचं एकदम छान. एजन्सी भरारा पळतीय देवाच्या कृपेनं आणि बाईसाहेबांच्या मेहनतीनं.

मामांनीच चित्राचा विषय काढल्यानं पुढं सरकण्याची संधी जनकला होती. पण तिच्याबद्दल मामांकडं बोलून उगाच संशयाला संधी नको, असा विचार त्यानं केला. आणि तो म्हणाला

तुमच्या मुलाचं काय चाल्लं. पुण्याला आहे ना तो.

कौटुंबिक चौकशीनं मामा सुखावले. आणि त्यांनी नवं घर घेतलंय. मुलीचं लग्न झालंय, असं बरंच काही बोलू लागले. त्यानं शिरीष अस्वस्थ झाला. निघण्याच्या खाणाखुणा करू लागला. मग जनकनं त्यालाही हॅलो केलं,

काय बोंडेसाहेब ... माझं अकाऊंट अजून सेटल केलं नाहीत तुम्ही. तीन हजार बाकी आहेत अजून.

या बोलण्यावर शिरीष थोडा वरमला. 

करून टाकू. या तुम्ही महिन्याअखेरला. आणि मी म्हटलं होतं त्या दोन्ही पावत्या घेऊन या.

मग गोटेंकडं वळत त्यानं धाडस दाखवत विचारलं,

चित्रा मॅडम, दिसत नाहीत आजकाल जास्त. रामदाससर पण नाही दिसले कुठं पुस्तक प्रकाशनाला. कपडे खरेदीला.

अरे ... तुम्हाला माहितीच नाही का? मॅडमनी केमिकलची डिलरशिप घेतलीय. कुठली केरळची एजन्सी आहे. सात-आठ केमिकल्स येतात. इथून आपण हरियाणा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये पाठवतो. एक गोडावून तयार करून घेतलंय.

ओह ... अरे वा. जोरदार प्रगती आहे.’  

हो तर. तुमची चक्करच नाही अशात.

हो ... वेळच नाही मिळाला एवढा. बाहेरगावी जावं लागत होतं सारखं.त्यानं थाप मारून टाकली. 

बरं .. बरं. पण वेळ मिळाला की या. तुमचं बिल सेटल करून टाका शिरिष साहेबांकडं. अरे, हो ही केमिकलची एजन्सी घेतली ना बाईंनी. तर त्याच्यासाठीच्या ट्रेनिंगसाठी साहेब गेलेत बेंगळुरूला. तीन महिन्याचं ट्रेनिंग बेंगळुरुला आणि दोन महिन्याचं कोलकोत्याला आहे. त्या केमिकल तयार करणाऱ्या कंपनीनंच सगळी ॲरेजमेंट केलीय त्यांची.

॥ म ॥

गोटेमामांनी एकदम महत्वाची माहिती दिली होती. जनकचे डोळे चमकू लागले. शरीरातून पुन्हा एकदा वीज सळसळू लागली. रात्री फ्लॅटवर परतल्यावर त्यानं तिला कॉल करण्यासाठी तीनचार वेळा मोबाईल हातात घेतला आणि पुन्हा ठेवून दिला. असं बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटण्याची मजा काही औरच आहे, हे त्याला माहिती होतं. दोन दिवसांनी रविवार आहे. आणि रविवारी ती निवांत असते. हेही त्याला पक्कं ठावूक होतं. म्हणून त्यानं नाईलाजानं मोबाईल ठेवून दिला. डोळे मिटून तो झोपेची आराधना करू लागला. पण गोटेंनी सांगितलेली माहिती पुन्हा पुन्हा त्याच्या विचारात वावटळीसारखी फिरू लागली. रामदास बाहेरगावी गेलाय. या पेक्षा मोठी संधी आपल्याला कधीच मिळणार नाही. तिच्या घरातच तिला आपण खेचू शकतो. ती खरंच पुरुषांना खेळवते का, की खेळवायचं फक्त नाटक करून खेळत राहते, हे आता सहज कळू शकतं, असा त्याला विश्वास वाटू लागला होता. आतापर्यंत तिच्या जवळ जाण्याची संधी आली होती. पण ती फुटकळ होती. भेटीत निवांत वेळ नव्हता. तिच्याशी बोलत बोलत तिला उलगडावं. तिनं आपल्याशी घडघड खरं बोलावं. तिची काही प्रकरणं असतील तर ती सांगून टाकावी. त्यात झालेल्या चुका सांगाव्यात आणि आपल्यासोबत लाँग लाईफ रिलेशनसाठी तयार असल्याचं सांगावं, असं जनकला वाटत होतं. तो एखाद्या नवथर पोरासारखा सगळा सीन डोळ्यासमोर उभा करून तिच्याकडं टोकदार नजरेनं पाहत होता. ती आपल्याकडं पाहून मिश्किल हसतेय. मध्येच डोळा बारीक करून बोलतीय. गाऊन मांड्यापर्यंत वर ओढून आपल्याला मांडीवरील विनोद खन्नाच्या नावाचं टॅटू दाखवतेय, असा त्याला भास होऊ लागला. काही मिनिटातच तो या भासानं वैतागला. एवढं संशयास्पद चारित्र्य असलेल्या बाईनं आपला एवढा वेळ घेणं चांगलं नाही. आणि आपण तिला एवढा वेळ देणं, हा निव्वळ मुर्खपणा आहे, असं त्यानं चांगलं चार-पाच वेळा मनाला बजावलं. अन् अचानक त्याला कॉलेजातला मित्र धनंजयच्या सल्ल्याची आठवण झाली. तो पटकन उठून आरशासमोर जाऊन उभा राहिला आणि चित्राच्या विचारात फार वेळ गुंतायचं नाही. जे काही तिच्याबद्दल करायचं आहे, हे फार झालं तर आठ दहा दिवसात उरकून घ्यायचं, असं तो आरशामध्ये स्वतःला पाहून बजावू लागला. चांगली दहा मिनिटे अशी बडबड केल्यावर त्याचं मन शांत झालं. मग उद्याचं कामकाज नोंदवण्यासाठी त्यानं भिंतीवरचं कॅलेंडर काढून हातात घेतलं. अरेच्या हे तर मागच्या वर्षीचं आहे, असं भिरकावलं. पण हे भिरकावतानाच त्याच्यावर उद्याच्या  तारखेत आपण गेल्यावर्षी काहीतरी लिहिलं होतं, हे त्याच्या लक्षात आले. त्याने उत्सुकतेपोटी कॅलेंडर पुन्हा उचलून ती तारीख, तारखेच्या चौकटीत काय लिहिलं ते न्याहाळलं आणि त्याला जोरदार हसू फुटलं. कमालीचा खुश होत तो म्हणाला, हिचा वाढदिवस असा लक्षात यायचा होता माझ्या. म्हणून मागल्या वर्षाचं कॅलेंडर असं इथं राहिलं होतं. व्वा ... उद्या सकाळी पहिला कॉल करून तिला छान विश करतो. आणि दुपारी मस्त गिफ्ट घेऊन जातो. मोगऱ्याचा गजरा ... नको, नको. बुके घेऊन जातो. आणि एक एकदम भारीचा गाऊन. झिरझिरीत. पातळ. हे बेस्ट राहिल. नेमकं आपण गेल्यावर दुसरं कोणी आलं असेल तर गाऊन तिथंच देता येणार नाही. तिच्या बंगल्याच्या मागच्या बाजूनं तिच्या खोलीची खिडकी उघडी असते बऱ्याचवेळा. त्यातून टाकून देऊ गाऊन. तेवढंच तिला सरप्राईज. चित्राजवळ अशा पद्धतीनं जवळ जाण्याचा मार्ग सापडल्यानं जनक मनात खुशीची गाजरं खाऊ लागला. गाजरं खात खातच कधी त्याचे डोळे मिटले त्याला कळले नाही. 

 सकाळी नऊच्या सुमारास ती उठून तयार झालेली असते. वाढदिवसाच्या दिवशी तर नक्कीच, असं म्हणत त्यानं मोबाईलवर कॉल केला. आणि च्यायला, नंबर बदलला की कायॽ असं पुटपुटत लगेच कटही केला. काही क्षण थांबून त्यानं पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट लिस्ट चेक केली. नंबर तर तोच होता. त्यानं किंचित वैतागून कॉल केला.अरेच्या, हे काय नवीनच. मोबाईल दुसऱ्या कोणाजवळ दिला की काय हिनंअशी शंका त्याला आली. कोण असेल, याचा विचार करत असतानाच तिचा कॉल आला. त्यानं घाईघाईत उचलून अतिशय आनंदी स्वरात

हॅलो... विश यु व्हेरी ... व्हेरी...असं म्हटलं.

पलिकडून अतिशय कडक, पुरुषी आवाजात उत्तर आलं,

थांबा ... थांबा एक मिनिट. मॅडम पायऱ्या चढून येतायत अजून. एक मिनिट होल्ड करा.

काही पर्यायच नसल्यानं ओके, असं म्हणत तो थांबला. पण चित्रासोबत कोण, या विचारानं त्याच्या डोक्यात भणभणू लागलं. मोबाईल कट करावा. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा बेत गुंडाळून ठेवावा, असं त्याला वाटू लागलं. तो तसं करणार तेवढ्यात तिचा अतिशय उत्साहात आवाज आला. ती जणू काही चित्कारतच होती.

हाय... हॅलो ... थँक्यू ... थँक्यू व्हेरी मच. तुझे आभार कोणत्या शब्दात मानावेत हेच कळत नाहीये मला.

खळाळत्या, निर्मळ पाण्यात गोड साखरेचा पाक सोडलेला असावा, असे माधुर्य तिच्या आवाजात होते. त्या आवाजात तो तिच्यावरील राग विरघळून गेला. काही क्षणापूर्वी तिच्या मोबाईलवर कोणा पुरुषाचा आवाज ऐकून आपण प्रचंड थरथरलो होतो, याचाही विसर त्याला पडला. त्यानं अधीरपणे विचारलं,

थँक्यू व्हेरी मच कशासाठी...

अरे, माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ना तू. इथं एवढी शांतता आहे ना की तुझं विश यु व्हेरी ... व्हेरी मला दहा फुटावरही स्पष्ट ऐकू आलं. आता विश यु व्हेरी च्या पुढं हॅपी बर्थ डे असेलच असं मी जोडून घेतलं. कारण माझा आज वाढदिवस आहे. आणि तु अतिशय लक्षात ठेवून मला शुभेच्छा दिल्या आहेत. मला गेल्या कित्येक वर्षात असं कोणी लक्षात ठेवून सकाळी सकाळी हॅपी बर्थ डे म्हणालेलं नाही. सो ... थँक्यू सो मच. तुझ्या शुभेच्छामुळं मी आणखी तरूण झालेय, थँक्स जनक.

चित्राच्या या लाघवी बोलण्यानं तो अक्षरशः वेडावून गेला. ती कोणासोबत फिरतेय, हा काही क्षणापूर्वी त्याला पागल करणारा प्रश्न विचारणंही त्यानं सोडून दिलं होतं. एवढ्या लाडात छान बोलतेय आपल्याशी तर तिच्या पर्सनल भानगडीत कशाला तोंड खुपसायचं. आपल्याला तिच्याकडून जे हवंय ते मिळण्याशी मतलब, असा एकदम पिवळ्या पुस्तकातला विचार तो करू लागला. तो शांत झाल्याचं लक्षात येऊन तिनं लाडिक, अवखळ स्वरात विचारलं,

काय रे, नुसत्या शुभेच्छा देतोयस की काही गिफ्ट आणलंय.

आँ ... नाही. तुम्ही नाहीत ना इथं. बाहेर आता कुठंतरी.

अरे, साहेबा ... उगाच काहीतरी फेकू नकोस. तुला माहिती नव्हतं हां. की मी बाहेरगावी आलीय ते. कॉल केल्यावर तुला कळालंय की चित्रा सिटीमध्ये नाहीये.

अं... हो ... खरंय. पण मी आणतो नक्की. केव्हा परत येणार आहात तुम्हीॽ

अरे, राहू दे रे. उगाच काही खर्च करू नकोस. आठवण ठेवून शुभेच्छा दिल्या त्याच लाखो रुपयाच्या आहेत.

थँक्स, पण केव्हा परत येणार तुम्हीॽ

मी कोल्हापूरला आले होते. आता परतताना सिंहगडावर आलीय. नुकताच पाऊस पडून गेलाय. थंडगार वारा सुटलाय. खूप सुंदर वातावरण आहे. एका पाठोपाठ एक सुंदर कविता कराव्यात. मोठमोठ्यानं पावसाची, वाऱ्याची गाणी म्हणावीत, असं वाटतंय. तु असतास इथं तर तुला खूप आवडलं असतं.

ओह ... ग्रेट ... खूपच छान. तुम्ही म्हटलं असतं तर आलो असतो मी.जनकनं खडा टाकला. पण तो तिच्यापर्यंत पोहोचलाच नाही. ती बोलतच राहिली. आज तिच्यात जणूकाही निसर्गप्रेमाचा संचार झाला होता. तिच्या गावाची आठवण तिला हुरहुरून टाकत होती. आणि कोणीतरी आपला वाढदिवस एवढा लक्षात ठेवून शुभेच्छा देतंय, या जाणिवेनं तर तिच्या मनात आनंदाच्या लाटा उसळत होत्या. ती भरभरून जनकला सांगू लागली.

आपण आपल्या रोजच्या कामात इतके डोके खूपसून घेतो ना की, जगात इतकं सुंदर काही आहे, हे आपल्याला माहितीच होत नाही. यु विल लव्ह धिस. जमेल तेव्हा नक्की इकडं चक्कर मार. इथं पावसाळ्यातच ही मौज असणार. सगळा परिसर हिरवाईनं, रानफुलांच्या ताटव्यांनी नटला आहे. डोंगरमाथ्यावरून इतके झरे फुटले आहेत ना की मोजणं कठीण झालंय. नुसता गार वारा वाहतोय. असं वाटतंय की या वाऱ्याच्या झोक्यावर मी उडून फिरत जाईन एखाद्या फुलासारखी. अलगद, अलगद या डोंगरावरून त्या डोंगरावर.तिचं असं बोलणं किती वेळ चालणार असा प्रश्न जनकला पडला. तिला थांबवत त्यानं पुन्हा मघाचाच प्रश्न आवाजात खूप मधाळपणा आणत विचारला.

केव्हा येणार आहात तुम्हीॽ उद्या की परवा. आल्यावर भेटायचं आहे. आणि कोणासोबत आहात तुम्हीॽ रामदास तर वाटले नाहीत आवाजावरून ...

ती भानावर आली.

अरे, कळंबचे डीवायएसपी आहेत ना सुदाम शेडगे. आपल्याकडं होते बघ सात-आठ वर्षांपूर्वी. त्यांचं गृहमंत्र्यांकडे एक काम होतं. थोडंसं कटकटीचं होतं. लोणी लावायचं होतं कामासाठी. तर ते मला घेऊन आले होते. सरकारी कामासाठी प्रायव्हेट दौरा. निवांत भेट झाली गृहमंत्र्यांची. काम मार्गी लागलंय. त्यामुळं परत निघालो. पण आजची रात्र पुण्यात कदाचित मुक्काम करावा लागेल. उद्या पुण्यात एकदोन भेटीगाठी आणि काही खरेदी आहे. त्यामुळं रात्री उशिरा निघून पहाटे पोहोचेन मी. सुदाम आज पुण्यातच मुक्काम करून पहाटे जातील कळंबला...

सहा फुटाच्या आसपास उंची. एकदम दणकट बांधा. दाट केस. बारीक पण टक लावून पाहणारे डोळे, झुबकेदार मिशा या मुळे भितीदायक वाटणारे सुदाम शेडगे बहुचर्चित होते. दोन पुतण्यांच्या नावानं दारू विक्रीची लायसन्स, एका मेव्हण्याच्या नावावर पेट्रोल पंप आणि दुसऱ्या मेव्हण्याच्या नावावर हायवेला थ्री स्टार हॉटेल असलेल्या सुदाम काळेंना जनक चांगलंच ओळखत होता. त्यांच्या दोन तीन पार्ट्यांना जेवण्याची आणि गाणे बजावण्याची व्यवस्था जनककडंच होती. हप्तेबाजीत एक नंबर असलेले सुदाम पैसा सोडण्यात फारच चिकट होते. आणि बायकांच्या बाबतीतही लोचट होते. पार्टीत कव्वाली म्हणण्यासाठी खास पुण्याहून आलेल्या फातिमा-नुसरत भगिनींच्या मागं ते हात धुऊन लागले होते. त्यातल्या नुसरतला त्यांनी पोलिसी बळाचा वापर करून ठेवून घेतले, अशीही चर्चा होती. त्यामुळं अशा माणसासोबत चित्रानं अगदी सहजपणं फिरावं, हे त्याला खूप खटकलं. ती किती सहजपणे परपुरुषांसोबत फिरते. नुसती फिरतच नाही तर परगावातल्या हॉटेलात मुक्कामही करते. लोणी लावण्याच्या नावाखाली चांगला पैसा कमावते आणि शरीर सुख देते अन् मिळवतेही. एवढं करूनही तिच्या चेहऱ्यावर काहीही उमटत नाही. बोलण्यात कधी जाणवत नाही. हे सगळं तिला कसं जमतंॽ हे आपण जाणून घेतलंच पाहिजे, असं त्यानं पुन्हा एकदा मनाला बजावत मोबाईल कट केला. तेवढ्यात पुन्हा रिंग वाजली. पाहिलं तर दिवाकररावांचा कॉल होता. गेल्या तीन-चार वर्षात त्यांनी क्वचितच जनकला स्वतःहून कॉल केला होता. ते अत्यंत कमी आणि कामापुरतं बोलत. आताही काहीतरी महत्वाचं काम असणार हे त्याच्या लक्षात आलं. दिवाकर म्हणाले

अरे, संध्याकाळी किंवा उद्या सकाळी पुण्याला पोहोचायचं. रेल्वे स्टेशनच्या जवळच आहुजाचं मोठं गोडावून आहे. तिथं चार मोठ-मोठ्या खुर्च्या आल्या आहेत आपल्या. वधू-वरासाठीच्या लेटेस्ट खुर्च्या आहेत. गोडावूनच्या जवळच चार-पाच ट्रान्सपोर्ट कंपन्या आहेत. त्यातल्या एकाकडं जाऊन खुर्च्या लोड करून टाकायच्या. कळालं.

हो....हो.

थोड्या वेळानं ऑफिसवर येईन ॲडव्हान्स आणि आहुजाची पावती घेऊन जा.

येतो. तासाभरात.

खुर्च्या लोड करून झाल्यावर वाटलं तर पुण्यात भटकून घे. मुक्काम केला तरी चालेल. परवाच्या दिवशी परत येशील. म्हणजे पुढील कामं करता येतील.

शिंदेंनी कॉल कट केला. आणि जनकच्या आनंदाला उधाण आलं. त्याचं मन थरथरू लागलं. उडू लागलं. चित्रा उद्या पुण्यात मुक्कामी आहे. आपल्यालाही मुक्काम करता येईल. त्यामुळं तिच्यासोबत हॉटेलात राहण्याची आयती संधी चालून आली आहे, हे त्याला लक्षात आलं. पण हे तिला सांगावं कसं असा प्रश्न होता. त्यानं धाडस करायचं ठरवलं. आपण हाताला धरून ओढलं आणि ती संतापली तर अजिबात डगमगायचं नाही. मांडीवर बसवून घेत सरळ तिला मनातील भावना व्यक्त करून टाकायच्या. तिच्या भल्या मोठ्या बुब्ससोबत खेळायचंच. तिला पलंगावर थकवायचं असं त्यानं मनाला बजावलं. दिवाकरसाहेबांना कळालं तर काय होईल, रामदासला काय वाटेल, याचा विचारही त्याच्या मनात येणं शक्य नव्हतं. आनंदाच्या पिसांवर तरंगत त्यानं ब्ल्यू विंडो बार गाठला. एक पेग पोटात गेल्यावर पुन्हा तिला कॉल केला. एक क्षण त्याला वाटले की, कॉल सुदाम काळेंनीच उचलला. ती त्यांच्या मिठीत गच्च बसलेली असावी.

हॅलो ... एक असं झालंय की मला आमच्या मालकांनी पुण्याला जायचा सांगितलंय.

अरे व्वा. मग जा की ... पण काय विशेष.

काही सामान खरेदी करून ट्रान्सपोर्टमध्ये लोड करायचं.

हं ... मग त्यासाठी मला कॉल केला की काय? लोड करण्यासाठी...चित्रा खट्याळपणे म्हणाली. तिचा सूर ऐकून जनक घायाळ झाला. स्वतःला सावरत म्हणाला,

नाही हो. तसं नाहीये. माझं म्हणणं होतं की, मला एक मुक्काम करावा लागणार आहे पुण्यात. तर तिथं तुमची भेट होऊ शकते का? थोड्या गप्पा मारल्या असत्या. मनमोकळ्या.

पुण्यात ... अं...

सुदाम शेडगेतर गेले असतील ना?’ या प्रश्नावर तिनं काही उत्तर दिलं नाही. उलट प्रतिप्रश्न केला.

किती तास?’

म्हणजे मला नाही कळालं...

अहो, किती तास भेटायचंय. म्हणजे माझा प्लॅन बदलतोय. म्हणून विचारलं. तुमच्यासाठी थोडावेळ थांबेन मी पुण्यात. शक्य झालं तर उद्या सकाळी सात वाजेच्या सुमारास बस स्टँडजवळ आहे मी. तुम्ही म्हणताय तर भेटू. गप्पा मारू मनमोकळ्या. एक जेवण घेऊ. वाटलं तर मुक्काम करेन. मुक्कामाची सोय माझ्यातर्फे हां.तिच्या या निमंत्रणानं जनकच्या मेंदूत झिणझिण्या येऊ लागल्या. पलंगावर तिच्याशी खेळता खेळता, तिच्या ओठांवर ओठ टेकवता टेकवता, तिचे बुब्स कुस्करून काढताना तिचा खरा चेहरा जाणून घेण्याचा प्रसंग जवळ आल्याचं त्याला वाटू लागलं. तिच्याशी काय बोलायचं, काय विचारायचं.  तिच्या भानगडींबद्दल तिला बोलण्यास कसे भाग पाडायचे, याची तालीम त्यानं दहादा करून घेतली. केव्हा एकदा पुण्यात पोहोचतो, असे त्याला झाले होते. त्यामुळं दारूचा किंचित अंमल कायम असतानाच तो ऑफिसवर पोहोचला. त्याचं नशिब जोरावर होतं. मालक नव्हते. त्यांनी ॲडव्हान्स, आहुजाची पावती काऊंटरवर ठेवलेली होती. ती खिशात टाकून त्यानं थेट बस स्टँड गाठलं. तिथं नेहमीप्रमाणे खच्चून गर्दी होती. नुसता कोलाहल सुरू होता. त्या आरडाओरड्यानं तो खुश झाला. आता नेमकी कुठली बस पकडावी, या विचारात असतानाच पुणे मार्गे सोलापूरला जाणारी एसी बस आली. गर्दीत घुसण्याचं सगळं कौशल्य पणाला लावून त्यानं खिडकीजवळची सीट पकडली. बस पुण्याकडं निघाली तेव्हा त्यानं घड्याळात पाहिलं. तेव्हा रात्रीचे बारा वाजत आले होते. म्हणजे आपण सकाळी पाचच्या सुमारास पुण्यात पोहोचू. दोन तासात खुर्च्या लोड होतील. चित्रानंही सात वाजता पुण्यात बसस्टँडजवळच येण्यास सांगितलं होतं. तिला कसा काय अंदाज आला असेल आपल्या प्रवासाचा. असा विचारही त्याच्या मनात आला. आणि त्यानं तसं तिला विचारलंही तर ती उत्तर देण्याऐवजी खळखळून हसू लागली, असा भास त्याला झाला. आणि मग तिच्या शरीराला न्याहाळत न्याहाळत त्याला डोळा लागला. बस थेट पुण्याच्या हद्दीत शिरल्यावरच जाग आली. पहाटेचा गारवा त्याला सुखद करत होता. बस स्टँडवर उतरताच त्यानं त्याचं नेहमीचं सावली हॉटेल गाठलं. फ्रेश होऊन, चहा घेताच त्याचं शरीर एकदम ताजंतवानं झालं. झपझप पावलं टाकत तो आहुजाच्या गोडावूनवर पोहोचला. पावत्या दाखवून त्यानं खुर्च्या रिक्षात लोड केल्या. आणि नॅशनल रोडलाईन्सवर पोहोचला. तिथं त्याच्या अपेक्षेएवढी गर्दी नव्हती. त्यामुळं पटकन काम झालं. त्यानं खुर्च्या आपल्या नजरेसमोर पॅक झाल्या पाहिजेत, असे त्या ट्रान्सपोर्टवाल्याला सांगितलं. त्यानंही ते मान्य केलं. खुर्च्या ट्रकमध्ये चढवल्या जात असल्याचं पाहून त्याला समाधान वाटलं. आता आपण चित्रासाठी एकदम मोकळे झाले आहोत. उद्या सकाळपर्यंत काहीही काम नाही. आता फक्त शरीराचा भोग.

॥ ज ॥

जनकची भिरभिरती नजर अक्षरशः एखाद्या परदेशी दारुच्या बाटलीवर अडकावी तशी खिळली. ती चक्क रस्त्याच्या एका कोपऱ्याला असलेल्या फुलांनी बहरलेल्या चाफ्याच्या झाडाला टेकून उभी होती. तपकिरी रंगाची पर्स हाताचा विळखा करून पाठीवर विसावून ठेवली होती. तिनं एक भलामोठा ढगळ फिकट आकाशी रंगाचा झिरझिरीत शर्ट घातला होता. उन्हाची तिरीप येताच शर्टच्या आतील अंग-प्रत्यंगाचं दर्शन होईल, अशी व्यवस्था तिनं करून ठेवली होती. आणि खाली कातडीत शिरल्यासारखी अगदी घट्ट काळ्या रंगाची जीन्स पँट होती. एवढ्या सकाळीही तिनं डोळ्यांवर काळा गॉगल चढवला होता. या पेहरावामुळं ती एकदम मादक अन् चार-पाच वर्षांनी लहान दिसत होती. जणूकाय तीस-पस्तिशीच्या उंबरठ्यावर आल्यासारखी वाटत होती. तिला असंच भर रस्त्यावर मिठीत उचलावं आणि चुंबनांचा वर्षाव करावा. तिचे ओठ पिळून काढावेत, असं त्याला वाटलं. पण त्यानं स्वतःला मोठ्या प्रयत्नानं आवरलं. आधी एखादं चांगलं, एकांतातले हॉटेल शोधणं गरजेचं होतं. त्यानं रस्त्याच्या दुतर्फा नजर मारली. हॉटेलांची मोठी रांग होती. मात्र, त्यातील एकही त्याला सुरक्षित वाटलं नाही. आता काय करावं, असा विचार करत तो तिच्याजवळ पोहोचला. तिनं गॉगलमधूनच तीव्र मधाळ कटाक्ष टाकत विचारलं.

हॉटेल शोधताय काॽ

अं .. हो ... काॽ

काही गरज नाही हॉटेलची.

त्याला धक्काच बसला.

आँ ... काॽ मग आपण कुठे एकत्र थांबणार. गप्पा मारणार.

त्याची काळजी तुम्ही करण्याची गरज नाही साहेब. तुम्ही फक्त माझ्यासोबत चला.असं म्हणत तिनं टॅक्सी थांबवलीही. त्याला काही कळायच्या आत तो टॅक्सीत बसलाही होता. त्याला वाटलं होतं की ती त्याच्या अगदी जवळ बसेल. कदाचित चिटकून. पण तसं झालं नाही. दोघांमध्ये खूप अंतर राहिल, याची काळजी तिनं जाणिवपूर्वक घेतली असावी, असं त्याला वाटलं. तिनं काचा खाली केल्या. जोरदार वाऱ्यानं तिचे केस उडू लागले. तसा तिनं अंगावर मारलेल्या परफ्युमचा गंधही त्याच्यापर्यंत पोहोचला. त्याच्या मांड्यांमध्ये करंट फिरू लागला. तो तिच्याकडं चोरटा कटाक्ष टाकत होता. पण ती जणू काही त्याच्याशी फारशी ओळख नाही, असं वागत होती. हिला अचानक काय झालं. दोन मिनिटांपूर्वी तर आपल्याशी सगळा खेळ खेळण्यास तयार असल्यासारखी वाटत होती. आणि आता असं काय करतेय. आपलं काही चुकलं की अंदाज चुकला. तो विचारात बुडाला.

दहा मिनिटं मुख्य रस्त्यावरून गल्लीबोळात फिरून एका जुनाट इमारतीसमोर टॅक्सी थांबली. चित्रासोबत जनक खाली उतरला. त्यानं चहुबाजूंनी नजर फिरवली. ती काहीशी ओसाडच जागा होती. त्या इमारतीच्या आजूबाजूला रिकामं मैदान होतं. त्या मैदानाचा कचरा डंपिंगसाठी उपयोग होत असावा. चित्रा येणार असं बहुधा तिथं काम करणाऱ्यांना माहिती असावं. कारण टॅक्सीतून उतरताच एक नोकर धावत आला. त्यानं तिची बॅग उचलली. ती त्याला म्हणाली,

थर्ड फ्लोअर. राईट ए-फोर नंबर.

तोजी मॅडमम्हणत पुढे निघून गेला. जनक तिच्या पाठोपाठ लिफ्टमध्ये गेला. लिफ्ट वर चढत असताना ती त्याच्याजवळ सरकेल, असं त्याला खूप वाटत होतं. म्हणून तो तिच्याकडं रोखून पाहत होता. पण तसं काहीच घडलं नाही. ती कमालीची शांत होती. वाऱ्यानं भुरभुरणाऱ्या केसांतून हात फिरवत होती. ओठांवरून जीभ फिरवत होती. कदाचित प्रवासानं थकल्यामुळं असेल किंवा या इमारतीतील लोकांना काही वाटू नये म्हणून ती अंतर राखत असावी, अशी त्यानं स्वतःची समजूत घातली. तो तिला भेटण्यासाठी अधीर झाला होता. उतावळा झाला होता. उफाणून चालला होता. चार खोल्यांच्या त्या भल्या मोठ्या फ्लॅटमध्ये नोकर बॅग ठेवून गेला. आता तिथं फक्त जनक आणि चित्राच होते. गेले जवळपास वर्षभर तो जिचा सतत पाठलाग करत होता. तिच्या शरीराची आस धरून बसला होता. ती एक चवचाल बाई असल्याची त्याला जिच्याकडून आपल्या कानात ओतून घ्यायचं होतं. जिच्या चारित्र्याबद्दल जाणून घेण्याची त्याला प्रचंड उत्सुकता होती. जिच्या अनेक पुरुषांसोबतच्या भानगडी त्याला खोदून काढायच्या होत्या. जिच्या पैसा कमावण्याच्या, उकळण्याच्या हातोटीबद्दल त्याला ऐकायची जबर इच्छा होती, अशी ती त्याच्यापासून अगदी काही फुटांवर होती. आणि ती देखील एकांतात. काहीशा निर्जन असलेल्या इमारतीचा तिसरा मजला ओसाड म्हणावा असा होता. पूर्ण शांतता पसरली होती. सात आठ वर्षांनी मोठी, गच्च शरीराची, अनेक पुरुषांचा अनुभव असलेली मादी एकटी, एकांतात असेल तर तिच्यावर सहज झडप घालता येईल, असं त्याला नेहमी वाटायचं. त्यानं काही पिवळ्या पुस्तकात तशा कहाण्या वाचल्या होत्या. रंगारगल्लीला पहिल्यांदा व्हिडिओ पार्लर सुरू झालं. परदेशातून, कुठून कुठून ब्ल्यू फिल्मच्या  व्हिडिओ कॅसेट यायच्या. दहा रुपये जमवून त्यानं तीन-चार वेळा त्या ब्ल्यू फिल्म पाहिल्या होत्या. त्यात सगळं सरळचोट. इथं ते शक्य नाही. त्यामुळं आता सुरुवात कुठून करावी, हे त्याला सुचेना. ती बहुधा त्याने सुरुवात करण्याची वाट पाहत असावी. जनक अडखळलेला, थांबलेला, ताटकळलेला पाहून ती आतल्या खोलीत निघून गेली. त्यानं तो आणखीनच गोंधळला. सिनेमात पाहिलेलं, कथा-कादंबऱ्यात वाचलेलं, पिवळ्या पुस्तकांमधून अधाशासारखं खाल्लेलं तो आठवू लागला. पण नेमक्या या क्षणी काय करावे, हे धडपणे समोर येईना. आता फार काळ बाहेरच्या खोलीतच थांबलो तर ही हातची निघून जाईल. पुन्हा कधीच असा प्रसंग येणार नाही, हे त्याच्या मनावर आदळू लागलं. आणि मग सारे धाडस एकवटून त्यानं बूट काढले. शर्टच्या गुंड्या  सोडल्या. आणि काहीतरी गाणं गुणगुणत आत शिरला. तर ती तिथल्या एका जुनाट स्टाईलच्या पण स्वच्छ आरशासमोर स्टुलावर बसली होती. तिनंही शर्टच्या वरच्या दोन गुंड्या मोकळ्या केल्या होत्या. कॉलर मागे केली असली तरी बुब्स दिसणार नाहीत, अशी काळजी तिनं घेतली होती. आरशाजवळ चेहरा नेऊन ती स्वतःला बारकाईनं न्याहाळत होती. मध्येच केसांतून बोटे फिरवत होती. कानातील डूल हलवत होती. कुठलं तरी जुनं गाणं गुणगुणत होती. तो संमोहित झाल्यासारखा तिच्याकडं बघू लागला. तेव्हा  

तिनं आरशातूनच त्याच्याकडं रोखून पाहत विचारलं,

काय फार गर्मी होतेय काॽ अरे, तुला विचारतेय.

अं ...

चांगला वारा सुटलाय तरी तु शर्टाच्या गुंड्या काढल्या म्हणून म्हटलं.

तो भानावर येत किंचित मोकळा होत उत्तरला हो ना. उकाडा आहेच थोडासा. आणि मी बऱ्यापैकी गरम माणूस आहे.

त्यावर एकदम खळाळून हसत, खट्याळपणे ती म्हणाली,

गरम आणि तूॽ मला तर एकदम थंड वाटलास नेहमीच.

खट्याळ आवाजतल्या तिच्या या बोलण्याचा दुसरा अर्थ कळाल्यानं त्याची कानशिली गरम झाली. हृदय थडथडू लागलं. तो एक पाऊल तिच्याकडं सरकला. तिला तसंच पकडण्याचा त्याचा पक्का इरादा होता. पण निवांतपणे बसलेली ती अचानक उठली आणि म्हणाली

मी मात्र एकदम थंड आहे. आणि आता आणखी थंड होण्यासाठी जातेय.

त्याचं गडबडणं ओळखून पुन्हा खळखळून हसत तिनं सांगितलं,

अरे, इथं छान सोलारचं पाणी असतं. एकदम नॅचरल गरम. हे बांधकाम जुनं असलं तरी बाथरुम मोठं आहे. छान टब आणि शॉवरही आहे. प्रवासानं सगळं शरीर आंबट, आंबूस झालंय. आंघोळ आवश्यक आहे. जाऊ नाॽ

हो ... हो. माझी काय हरकत असणार.

गुड. मग माझी आंघोळ झाली की तुला काय बोलायचंय ते बोलू निवांतपणे. चालेल?’ असं म्हणून त्याच्या प्रतिसादाची वाट न पाहता ती बाथरुममध्ये शिरलीही होती.

तिच्या आवाजातला खट्याळपणा गायब झाला होता. त्यात थोडीशी जरब आली होती. त्यानं वासनेच्या डोहात खोलवर बुडालेला जनक किंचित वर आला होता. पण पूर्ण भानावर येण्याची त्याची अजिबात इच्छा नव्हती. शरीरात आलेलं उधाण त्याला भानावर येऊ देतही नव्हते. त्यानं पलंगावर बसकण मारली. बाथरुममधून गाणं गुणगुणण्याचा आवाज शॉवरच्या आवाजात मिसळला होता.

वाऱ्याचा वेग वाढला होता. पुढची तयारी म्हणून तो दोन माणसं ये-जा करू शकतील  एवढी मोठी खिडकी बंद करण्यासाठी उठला. पण ती एक सिमेंटची चौकट होती. लाकडी पट नव्हते. काचाही नव्हत्या. थोड्या अंतरावर चार-पाच मजली इमारत होती. तिथून या खोलीतलं बरंच काही दिसू शकतं, असं त्याला जाणवलं. मग त्यानं एखादा  मोठा कपडा लावून खिडकी झाकता येईल का, हेही शोधून पाहिलं. पण ना मोठा कपडा  होता. ना तो अडकवण्यासाठी काही हुक होते.

खोलीतला पलंगही एवढा जड होता की तो बाहेरच्या नजरेपासून लपवण्यासाठी हलवणं शक्य नव्हतं. त्याला एकदम गळाल्यासारखं वाटू लागलं. तिला मिठीत घेणं, मांडीवर बसवणं, तिचे ओठ चावून काढणं आणि सर्वात शेवटी तिच्याशी भरपूर मस्ती करणं, खेळणं शक्य नाही, हे त्याला जाणवलं. अचानक त्याचं लक्ष दरवाजामागे लावलेल्या आरशाकडे गेलं. दरवाजा लावून घेतला की, पलंगावर होणाऱ्या सगळ्या हालचाली दिसतील, अशा कोनात तो आरशा बसवलेला होता. त्याच्या मनात तत्क्षणी विचार चमकला

ही तर एकदम सराईतासारखी इथं फिरतीय. म्हणजे बऱ्याच वेळा येऊन गेली असणार. पलंगावर खेळ करत आरशाचा आनंद घेतला असणार. च्यायला आव तर खूप सभ्यतेचा, हुशारीचा आणते. फारच रंगीली, चवचाल. तिच्या भानगडी तिनं आपल्याला सांगितल्याच पाहिजेत. आणि त्या सांगता सांगता आपल्यालाही आरशाचा उपयोग करता आला पाहिजे. आता फक्त येऊ दे तिला बाहेर. आली की लगेच कडेवर उचलून घेऊयात. म्हणजे एका मिनिटात सगळ्या विचारांचा तुकडा पडेल. असं  वाटून तो काही सेकंद खुश झाला. पण दुसऱ्याच क्षणी त्याच्यातील दुसरं डोकं चालू लागलं होतं. ते म्हणत होतं, एवढ्या सरावलेल्या, चटावलेल्या बाईसोबत इथं खेळणं धोकादायक आहे. काय माहिती आपल्याला जाळ्यात अडकवून काहीही करायला भाग पाडेल. पुरुषानं असं वासनेच्या डोहात उडी मारणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखंच आहे. या वासनाकांडानं अनंत लोकांच्या आयुष्याची धूळधाण उडवून दिलीय. त्यात आपली भर पडेल. एकदा बाईचा कब्जा आपल्यावर झाला की, स्वतःचं अस्तित्व संपून जाईल. आणि एवढं तिच्या मोहात पडण्यासारखं तिच्यात काय आहे. बरं, असेलही तिच्यात खास काही. पण ते इथंच हवंय काॽ समजा तिनं तिची सगळी लफडी उघड केली, भानगडी सांगितल्या तर त्यानं आपल्याला काय मिळेल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या स्वतःवर काही नियंत्रण आहे की नाहीॽ तिला  नसेल काही मर्यादा पण आपल्याला हवीच ना. आपण जर तिच्या कामुकतेला बळी पडलो नाही. तर ती किती मोठी गोष्ट होईल.या नराला आपल्या मनासारखं वापरता येईलहा तिचा समज मोडता आला पाहिजे. खरं तर बाथरुममधून अत्यंत कमी कपडे घालून तिनं बाहेर आलं पाहिजे. तिनंच स्वतः आपल्याजवळ येऊन बसायला हवं. तिच्याविषयी खूप काही सांगायला हवं. रामदासचे आणि तिचे संबंध खरंच कसे आहेत. ते एका पलंगावर झोपतात की नाही. जगासमोर ते नवरा-बायको म्हणून वावरत असले तरी प्रत्यक्षात त्यांच्यात शारीर संबंध एका कणाचाही राहिलेला नाही, हे तिनं मोकळेपणानं कबूल करायला हवं. रामदासपासून ती दूर जाऊन इतर पुरुषांना का शोधते. त्यातून तिला कोणाकडून निरातिशय आनंद मिळालाय, याचीही कबुली द्यायला हवी. आणि हे सारं सांगता सांगता आपल्या शर्टाची बटनं सोडायला हवीत, अगदी एखाद्या इंग्रजी सिनेमात दाखवतात तसं व्हायलाच हवं. असं त्याला वाटत होतं. इथं निवांत, एकांत आहे. आपल्याकडं किमान तासभर आहे. तिला तर काहीच गडबड नाहीये. त्यामुळं इथंच तिचा खरा चेहरा पाहणं आणि तिला आपल्या ताब्यात घेणं शक्य आहे, असं त्याला वाटत होतं. पण तसं काही घडलं नाही.

म्हणजे खरं सांगायचं तर त्यानं कच खाली. कारण बाथरुममधून चांगले अंगभर कपडे घालूनच ती बाहेर आली. राखाडी रंगाची, फुला-फुलांची साडी होती. कोपरापर्यंत ब्लाऊज होते. म्हणजे कमरेपर्यंत आणि त्या खालीही सगळं झाकलेलं. इतर वेळी जसं अंगप्रदर्शन असायचं त्याचा मागमूसही नव्हतं. पण त्या पुढे म्हणजे ती काहीतरी देवाचे स्त्रोत्र पुटपुटत होती. खिडकीपुढे उभे राहून सूर्याकडं पाहत हात जोडत होती. तिच्यातली मादकता कुठल्याकुठं गायब झाली, असं त्याला वाटलं. ती एखाद्या मध्यमवर्गीय गृहिणीसारखी भासू लागली. तिचं हे रुप त्यानं पहिल्यांदाच पाहिलं होतं. त्याचं अवसानच गळालं. एकाच क्षणात तो वासनेच्या डोहातून बाहेर आला. तिच्याविषयीचे आकर्षण जणू काही समुद्राच्या तळाशी गेले. हातपायाला कंप सुटला. घसा कोरडा पडला. काही मिनिटं अशीच शांत गेली. मग देवाचे स्तोत्र, सूर्याची आराधना संपवून अर्धवट डोळे मिटवूनच ती पलंगावर येऊन बसली. तो तिच्या चेहऱ्याकडं टक लावून पाहू लागला. तिच्या ओठांचं निरीक्षण करू लागला. आता त्याला तिच्याजवळ सरकायचं होतं. म्हणून मांडी घातलेल्या अवस्थेतच तो पुढे सरकताच तिनं डोळे उघडले. एका क्षणात ती काहीतरी वेगळीच भासू लागली. ओठांवर पूर्ण हास्य पसरवत तिनं त्याला चक्क बारीकसा डोळा घातला. आणि म्हणाली,

सॉरी हां ... पहाटे लवकर निघाली तर देवाची आराधना राहूनच गेली होती. तुझ्यामुळं संधी मिळाली.

काही मिनिटातच तिच्या व्यक्तिमत्वातील एकापाठोपाठ एक बदलाने आधीच त्याला धक्काच बसला.

माझ्यामुळं ...?’

हो ... तुझ्यामुळं मी इथं आले ना. तुझ्या हट्टामुळं. तुला माहिती आहे मला कसं वळवायचं ते?’

आँ ... मी कसं काय वळवलं?’

अरे, तु माझा खास मित्र आहेस ना. आणि मला मित्राचा शब्द मोडवत नाहीहे तुला पक्के ठावूक आहे. म्हणूनच तर तु मला सांगितलंस ना की इथं भेटूयात म्हणून.

तिनं खास मित्र म्हणताच त्याच्या अंगावर रोमांच आले. तो उत्तेजित होऊन म्हणाला,

ओ .. हो .. हो. थँक्स. पण तु कधी मैत्रीचं म्हटलं नाही आधी. सॉरी ... तुम्ही ... चुकून एकेरी बोललं गेलं.

‘सॉरी वगैरे म्हणण्याची गरज नाही हां. तु मला काहीही म्हणू शकतोस. एकेरी, दुहेरी चालेल आणि अहो-जाहो केलं तरी नो इश्यू. फक्त तु माझ्याशी बोलत राहिलं पाहिजेस. आणि हं ... मैत्रीचं आधी कधी म्हटलं नाही. कारण तशी वेळच आली नव्हती. आज आली आहे ती वेळ. आपली अशी निवांत भेट झालीच नव्हती ना. तुझ्यात मैत्रीची भावना होती की नाही, मला माहिती नाही.  काहीवेळा तसं जाणवलं पण स्ट्राँगली नव्हतं. मला मात्र खात्री होती तुझ्याविषयी. त्यामुळं तो बोलावलं. भेटायचं म्हणाला तर मी एकदम बिनधास्तपणे आले इथे. तुला माझ्याकडून काहीही नकोय. फक्त काहीतरी मनातलं सांगायचंय, असं वाटतंय मला. चल, बोल. सांग.

तिच्या एकदम धडाधड बोलण्यानं जनकला धक्क्यावर धक्के बसू लागले. ती आपल्याला खास मित्र समजते याचा आनंद व्यक्त करावा की ‘ती आपल्याला काही देण्यास तयार नाही’ या बद्दल संतापावं हे त्याला कळेना. तेव्हा ती मादक आवाज लावत, मान वेळावत म्हणाली,

‘साहेब, चिंता करू नका. इथं कोणीही नाही. मन मोकळं करूनच टाका. काही  विचारायचं असेल तर बिनधास्त विचारून टाका. तासभर वेळ आहे आपल्याकडं. पुन्हा अशी संधी मिळेल की नाही माहिती नाही.’ आणि त्याच्याकडं खूपच डोळे भरून पाहू लागली. त्याला वाटले ती जणूकाही आपल्याला डोळ्यातून पिऊन टाकतेय. त्याच्या शरीरातील तारा जणूकाही तुटल्यासारख्या  झाल्या होत्या. तो एकदम गारठून गेला. तेव्हा तिनं बोलण्यासाठी धीर देत मानेला एक छानसा झटका दिला. आणि ती त्यानं बोलण्याची वाट पाहू लागली. आता आपण असेच गप्प राहिलो तर ती फार काळ थांबणार नाही, याची त्याला खात्री होती. म्हणून त्यानं मग त्यानं मनाला सावरलं. आणि खरखरत्या आवाजात तो बोलू लागला.

‘मला साहेब नका म्हणू प्लीज. अं ... मी तुम्हाला दोन-तीन वर्षांपासून ओळखतो. आपली पहिली भेट झाली तो दिवस मला आजही लख्ख आठवतो. तुझ्या अंगावर कोणती साडी होती. कोणता ब्लाऊज होता. एवढंच नाही तर कोणतं लिपिस्टिक लावलं होतं, हेही मला आठवतंय.’

तिच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले. तिनं त्याच्या स्मरणशक्तीची दाद देण्यासाठी डोळे आणखी मोठे केले. तिच्या ओठावर हास्य खेळू लागलं. मग तिनं तिचं खास अस्त्र काढलं. बेंबीत बोट घालून तिनं साडी वर उचलल्यासारखं केलं. आणि पुन्हा मान वेळावत त्याच्या बोलण्याची वाट पाहू लागली.

‘खरंच, मी तुम्हाला खूप फॉलो केलं.’

‘मलाॽ कशासाठीॽ’ जनक या प्रश्नाचीच वाट पाहत असावा. वर्षभरापासून साचवलेलं मोकळं करण्यास त्यानं सुरुवात केली.

‘म्हणजे कायॽ तुमच्यात मॅग्नेट आहे. लोहचुंबक.’

‘आँ ... काहीतरीच काय बोलतोस रे. मी कसलंय लोहचुंबक अन् कशाचं मॅग्नेट. उलट मलाच माझी कामं करून घेण्यासाठी कोणा-कोणाला मॅग्नेट लावावे लागते.’

‘कसली कामंॽ’

‘ते तुला चांगलं माहितेय ना रे. कोणाच्या बदल्या, कोणाच्या नेमणुका. कंपन्यांमध्ये भरती. जाहिराती. राजकारण्यांच्या पार्ट्या.’

‘पण तुम्ही हे सगळं का करताॽ म्हणजे कशासाठी करताॽ’

‘कारण मला ते आवडतं. जमतं.’ तिनं मोकळपणानं सांगितलं.

‘पण आवडतं, जमतं म्हणून एवढं ... कोणाही सोबत.’

तिनं चमकून विचारलं, ‘काय, कोणाही सोबत म्हणजे...’

तो गडबडून उत्तरला ‘मला म्हणायचं होतं की, विचित्र प्रकारच्या लोकांसोबत तुम्हाला खूप फिरावं लागतंय ना.’

‘ओह ... जळतोयस काॽ बघ, तुझ्यासोबत पण आलेच ना मी. तुझं तर काही कामही नाही.’

‘ओह ... ते विचारायचं राहिलंच. तुम्ही माझ्यासोबत इथं यायला कशा काय तयार झालात. अगदी एकांतात.’

‘सांगितलं ना. तुला मित्र मानते मी. जवळचा मित्र.’

‘हो. पण का... जवळचा मित्र कसा कायॽ’

‘असाच. कारण तु माझ्या कामाचा माणूस आहे.’

‘कामाचा माणूस. मला कळलं नाही.’

‘फार खोलात नको शिरू रे बाबा. लहान आहेस तु माझ्यापेक्षा.’

‘अहो, असं काय करताय. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ना.’

‘ते तुला शोधून काढावं लागेल. एवढं तर काम कर ना.’ तिच्या लाडिक आवाजानं त्याच्या मनात गुदगुल्या होऊ लागल्या. शरीरातून मोरपीस फिरू लागलं. त्यानं धीर एकवटला आणि तो पुटपुटला,

‘जवळचा मित्र म्हणून तुम्हाला मिठीत घेऊ शकतोॽ मैत्रीचे चिन्ह. आलिंगनॽ.’

त्याच्या प्रश्नानं ती एकदम थबकली. खोलीत कमालीची शांतता पसरली. त्याला वाटलं की आपल्या आगाऊपणानं ती संतापली. तिनं त्याच्या टक लावून पाहत डोळे मोठे केले. ओठांवरून जीभ फिरवली. त्यानं माघारीची तयारी सुरू केली. पण तशी गरज पडली नाही. उलट ती आणखी त्याच्याजवळ सरकली आणि म्हणाली,

‘हां. हरकत नाही. मिठी, आलिंगन नको. ते थोडं जास्त होईल. पण तु असा सरक थोडासा जवळ. माझ्या आणखी जवळ येऊ शकतोस तु.’

जनकच्या मनावरील दडपण बरंच कमी झालं होतं. हृदयातली धडधड शांत होत चालली होती. पण वासनेचं वादळ उठण्याच्या मार्गावर होतं. त्याला वाटलं त्यापेक्षा खूप वेगळं काही घडत होतं. आपण मिठी म्हणताच ती गळ्यात पडेल, अशी त्याची अपेक्षा होती. अर्थात तेवढं झालं नसलं तरी अर्धा पल्ला गाठला होता. तिच्या पायाच्या बोटाला त्याच्या पायाची बोटं घासू लागली होती. आणि तिला त्याचं काहीही वाटत नव्हतं. उलट ती तिच्या बोटानं जनकच्या बोटांशी चाळा करू लागली होती. काहीवेळात आणखी पुढं जाता येईल, असं त्याला वाटू लागलं. या खेळानं खोलीत शांतता पसरली होती. ती भंग करत चित्रा म्हणाली, तु काहीतरी विचारत होतास ना ... हा की मी तुला मित्र का मानतेॽ हेच ना.

हो ... हो

बघ, प्रत्येकाचं एक कॅरेक्टर असतं ... चरित्र म्हणतात त्याला.. आता मी कशीही असले ना तरी बाई आहे. एक सिक्स्थ सेन्स असतोच. हा सेन्स सांगतोय की हा पोऱ्या चांगलाय. याला आपल्याकडून काही ओरबाडायचं नाहीये. अधाशासारखा. भुकेल्यासारखा हा आपल्या मागं लागणार नाही. होय नाॽ

तिच्या प्रश्नानं तो एकदम अडकून गेला. ही चवचाल बाई तर आपल्याविषयी भलतीच काही भावना बाळगतीय. वर पुन्हा सिक्स्थ सेन्स म्हणतेय. इथं शरीरात कल्लोळ होतोय आणि ही ...

त्याला विचारात मग्न झालेलं पाहून ती म्हणाली,

काय रे, कसला विचार करतोयस. कोणाची आठवण येतीय की कायॽ

नाही, नाही हो. ... बरं, मला सांगा. माझ्याशिवाय तुमचे आणखी कोण कोण जवळचे मित्र आहेत.

माझेॽ जवळचे मित्रॽ का कशासाठीॽ

असंच मला. जाणून घ्यायचंय तुमच्याबद्दल. त्यांच्याबद्दल.

त्याच्या या बोलण्यावर एकदम एखादा फवारा उडावा, तशी ती खळाळून हसत म्हणाली,

कायॽ तुझ्यातला हा गुण मला माहितंच नव्हता.

गुणॽ कोणताॽ

असं बायकांना एकट्यात गाठून त्यांच्या मित्रांबद्दल विचारायचा गुण. आणि विचारून काय करणार तुॽ लोणचं घालणार काॽ का कथा लिहायचीय तुला. चावटवाली कथा. भानगडींची.

नाही हो. मी काही तसला नाही. पण खरंच मला जाणून घ्यायचंय.

अरे ... पण कशासाठीॽ काय होईल त्यानं. त्या पेक्षा तु मला छान एखादी गोष्ट सांग. कविता ऐकव. नाहीतर तुला आवडलेल्या सिनेमाची स्टोरी सांग.

अहो, ती मी सांगेन कधीतरी. पण आता तुमच्या मित्रांबद्दल सांगा. प्लीज. फार खोलात नाही सांगितलं तरी चालेल. तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं सांगा.

त्याच्या आग्रही स्वरात अजिजीही होती. तो तिच्या खोलात उतरण्यासाठी व्याकूळ झाला होता. तिच्या इतक्या जवळ बसून तिला एवढ्या हक्कानं विचारण्याची संधी पुन्हा मिळणं कठीण आहे, हेही तो जाणून होता. मग त्यानं आणखी एक धाडस केलं. पटकन तिचा हात हातात घेत तो म्हणाला, ‘तुम्ही जे सांगाल ते आपलं गुपित राहिल.’

त्याच्या या बोलण्याचा काहीसा असर झाला. त्याच्या हातातून हात सोडवून घेत ती थोडी मागं सरकली. बराच वेळ विचार करत म्हणाली,

‘असं तर मी तुला काही सांगायला नको. ते माझ्यासाठी आणि तुझ्यासाठीही चांगलं नाही. म्हणजे काही फायद्याचं नाही. कशासाठी कुणाचं खासगी आयुष्य जाणून घ्यायचं आणि कुणी स्वतःचं असं लाईफ का सांगावंॽ पण ... पण ... तु माझा चांगला मित्र. म्हणून सांगते. माझ्या कुठल्याच मित्रानं मला असं कधी विचारलं नाही. थोडक्यात सांगते. फार तपशीलात नाही. कोणाची नावं, गावं विचारू नको. आणि शोधूनही काढू नको. हे सगळं खूपच पर्सनल आहे हां. हे बघ ... मला खूप सारे मित्र असतील. मी कधी मोजले नाही. वेगवेगळ्या वेळी भेटले त्यांना. कोणी कॉलेजात भेटले. कोणी कामधंद्याच्या निमित्ताने दोस्त झाले. कोणी मदतीसाठी आला होता. कोणाला माझी मदत हवी होती. त्यात स्पेशली राजकारणी आहेत. मोठे अधिकारी आहेत. काही बिझनेसमन, इंडस्ट्रिअलिस्ट आहेत. आणि तुला गंमत सांगू का ... तीनचार जण काळे धंदेवाले आहेत.’ 

‘हे ... हे असे लोक तुझे मित्र ...’

‘हो ... तर ... ज्याला माझी मदत लागते आणि ज्यांची मदत मी घेते तो माझा मित्र होऊन जातो.’

‘मदतीचं ठीकंय. पण थेट मित्र ...’

‘अरे, बाबा ... माझं जग वेगळंय. आणि राजकारणी लोकांकडून  पैसे काढायचे असतील तर ना खूप काही करावं लागतं. त्यांना सगळं फुकटात हवं असतं. म्हणून त्यांना भानगडींमध्ये अडकवून पैसे काढावे लागतात.’

‘आँ ... भानगडींमध्ये अडकवून म्हणजे ... तु .. ब्लॅ..’

‘नाही नाही. ब्लॅकमेल नाही करत मी. टेबलाखालून पैसे कमावणाऱ्या अधिकाऱ्यांकडून पैसे काढायसाठी ओळखी लागतात. त्यांच्या क्लोज वर्तुळात शिरावं लागतं. एवढी मोठी जाहिरात एजन्सी चालवायची. ती पण आपल्या या छोट्या शहरात. तर पेपरवाल्यांची मर्जीही सांभाळावी लागते. या सगळ्या भानगडीत मित्र होतात. मैत्री किती वाढवायची यात माझ्या काही आयडिया आहेत. खास बायकांचे फंडे.’

‘बापरे .. बायकांचे फंडे ...’ तो मनात पुटपुटला. ती नेमके काय काय उद्योग करत असावी, याचे चित्र त्याच्या डोळ्यासमोर तरळु लागले. तिच्याविषयी आपण जी कल्पना केली, आपल्याला तिच्याबद्दल जे काही कळालं ते खरंच आहे, याची खात्री तिनंच करून दिली. हे जाणवल्यानं त्याला बराच आनंदही झाली. असं कधी होईल, हे असं जुळून येईल, याची कल्पनाही आपण केली नव्हती. पण किती सहजपणे जमलंय.

पण आपण राजकारणी नाही. न्यूज पेपरवाले नाही. अधिकारी नाही तरीही ही आपल्यासोबत इथं आली. पलंगावर चांगली खेटून बसली. स्वतःविषयी सांगू लागली. मग हिला आपल्याकडून काय हवंयॽ मैत्री हवीयॽ दाट मैत्री हवीयॽ सहवास हवायॽ एकांतातील सहवासॽ आपलं शरीर हवंयॽ हं ... शरीरच हवं असणार. म्हणून तर ती अशी खेटतीय. बेंबीत बोटं घालून घालून लाडिक लाडिक बोलतेय. आणि आपल्यालाही तिच्याकडून तेच पाहिजे ना. तिच्या त्या घट्ट काळसर रंगाच्या त्वचेतून वाहणारा गंध स्वतःच्या रक्तात मिसळून घ्यायचाय. तिच्या बूब्समध्ये डोकं घुसळायचंय. हिप्स चावून काढायचेत. आणि हेच तर हवंय हिलाही आपल्याकडून. एवढे मित्र हिचे. मित्रांना तिनं जे दिलं. तेच तिला आपल्यालाही द्यायचं असेल ना.

जनक विचारात गुंतला असतानाच कोणीतरी दरवाजा वाजवतंय, असं त्याला वाटलं. तो दचकलाच. इथं कोण आलं असावं. तो रिसेप्शनवरचा मॅनेजर की बॅगा घेऊन वर आलेला नोकर? अशा अवस्थेत आपल्याला पाहिलं आणि बभ्रा केला तर ... आणि इथं पोलिसच आले तर ... उद्या पेप्रात बातमी. दिवाकरसाहेब हाकलून देतील. दादा-वहिनीला काय वाटेल? मिसाळसाहेब, गोटेमामा हिचं तर काही बिघडणार नाही. ही पोलिसांना  पटवून घेईल. पेप्रात नावही येणार नाही तिचं. पण आपलं नाव कायमसाठी काळं होऊन जाईल ... एवढी मोकळी हवा असूनही कपाळावर घामाची झालर उमटली. त्यानं चित्राकडं पाहण्याचा प्रयत्न केला. पण ती नव्हतीच. तो आणखीनच दचकला. अडकलो की काय आपण ... जनक थिजण्याच्या मार्गावर असताना चकित होण्याची वेळ त्याच्यावर आली.

दरवाजात चित्रासोबत एक मजबूत अंगकाठीची, उंचशी बाई उभी होती. खांद्यापर्यंत केस मोकळे सोडलेले. छाती, हिप्स ठीकठाक. सरळ, धारदार नाक. चमकदार, पांढरे शुभ्र दात. एकदम पातळ ओठ.  त्यावर लालभडक लिपस्टिक. तिनं अंगात जीन्स पँट आणि गुलाबी फुला-फुलांचा शर्ट घातला होता. मोठे, टप्पोरे हिरवट रंगाचे डोळ्यांमुळे ती एखाद्या गुबगुबीत, गर्विष्ठ, अहंकारी मांजरीसारखी वाटत होती. त्यातच ती च्युइंगम चघळत होती. कोणाचंही लक्ष अडकून राहिल, अशी ती होती. पण जनकला तसं काहीही वाटलं नाही. उलट कोण ही बया, आपल्या प्रायव्हसीला  बुडवण्यासाठी आलीय, अशा प्रश्नार्थक नजरेनं तो चित्राकडं पाहू लागला. त्याच्या मनात आपल्याविषयीची भावना चित्राला जाणवली. त्यानं ती किंचित सुखावली आणि म्हणाली,

‘ही रिना. माझी कॉलेजमधील मैत्रिण. बिल्डिंग कन्स्ट्रक्शनसाठी लागणारे कामगार पुरवते. नवरापण याच कामात आहे. आता रेल्वेचेही ठेके मिळतायत. आणि बिल्डर, डेव्हलपर होणारंय. मी इथं येणार म्हटल्यावर भेटायचं म्हणाली म्हणून आली.’

तोंडावर हास्याची रेषा उमटवण्याशिवाय जनककडे पर्यायच नव्हता. चोरट्या आवाजात त्यानं सांगितलं,  ‘हॅलो ... मी जनक ... लग्न सोहळ्याची कंत्राटे घेणाऱ्या संस्थेत काम करतो. यांच्यासोबत जुनी ओळख आहे.’

त्यावर रिनानं ऐकून न ऐकल्यासारखं केलं. अगदी तुच्छ लेखल्यासारखं. त्याला ते फार खटकलं. चित्रा काहीतरी हस्तक्षेप करेल. आपला अपमान  मनावर घेऊन तिला काहीतरी म्हणेल, सांगेल अशा आशेनं तो तिच्याकडं पाहू लागला. पण चित्राचं त्याकडं लक्षच नव्हतं. ती रिनाला घेऊन दुसऱ्या खोलीत निघूनही गेली. डोळ्यासमोरून भक्ष्य हिसकावलेल्या बिबट्याससारखी जनकची अवस्था झाली. त्याला वाटलं, आपण उगाच या वाटेवर निघालोय. यात काहीच हाती लागणार नाहीये. आता आणखी काही करण्यापेक्षा काहीतरी कारण सांगून चंबूगबाळे गुंडाळून निघून जावे. मग त्यानं आरशात एकदा स्वतःला न्याहाळलं. विस्कटलेले केस जागेवर बसवले. ‘बरीच धूळ बसलीय चेहऱ्यावर’ असं त्याच्या लक्षात आलं. मग तो बेसिनपाशी गेला. तोंडावर पाण्याचे आठ-दहा शिपकारे मारले. अत्तराचा फव्वारा शिडकला. आणि खोलीत छानसा सुगंध पसरला. त्याच्या मनावरील ताण निवळला. त्यानं डोळे मिटले. तो दीर्घ श्वास घेऊ लागला. काहीतरी गप्पा मारत खळखळून हसणाऱ्या त्या दोघी खोलीबाहेर येण्याची वाट पाहू लागला. त्या आल्या की, लगेच चित्राला काहीतरी कारण सांगून बाहेर पडायचं. रिक्षा पकडून बसस्टँडवर आणि तिथून गावाकडं परत. पण तसं होणार नव्हतं. अत्तराच्या वासानं धुंद झालेल्या जनकच्या नाकाला दुसरा मंद सुगंध स्पर्शू लागला. त्यानं हलकेच डोळे किलकिले करून पाहिले. तर रिना आरशासमोर उभी राहून हलकीसी शीळ घालत तिच्या केसाच्या बटा कुरवाळत होती. तिची एक नजर जनकवरही होतीच. त्यानं आपल्याला पाहिलंय, याची खात्री झाल्यावर आरशावरच नजर रोखत, आरशातून त्याच्याकडं पाहत डोळ्यात पूर्ण खट्याळपणा आणत ती म्हणाली,

‘चित्रानं सांगितलंय तुमच्याबद्दल. कामाचे आहात तुम्ही. भेटेन मी तुम्हाला. किंवा तुम्हाला वाटेल, तुमचं काही काम असेल तेव्हा तुम्ही कॉल करा. निघू का मीॽ’

जनकनं स्वतःला सावरायच्या आत ती निघूनही गेली. जाताना स्वतःचं व्हिजिटिंग कार्ड ठेवायचं विसरली नाही.

हं हं चालेल…’

ती निघून गेली. तिच्या हायहिल सँडल्सचा टकटक आवाज घुमत घुमत दूरवर गेला. तिला आपण उगाच असं हातचं जाऊ दिलं, जनकच्या डोक्यात विचार चमकला. आणि दुसऱ्या क्षणाला त्याला स्वतःचीच लाज वाटली. एवढी भडक बाई काय कामाची आणि आपण इथं चित्रासोबत असताना तिचा विचार कसा काय करू शकतो. च्यायला, काहीतरीच खूळ घुसतं कधी कधी. असं मनाशी घोळवत तो खिडकीतून बाहेर डोकावत चित्रा बाहेर येण्याची वाट पाहू लागला. आता काही होणार नाही, काही घडणार नाही याची जणू त्याला खात्री पटली होती. फक्त त्याला आता चित्राचं बोलणं ऐकायचं होतं. तिला आपल्याबद्दल खरंच  काय वाटतंय. ती आपल्याविषयी काय विचार करतेय, हे जाणून घ्यायचे होते. ते देखील तिने स्वतः होऊन सांगावं, अशी त्याची अपेक्षा होती. त्यासाठी  आणखी काही वेळ तिथं थांबण्याची त्याची तयारी होती. पण तसं घडलं नाही. अंगाभोवती साडीचा घट्ट पदर घेऊन आणि त्याचे एक डोक कमरेला खोचून एखाद्या अस्सल गृहिणीसारखी चित्रा बाहेर आली. थेट खिडकीजवळ पोहोचली. नेहमीसारखं त्याच्यापासून अगदी जवळ, चिटकल्यासारखी तरीही बोटभर अंतर ठेवून उभी राहिली. दूरवर नजर टाकत  म्हणाली,

‘काय बघतोयसॽ’

‘काही नाही ... असंच..’

आँ ... तु असंच काही बघत नाहीस, माहितेय मला.

अरे, खरंच आणि माझ्याबद्दल काय माहितेय तुम्हाला.

ओ ... साहेब ... तुमच्यावर लक्ष ठेवते मी अधूनमधून.

अस्सं ... मला कसं माहिती नाहीॽ

कारण तुझं माझ्याकडं नीट लक्षच नसतं.

अहो, असं काय  करताय. मीच तर एवढा सारा पाठलाग करून तुम्हाला  इथं आणलंय ते लक्ष नसतं म्हणून व्हयॽ

अं... पाठलागाची गरजच नव्हती. तु नुसतं भेटायचं म्हणला असता तर मी रेडी  होतेच. पण  तुला इथं ... या भल्यामोठ्या खोलीत भेटायचं होतं ना. खरं की नाही सांग.

‘हो .. हो ...’ त्यानं अवघडल्यासारखा होकार दिला. कारण ती नेमकं काय म्हणतेय ते त्याला कळत नव्हतं. आता  तिच्यात आणि आपल्यात पलंगावर काहीही घडणार नाही, हे लक्षात आल्यामुळं त्याला तिथून बाहेर पडायचीही घाई झाली होती.

त्याच्याकडून होकार मिळाल्यावर मंद स्मित करत तिनं बॅग उचलली. खोलीत प्रचंड शांतता पसरली  होती. जणूकाही एखादं समुद्रात खूप घोंगावणारं वादळ किनाऱ्यावरूनच परतलं  होतं. जमिनीचा स्पर्श होताच थंडावलं होतं.

‘तुला बसस्टँडवर सोडायचंय’ तिनं टॅक्सीत बसताच विचारलं.

‘अं ... काय .. काय’

‘काय महाराज ... कुठल्या विचारात गुंग झालात. मी म्हटलं बसस्टँडवर सोडायचंय  काॽ’

‘नाही .. नाही. हेड पोस्ट ऑफिसच्या कॉर्नरवर ... अजून एक छोटंसं काम करायचंय दिवाकरसाहेबांचे. ते झाले की जाईन मी बसस्टँडवर. नाहीतर पुन्हा टॅक्सी पकडतो. तुमचं कायॽ’

‘मी इथून पुन्हा सांगलीला जाणारंय. तिथून रत्नागिरी आणि मग तीन दिवसांनी परत.’

‘सांगली .. रत्नागिरी .. तिथं पुन्हा’

‘नाही ... नाही ... सुदाम, जालिंदर नाही. नवीन मित्र आहेत मन्सूर खान म्हणून. रेल्वेचे काँट्रॅक्टर आहेत. त्यांची कामं आहेत तिथल्या कलेक्टर ऑफिसमध्ये.’

मन्सूर खानॽ

हो ... मुंबईला ... मंत्रालयात भेट झाली.

तिचं ते अतिशय सराईत, बेफिकिरीचं उत्तर ऐकून तो दुखावला. हिचं असं चारित्र्य  उधळणं कधी थांबणार, असा प्रश्न त्याला पडला आणि आपण हे थांबवू शकत नाही, असं वाटून तो अधिकच खट्टू झाला. शांत बसला. तिला ते लक्षात आलं. टॅक्सी धावू लागली होती. वारा आत शिरून फिरू लागला होता. तिनं कमरेला खोचलेला साडीचा पदर मोकळा सोडला. तो फडफडून त्याच्या हाताला स्पर्श करू लागला. तिच्या अंगाचा तोच मादक गंध वाहू लागला होता. पण जनकच्या मनात तिच्या चारित्र्याचा भुंगा पुन्हा पोखरू लागला होता. हिचा तर अनेकांशी संग आहे. अनेकांमध्ये ही गुंतली आहे. आणि नुसती गुंतलेलीच नाही तर उजळ माथ्यानं आपल्याला ती त्या पुरुषांबद्दल सांगतेही. आपलं तर सोडाच रामदासलाही दणकावते. मग आपण कशासाठी हिच्या मागं लागलोय. बरं, ही आपल्याला फार जवळ येऊ देत नाही. दूरही ठेवत  नाही. एवढा एकांत गाठून आणलं तिला इथं. पण काही शक्य झालं नाही. ही रिलेशनशिप थांबवली पाहिजे आता. हं ... किमान सुरक्षित अंतरावर राहू.

किंचित आडवाटेच्या रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती. बस स्टँडजवळ येत चाललं होतं. गाडीत कमालीची शांतता पसरली होती. अचानक तिला काय वाटलं कोणास ठावूक. ती म्हणाली,

थँक्स ...

तो चमकला. कशाबद्दल थँक्स त्यानं विचारलं.

असंच.

‘अरेच्या ... मला थँक्स  म्हणणार. पण कशाबद्दल थँक्स ते सांगणार नाही.’

‘आपल्यातल्या  सगळ्या गोष्टी सांगायच्या नसतात. काही समजून घेतल्या पाहिजेत.’

‘ओ ... मला नाही असं काही समजून घेता येत. ते सांगावंच लागेल.’

‘हं ...’ असं म्हणून त्याच्याकडं पाहत मिश्किल हसत ती म्हणाली, ‘घाई करणं तर कोणी तुझ्याकडूनच शिकावं. सगळ्या गोष्टीची घाई.’

काही  क्षणापूर्वीच तर आपण हिच्यापासून दूर राहण्याचं ठरवत होतो आणि लगेच तिच्या बोलण्यात गुंतत चाललोय, या जाणिवेनं तो किंचित सावध झाला. आणि तिनं स्वतःहून सांगेपर्यंत शांत राहायचं, असं मनाला बजावू लागला. त्याला  फार  वाट पहावी लागली नाही. बस स्टँड जवळ येताच चालकानं टॅक्सी स्टँडसमोरच्या मोकळ्या पार्किंगवर नेऊन उभी केली. चित्रा अन् जनक खाली उतरले. ती चालकाला म्हणाली, दोन मिनिटं थांबा. आपल्याला आणखी पुढं जायचं आहे.

आणि जनककडे वळाली. टक लावून पाहत तिच्या सवयीप्रमाणं त्याला अगदी चिटकल्यासारखी उभी राहिली.

टॅक्सीवाल्यानं ही जोडी चमत्कारिक  दिसतीय. नवरा – बायको वाटत नाही. पण नवरा-बायको शोभून दिसतील. नवऱ्यापेक्षा बाई दहा वर्षांनी मोठी. पण दोघंही भुक्खे, असा चेहरा करत सिगारेट पेटवली.

इकडं खूप मंद स्वरात, लाडिकपणे बोलणं सुरू केलं. तिचा एकेक शब्द जनकला तरंगत वर वर नेऊ लागला.

‘तु ना ... आज खूप हँडसम दिसतोय. असाच हँडसम राहशील आयुष्यभर. कुरळे केस मला फार आवडतात. भरपूर व्यायाम करत जा. तुझा असा सारखा खोलात जाऊन विचार करण्याचा, प्रत्येक गोष्टीत काहीतरी शोधण्याचा स्वभाव मला त्रासदायक वाटतो. पण तरीही आवडतो. शक्य झालं तर या शोधाशोधीतला अतिरेक कमी कर.’

तो दिग्मूःढ होऊन तिचं आणखी एक त्याला हवंहवंसं वाटणारं रुप अनुभवत होता. तिचं बोलणं ऐकत होता.

‘तु ना खरंच खूप चांगला मित्र आहेस माझा. तुला तर माहिती आहे मित्रांची मोठी रांग आहे माझ्याकडं. काय  करणार, माझा स्वभाव असा आणि काम असं की मैत्री केल्याशिवाय काही होतच नाही. लोकांची कामं होतात. आपल्याला चार पैसे मिळत राहतात. रामदासचीही कमाई चांगली आहे. पण इतरही काही खर्च असतात. नवा बंगला घेतलाय. सासू-सासऱ्यांचे, वडिलांचेही हेल्थ इश्यू आहेत. आणि मौज-मजा. ती तर मला आवडते मनापासून. हे सगळं तु समजून घ्यावं, अशी माझी अपेक्षा होती. पण त्या आधीच ते तू केलंस. एकदम समजूतदारपणा दाखवलास. एवढा निवांतपणा होता. एकांत होता. मी काही प्रतिकारही  करणार नव्हते. पण माझ्यावर तुटून पडला नाहीस. तुझ्यातला पुरुष जागा  होऊ दिला नाहीस तू. पलंगावर तु मला आडवं करू शकला असतास. पण केलं नाही, हे आवडलं. माझ्या मनातला एक बारीक, छोटासा, तिळाएवढा कोपरा गोड झालाय तुझ्या या वागण्यानं. तुला आता माझ्याकडून काहीही हवं असेल तर बिनधास्त सांग. मी माझ्याकडून पूर्णपणे देण्याचा प्रयत्न  करेन. आणि सर्वात महत्वाचं म्हणजं असंच भेटत राहा. काहीबाही विचारत राहा. म्हणजे माझ्या डोक्याला खुराक. आणि हो ... ही आपली  एकदम व्यक्तिगत, खासगी भेट होती. ती आपल्यापुरतीच ठेवणार आहेस तू. होय ना राजाॽ हो नाॽ’

त्यानं नकार देणं शक्यच  नव्हतं. त्याच्याकडं पाहत पाहत तिनं डोळ्यावर गॉगल चढवला. आणि ती टॅक्सीत बसून वेगात गेलीही.

त्याला वाटलं आपल्यातला पुरुषाला पराभूत करून तरीही त्या पुरुषाला तूच जिंकलाय असं गुलाबी कळ्यांमध्ये सांगत गुंडाळून गेलीय ती. तिनं आपलं बेसुमार कौतुक केलंय. तिच्या शरीरावर तुटून पडलो नाही, हे खूपच आवडलंय तिला. म्हणून मनाच्या कोपऱ्यात जागा दिलीय तिनं. बेस्ट फ्रेंडचा किताब दिलाय. तो आपण जपायला हवा. त्याच्या शरीरात महाकाय लाटांसारख्या खवळलेल्या पुरुषाला आवर घालण्याचं आव्हान त्यानं  स्वीकारायचं ठरवलं होतं. ‘तिचा विचारच नको. म्हणजे सगळं बंद होईल’ असं बजावत तो पुण्यातून बाहेर पडण्यासाठी बसमध्ये बसला आणि काही मिनिटातच निद्राधीन झाला.

॥ ज ॥

प्रामाणिकपणे आणि वेळा पाळून काम करणाऱ्या जनकवर त्याचे मालक आणि त्यांचा मुलगाही चांगलेच खुश होते. मालकांनी कॉम्प्युटर स्पेअर पार्टचा पुरवठा - दुरुस्ती, औषधी विक्री, खत विक्रीची दुकाने सुरू केली होती. तिकडे त्यांना जास्त वेळ द्यावा लागत होता. आणि त्यातही चांगली कमाई वाढत चालली होती. त्यामुळं त्यांना केटरिंगकडे पाहण्यासाठी फारसा वेळ नव्हता. त्यांनी पुण्याहून आल्या आल्या जनकला बोलावून घेतले. किल्ल्यांचा जुडगा त्याच्या हातात ठेवत ते म्हणाले,

‘या पुढं इथलं काम तुम्हालाच जास्त करावं लागणार आहे. माझ्या केबिनच्या बाजूची केबिन तुमच्यासाठी साफसूफ करून ठेवलीय. टेलिफोनही ठेवलाय. माझ्याकडची स्कूटरपण तुम्हीच वापरा. तुमचा पगार वाढवतोय. किती ते आताच विचारू नका. पण तुम्हाला तुमची एक खोली सोडून दोन खोल्यांचा घर घेता येईल भाड्यानं. आणि महिनाअखेर खिशात काही पैसे राहतील, एवढी व्यवस्था करतोय. आपलं शहर वाढतंय. त्यामुळं व्यवसाय वाढणारच आहे. तो वाढेल तसा तुमचा पगारही वाढत जाईल. बाकी पुढचं  पुढे बघू. मालकांपुढं बोलण्याचा काही प्रश्नच नव्हता. पण पगार वाढवावा, व्यवसाय आपल्याकडं द्यावा, असा शब्दही त्यानं कधी काढला नव्हता. हां ... अलिकडं काळात म्हणजे चित्राशी ओळख झाल्यावर त्याला एक-दोनदा असं वाटलं होतं. पण हे कसं शक्य आहे, असं वाटून त्यानं ते वाटणं भिरकावूनही दिलं होतं. पण आता त्याच्यासमोर गुलाबजाम, मसाले भाताचे ताट वाढून आले होते. त्याला काही बोलणं सुचेना. दादा-वहिनी खूपच खुश होतील,  या जाणिवेनं त्याला बरं वाटलं. खरं तर त्याला चित्राच्या आठवणीची कळ आली होती. पण त्यानं ती पूर्ण ताकदीनं दडपून टाकली. आणि दोन खोल्यांचं घर शोधण्यासाठी भिरभिरू लागला.

त्या छोट्याशा शहरात हजार जणांशी ओळखी झाल्या होत्या त्याच्या. त्यामुळं कमीतकमी भाड्याचं, दोन खोल्यांचं चांगलं घर शोधणं त्याला अजिबातच अवघड गेलं नाही. या कामात त्याला जितुनं चांगली मदत केली. हो तोच तो जितु. ज्यानं वर्षभरापूर्वी जनकसमोर चित्राच्या कानाच्या पाळ्यांना जीभ लावली होती. तिचा हात हातात घेऊन घट्ट धरला होता. सारखा बायकांच्या मागे असलेला. आणि बायका ज्याच्या मागे असायच्या तोच. वर्षभरात अधून-मधून कधीतरी भेटायचा पण काही मिनिटांसाठी. तेवढ्या वेळात वेळ काढून काहीतरी अश्लिल किस्सा  सांगायचा किंवा कोणाला तरी शिवीगाळ करत असायचा. त्यानं प्रॉपर्टी डिलिंगचही काम सुरू केलं होतं. म्हणजे दलालीच एक प्रकारची. प्रभा प्राईड या मध्यवस्तीतल्या चार मजली इमारतीत त्यानं एक गाळाही घेतला होता. तिथून काही अंतरावरच चित्राचं ऑफिस होतं. खरं तर जितूमार्फत घर शोधावं आणि त्याला पैसे द्यावेत, असं जनकला बिलकूल वाटत नव्हतं. पण कुठूनतरी जितूलाच सुगावा लागला आणि तो लगोलग जनककडे धडकला. सोबत पाच-सात  घरांचे पत्तेही घेऊन आला होता. त्यातल्या एका बंगल्यातल्या तीन खोल्या जनकनं भाड्यानं घेऊन टाकाव्यात. कारण बंगल्याचे मालक दोन वर्षांसाठी परदेशात गेले आहेत. त्यामुळे तीन खोल्यांच्या मोबदल्यात बंगल्याचा  परिसर वापरायला  मिळणार. बंगला थोडा आडबाजूला असल्यानं थोडी अडचण असली तरी प्रायव्हसी खूप होती. कोणी येण्या-जाण्याची कटकट नाही, असे सगळे  पॉइंटस् जितूनं आधीच गोळा करून आणले होते. सोबत सामान शिफ्टिंगसाठी छोटा टेंपोही आणला होता. जनकला हलायला जागाच ठेवायची नसावी बहुधा त्याला.

दोन तासात नव्या घरात स्थलांतर झालं. थोडीशी सामानाची आवरासावर झाल्यावर जनकनं विचारलं,

‘किती पैसे द्यायचेॽ’

जितू किंचित उसळून उत्तरला,

‘च्यायला, लय पैसा झाला काॽ दोस्तीत पैसा चालत नाही. मला  माहितीय तु काही मला फार दोस्त मानत नाहीस. पण मी मानतो. एक रुपयाही घेणार नाही. माझा धंदा बरा चाललाय. आत्ता एवढी पैशाची गरज नाही.’

‘अरे, पण एवढ्या फास्ट सगळं करून दिलं. एकदम सोपं झालं. एवढ्या मेहनतीचे काही ना काही तर घ्यायलाच पाहिजे.’

‘लागले तर मागून घेईन. तुला माझी मदत करायची असंल तर एवढंच कर ... बघ, तु पण तुझ्या कामासाठी शहरभर फिरत असतो. खूप लोकांना भेटतो. कोणाला भाड्यानं घर पाहिजे  असंल किंवा  विकायचं, खरेदी करायचं असंल तर माझं नाव सांग. तुझ्याकडून वर्षभरात चार गिऱ्हाईक नक्की मिळतील. त्यात पैसा वसूल होईल.’

‘ते तर मी करेनच  ... पण ...’

‘हा विषय बंद. मी त्या कोपऱ्यावरच्या हॉटेलवाल्याला चहा अन् भजे पाठवायला सांगितले. ते  घेऊन जातो मी.’

जितू असे म्हणेपर्यंत हॉटेलवाल्याचा पोऱ्या चहा, भजे ठेवून गेलाही. आपल्या  आयुष्यात असे चमत्कारिक लोक कुठून येतात काहीतरी करतात आणि निघून जातात.  पण ते  का येतात आणि का जातात, असा प्रश्न जनकच्या मनात घोटाळू लागला. त्यात गुंतण्याचा धोका ओळखून त्यानं जितूशी थोड्या हलक्याफुलक्या गप्पा मारणं सुरू केलं.

‘भजे मस्त आहेत. त्या हॉटेलवाल्याकडं मेस लावून टाकतो. म्हणजे जेवण्याची  अडचण राहणार नाही.’

‘हो हो. तेच चांगलं राहिल. उगाच सैपाकाला बाई लावायची कटकट नाही. कुठल्याच कारणानं बाई नको.’

जितूच्या तोंडून बाईच्या विरोधात वाक्य बाहेर पडणं म्हणजे आश्चर्यच होतं. जनकची  जिज्ञासा जागृत  झाली. त्यानं आवाज हळू  करत विचारलं,

‘काय रे. एकदम बाई नको इथपर्यंत पोहोचला. धोका खाल्लास की काय कुठं प्रेमात. संन्यासी व्हायचंय का.’

दोन्ही प्रश्नाला झटकून  टाकत जितूनं गादीची गुंडाळी अंगाखाली ओढून घेतली. पाय लांबवत तो म्हणाला,

‘बस  का राव. आपण अन् प्रेम. शक्य तरी आहे का. प्रेमात पडलो नाही तर धोका खायचा वांदाच नाही नाॽ’

‘मग ... दुसरं प्रकरण की काय.’

‘प्रकरण नाही रे असाच टाइमपास होता. पण थोडा अडकला होता. आता बरंच  मोकळं झालंय.’

‘हं...हो का. तुझं बरंय राव. तुला जमून जातं सगळं.’ जनकच्या मनात प्रचंड उत्सुकता दाटून आली होती. आणि हा चित्राबद्दल तर बोलत नाहीये ना, अशी भितीही होती. म्हणून तो त्याचं धडधडत्या मनानं ऐकू लागला.

‘फार काही खास नाही. तुला तर माहिती आहे. मी हा नवा धंदा सुरू केला. तर दोन-तीन प्रॉपर्टीच्या कामासाठी शहानूर कॉलनीत येणं – जाणं वाढलं होतं. तिथं सकाळच्या वेळी बसस्टॉपवर ‘ही’ उभी असायची. आपल्या नियम, अटीनुसार नाव विचारू नको. सांगणार नाही. पण वर्णन सांगतो. माझ्यापेक्षा पाच-सात वर्षांनी मोठी. काळी सावळी. दिसायला काही खास नाही. पण माझ्यापेक्षा थोडीशी उंच. फिगर मात्र कडक. नजरानजर होताच माझ्या लक्षात आलं. मग मी माग काढला. तर ती एका चांगल्या सरकारी कार्यालयात नोकरीला. ओळख करून घेतली. तर तिचा नवरा एका ॲक्सिडेंटमध्ये गेला. पाच वर्षांचा मुलगा आहे. लग्नानंतरचं एक प्रेम प्रकरण फसलं. शरीराची भूक कायम राहिली. आपल्यालाही तेच पाहिजे होतं. प्रेमाची भानगड नकोच होती. एक दिवस दुपारी भजे, मिरच्या, चकना अन् हाफ बाटली घेऊन पोहोचलो घरी तिच्या दुपारी. पोरगं शाळेत गेलं होतं. तुला सांगतो, आधी तिनं थोडी मस्ती दाखवली. घरी कशाला आले. दारू कशाला आणली. हे काय बरं नाही, असं म्हणू लागली. मग मी पण जरा टाईट  मारल्यावर राईट झाली. एवढी राईट झाली की, दीड पेग घेतला तिनं. टाईट झाली एकदम. पाच  वर्षांची  भुकेली होती. तुटून पडली माझ्यावर. दहा मिनिटात मी मोकळा झालो. पण तासभरानंतरही ती खेळतच होती. तुला सांगतो आपण अनेकींसोबत एवढी मजा केली पण ही फारच वेगळी होती. मजा आली. पाच-सात वेळा झालं. चांगलीच तयारीची निघाली.  एकदा मी पोहोचलो घरी तिच्या  तर ती एकटीच पित बसली होती. हाईट म्हणजे बिअर आणि दारू मिक्स केली होती. म्हणाली, एकटेपणाची नशा चढू लागलीय.’  असं म्हणून जितू थबकला. जनककडं मिश्किल नजरेनं पाहत म्हणाला,

‘बाई,  प्रेमात  पडली ना. लग्न करू  म्हणू लागली.’

‘अरे, बापरे  ..’

‘मग काय. मी आधी असंच तिला म्हटलं की, तुझा माझा संग फक्त बिछान्यापुरता. तु चांगली पैशेवाली. पुढं मला  सोडून  पळून गेली तर कायॽ मग 

पोराच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊ लागली. रडू लागली. महिन्याला दहा-पंधरा हजार रुपये देते म्हणू लागली. मी म्हटलं यार हे भलतंच लचांड लागलं मागं. मजा मारायच्याऐवजी बायको म्हणून गळ्यात कसं चालंल.’

‘मग ... काय केलं...’

‘काय करणार. खूप भांडून काढली तिला. तुझ्या कॅरेक्टरची काय गॅरंटीच नाही. ऑफिसमध्ये इतके पोरं आहेत. कोणाशी तरी तुझी भानगड असणारच. नसली तर करून घे, असं म्हणालो. आणि पळालो. शिव्या देत, शोध काढत महिनाभर फिरली माझ्यामागं.’

तो चित्राबद्दल सांगत नाहीये, हे कळाल्यानं जनकला मनातून उकळ्या फुटत होत्या.

‘आता बदली करून दुसऱ्या गावाला गेलीये म्हणे. नवा माणूस गाठलाय तिनं. पोरालाही घेऊन गेलीय. सुटलो. पण एक सांगू  का. फारच खास होती. भुकेली होती. तिची भूक कदाचित कोणाकडूनच भागणार नाही.’ असं सांगून एकदम घरगुती सल्ला  द्यावा, तसा तो म्हणाला, ‘तुला अशी बाई सापडली तर सोडू नकोस हां.’

तसं जनक एकदम  चपापला. याला आपल्या डोक्यातलं वादळ कळलं की काय.

‘घ्या. तुला जे जमतं ते मला थोडंच जमणारंय.’

किंचित चिडक्या आवाजात जितू म्हणाला,

‘काय झालं न जमायला. पुरुष आहे नाॽ तेवढंच बास.’

‘अरे, पण चांगली पार्टनर तर पाहिजे नाॽ’ जनकच्या प्रश्नावर खोलीत एकदम शांतता पसरली. ती भंग करत जितू पुटपुटला,

‘चित्रा मॅडम आहे ना. त्यांच्यावर हात साफ करून घे.’

‘काय, काय .. बोलतोसॽ’ मानभावीपणाचा आव आणत जनक ओरडला. त्याला शांत करत जितूनं सांगितलं.

‘तु जे ऐकलं तेच बोलतोय. जमून जाईल. मला खात्री आहे.’

‘कशावरूनॽ कशावरून म्हणतोयस तु हे ...’

‘बोललो ते बोललो. फार खोलात विचारू नको. मी सांगणार नाही. पण मी सांगतो ते करून टाक. जवानी आहे. वाया घालवू नको. नंतर पुन्हा म्हणू नको की जितूनं चांगला सल्ला दिला नाही. तुला अजून एक खबर देऊन टाकतो. चित्रा बाईचा नवरा कुठल्यातरी प्रशिक्षणासाठी महिनाभर डेहराडूनला गेलाय. ती एकटीच आहे. लोहा गरम कर लो और मार दो हातोडा. देह असा जाळण्यासाठी थोडाच दिलाय.’ असं म्हणत जितू वाऱ्याच्या वेगानं बंगल्याबाहेर पडला. त्याच्या गाडीचा आवाज दूर जाईपर्यंत जनक शांत बसून होता. पण त्याच्या डोक्यात जितूचं बोलणं घोंगावू लागलं होतं. शरीराच्या वादळात असा काही उडू लागला की, मोबाईलची बेल वाजून शांत झाली तरी त्याच्या लक्षात आलं नाही. दहा मिनिटानंतर आवेग कमी होऊ लागल्यावर त्यानं मोबाईल पाहिलं .... त्याचा चेहरा एकदम उजळला. डोळ्यात वासना चमकू  लागली. ... तो कॉल चित्राचा होता.

॥ ध ॥

‘अरे, माझं एक काम होतं. तुझ्याकडून काही मदत करता आली तर पहा ना.’

‘ओह ... सांगा ना. आवाक्यात असेल तर करून टाकतो. चिंता नको.’ त्यानं तिच्या चेहऱ्यावरून चार-पाच वेळा डोळे फिरवले. जितूचं बोलणं डोक्यात फिरवत डोळे भरून तिला एकदा पाहून घेतले. ते तिच्या लक्षात आले. मग तिने त्याच्या डोळ्याला डोळे भिडवले आणि भुवया उडवल्या. तसा तो काहीसा शरमला.

‘तु असा माझ्याकडं बघत राहिलास  तर काम कसं सांगणारॽ’

‘सॉरी ... काम प्लीज ...’

‘अरे, मी एका सोशल क्लबची सेक्रेटरी झालीय. क्लबच्या प्रेसिटेंड आणि बाकीच्या मेंबर्सनी निवड केलीय माझी. एकमताने. ऐकायलाच तयार नाही. मी म्हटलं मी आधीच खूप बिझीय. पण नाही.  ते म्हणाले, तुम्हीच सचिव पाहिजेत.  परवाच्या दिवशी पेपरला फोटोही आला होता. तु पाहिला नसशील कदाचित. चांगला मोठा होता. बरं, ते जाऊ दे. महत्वाचं काम सांगणं राहून जाईल. जनक माझ्या त्या क्लबचे दोन वर्षाचे वार्षिक अहवाल प्रसिद्ध करायचे राहिले आहेत.’

‘मग ...ॽ’

‘तयार आहे त्यांच्याकडं सगळं. म्हणजे सॉफ्ट कॉपी. त्याचं मासिकासारखं छापून घ्यायचंय. माझ्याकडं फारसा वेळ नाहीये. धुळेसाहेब आहेत ना ... त्यांची प्रिटिंग  प्रेस आहे एमआयडीसीमध्ये. त्यांच्याशी बोलले आहे. ते देतो म्हणाले छापून. त्यांच्याकडं ना तीनवेळा ते कच्ची प्रिंट आऊट देतात. तिन्ही तपासून फायनल केल्यानंतरच चौथ्यांदा प्रिंट करतात. आणि तपासायचं काम त्यांच्या प्रिंटिंग युनिट ऑफिसमध्येच करावं लागतं. माझ्याकडून त्यांच्याकडं तीन चकरा मारणं होणार नाही. आणि तिथं बसून शंभर पानंही तपासत बसता येणार नाही.’

‘हो ... हो ... खरं आहे.’

‘तर तु हे काम करून देशील का मलाॽ रात्रीच्यावेळी गेलास तरी चालेल. प्लीज.’

जनक सळसळू लागला होता. त्याच्याकडून नकार येणं शक्यच नव्हतं. ते तिलाही  माहिती होतं. फक्त माहितीच नव्हतं. तिला पक्की खात्री होती. हे काम झाल्यावर त्याला काहीतरी बक्षिसी देण्याचंही तिनं नक्की केलं होतं.

खरंतर जनकला प्रिटिंग, कच्ची छपाई तपासणं याचा काही अनुभव नव्हता. पण त्यानं तसा विचारही केला नाही. तिनं सांगितलेलं काम पूर्ण करणं आणि तिच्याकडून पुन्हा एकदा तिच्या भानगडी जाणून घेणे. तिच्यावर चढाईचा प्रयत्न करणे. हेच त्यानं गोंदवून घेतलं होतं.

पुढला आठवडाभर त्यानं अत्रेंच्या प्रेसला चकरा मारून, कागदं पुन्हा पुन्हा तपासून अहवाल छापून घेतले. आणि रात्र होण्याच्या बेतात असताना तिच्या घरी पोहोचला. तेव्हा ती कार काढून कुठेतरी निघाली होती. त्याला वाटलं आपली वेळ चुकली. आपण नेहमीप्रमाणे तिच्यावर स्वार होण्याची संधी पुन्हा एकदा गमावली आहे. थोडं आधीच पोहोचायला पाहिजे होतं. तो चडफडू लागला. ती अहवालाचा  गठ्ठा घरात ठेवायला सांगून कधी निघून जाते, याची तो वाट होऊ लागला. पण आज तसं  होणार नव्हतं. त्याच्या आयुष्यातील नेहमीच्या नाट्याचा नवा प्रयोग लिहिला गेला होता. ती त्याला म्हणाली,

‘एक कॉपी घेऊन गाडीत बैस आणि बाकीचा गठ्ठा गेटच्या आतल्या बाजूला ठेवून दे.’

‘आँ ...  मीॽ’  त्यानं आनंदयुक्त आश्चर्यानं विचारताच ती म्हणाली,

‘दुसरं काही काम असेल तर राहू  दे. पण काही नसेल तर ये. पटकन बैस. उशिर होतोय.’

ठरवलं असतं तरी त्याला नकार देणं शक्यच नव्हतं. तो गाडीत  बसला. त्याला पुन्हा एकदा तिच्या अगदी जवळ राहण्याची संधी मिळाली होती. तिनं कचाटून ॲक्सिलेटरवर पाय ठेवला तशी गाडी दणाणत कॉलनीबाहेर पडली. आणि दोन मिनिटातच शहराबाहेरील निर्जन रस्त्यावर धावू लागली. तशी तिनं गाडीच्या काचा थोड्याशा खाली केल्या. आणि डॅशबोर्डमध्ये ठेवलेला चष्मा डोळ्यावर चढवत  विचारलं,

‘चांगला दिसतोय का रे हाॽ’

‘हो तर.  एकदम  छान. नंबरचा आहेॽ’

‘नाही रे. साधाच आहे. फॅशन म्हणून घातलाय. निरंजनसोबत दिल्लीला गेले होते एकदा. तेव्हा तिथून आणलाय. आणि बघ डोळे चांगले आहेत माझे. हो ना.ॽ’

तो तिच्याकडं थोडं-थोडं चोरून पाहू लागला. 

तिनं अतिशय पातळ झिरझिरीत  शर्ट घातला होता. वरची दोन्ही बटनं उघडी  होती. त्यातून आतलं सगळं उघड होत होतं. भल्यामोठ्या बूब्सवर सोन्याची चेन रुळत होती. उजव्या बूब्सवरचे दोन तीळ स्पष्ट दिसत होते. खाली तोकडी पँट घातली होती. शर्ट आणि पँटमधून तिचं पोट आणि पसरलेली बेंबीही दिसत होती. तिनं मादक सेंट लावला होता. मोकळे सोडलेले केस वाऱ्यावर भुरभुरत होती. वरवर पाहता ती मूडमध्ये असली तरी तिच्या मनात काहीतरी खळबळत असावं, असं त्याला वाटलं. त्यानं अंदाज घेण्यासाठी विचारलंही. पण ती काहीच बोलली नाही. त्याला स्पर्श होईल याची काळजी घेऊन तिनं टेप ऑन केला. जुन्या पुराण्या गझला सुरू झाल्या. आता कार शहराच्या बरेच बाहेर पडली होती. रात्रीचे नऊ वाजून  गेले होते. हायवे असूनही वाहतूक अत्यंत तुरळक होती. पुढं काय होणार, या उत्सुकतेनं जनक पुढच्या  क्षणाची वाट पाहू लागला होता. तिच्याकडं पुन्हा पुन्हा निरखून बघत होता. त्याला वाटू लागलं होतं की आज  फक्त हा रस्ता संपता कामा नये. कारण लवकरच काहीतरी खास घडणारंय. तेही तिच्याकडून. आपल्याला ते  मागण्याची गरज पडणारच नाही.  तीच देऊ करणार आहे.  तो पुन्हा  एकदा वासनेच्या डोहात डुंबू लागला होता. आता तिनं कार हायवे सोडून आतल्या  रस्त्यावर वळवली.  आणि म्हणाली,

‘तुझ्याकडं हे स्किल आहे,  हे  मला माहिती  होतं.  पण तु जॉब एकदम एवढा चांगला डन करशील, असं वाटलंच नव्हतं.’

तिच्याकडून झालेल्या कौतुकानं तो सुखावला. पण याचं श्रेयही तिलाच द्यायचं असं त्यानं पक्कं केलं होतं. डोहातून किंचित  डोकं बाहेर काढत म्हणाला,

‘तुम्ही दिलेलं काम म्हणजे फत्ते झालंच पाहिजे. पण यात तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला, हे महत्वाचं. आणि तुम्ही तर सगळं समजावून सांगितलंच होतं अगदी बारीक-बारीक गोष्टीही सांगितल्या होत्या. धुळेसाहेबांशी तुम्ही आधीच बोलला होतात. मला काही फार करावं लागलं नाही. त्यामुळं जे चांगलं  झालंय त्याचं श्रेय तुम्हाला आणि तुम्हालाच आहे. काही चुका झाल्या असतील  माझ्याकडून तर माफ करा.’ तो अतिशयोक्तीच्या अभिनिवेशनानं बोलला. त्यावर ती खळखळून हसत म्हणाली,

‘खूपच ॲक्टिंग करतोस रे.’

या विषयावरच बोलत राहिलो  तर मुद्याचं हातून निसटेल, या विचारानं तो सावध झाला. तसंही अशा गप्पांमध्ये त्याला फारसं स्वारस्य  नव्हतं. तिचं शरीर तर मिळालंच पाहिजे. त्यासाठी तर वर्षभरापासून आपण एवढ मगजमारी करतोय. पण समजा यश आलं नाही. नाही मिळाली ही. तर तिच्यात अनेक बुरख्याखाली लपलेली मादी तर आपल्याला कळालीच पाहिजे.  आणि आजची संधी तर तिनंच  मिळवून दिलीय. तिचीच  इच्छा असेल. पण ती बोलू शकत नसेल तर आपणच पुढं गेलंच पाहिजे. शेवटी डाखाळलेल्या पुरुषाचीच ही जबाबदारी असते. त्याला अनेक दिवसानंतर बाणेश्वरस्वामींचा उपदेश आठवला.

‘हा ... थोडी ... थोडी करतो. चांगले लोक  सोबत असले की मला असं काही बोलायला आपोआप सुचतं.’

‘अच्छा, मला खुश करायसाठी बोलतोयस नाॽ’

‘मग काही चूक आहे का त्यात.ॽ’

‘नाही, नाही. मला तरी कोणंय असं खुश करायला.’ असं पुटपुटत तिनं त्याच्यावर नजर रोखली. गिअरवरचा हात काढून हलकेच त्याच्या हातावर ठेवत म्हणाली,

‘एवढं चांगलं काम केलंस.  आणि वर माझी ताऱीफही करतोयस. खुश झालीय मी. माग काय बक्षिस पाहिजे ते. आणि  त्यात पुन्हा भाव खाऊ नकोस हां. बक्षिस नको, अशी नाटकं चालणार नाहीत. पटकन मागून टाक. माझा मूड चांगला झाला आहे आता. तो पुन्हा घरी जाऊन सटकायच्या आत मागून टाक.’

अहवाल छापून आणल्याबद्दल त्याचे खूप कौतुक करते. आणि बक्षिस माग असे म्हणते.  तो तिच्या ओठांचा स्पर्श मागतो. ती म्हणते की  अरे या शरीरात काहीच नाहीये.  टरफल आहे. रॅपर आहे. पण तो ऐकत नाही. या पूर्वीही तुला मी पुण्यात असताना सगळे ऑफर केले  होते. पण तु नाही म्हटलास. ते मला खूप चांगले  वाटले. मग आता  पुन्हा का शरीराशी चाळा. तो तिला पुन्हा महेबूबभाई,  सुदाम, दिलजितसिंग, निरंजनबद्दल विचारतो. तेव्हा ती टाळून देते. त्यांच्याशी मैत्री हा खासगी, व्यावसायिक  विषय आहे. असं सांगून उडवाउडवी करते. पण ते पुरुषच चवचाल होते. एक बाई झाली की दुसरी शोधतात. असं  म्हणते.आणि एकरुप होण्यास स्पष्ट  नकारही देते. मी चालू बाई असल्याचं तुला वाटत असलं तरी माझ्याकडून हे होणार नाही. या पूर्वीही  सांगितलं आताही सांगते.  फक्त  मित्र म्हणूनच  राहा. बाकीच्यांच्या भानगडी ऐकून तुझ्या पदरात काहीही पडणार नाही. लग्न करणार का, असंही विचारते. तो घाबरतो. रुमवर येऊन पडतो. भयंकर निराश  होतो. काय करावे ते कळत नाही. तो रिनाला  कॉल करतो. आश्चर्य म्हणजे ती त्या  दिवशी काही कामानिमित्त शहरात आलेली असते. ती सरळ त्याच्या रुमवर कार घेऊन येते. दोघे  कारमधून बसून तिच्या हॉटेलात मुक्कामाला जातात. सकाळी उठतो तेव्हा रिना निघून गेलेली. तो रामदाससोबतच्या  रंजनाला  कॉल करून बोलू लागतो.

------------------

--------------

वसुधा ... जनकच्या सारखंच इव्हेंटचे काम करणारी. आत्यासोबत एकटीच राहणारी. नको असताना लग्न होते. छळ होते. पळ काढते. त्याचवेळी तिला पुरुषांशी कसे खेळावे याचा अंदाज येतो. ती खेळू लागते. पण अतृप्त राहते. तो तिच्याकडे काही काळासाठी आकृष्ट होतो. पण ती फारकाळ टिकणार नाही. सारखी तक्रारी करत राहते. आपल्याकडून काहीतरी मिळेल, या सुप्त इच्छेवर आहे. मुख्य म्हणजे आपल्या प्रगतीची गती कमी करू शकते, असे त्याच्या लक्षात आल्यावर तो तिच्यापासून अंतर राखू लागतो.

---------------

---------------

वंदनाचा रिप्लाय पडला असावा असे वाटून त्याने मोबाईल ऑन केला. अपेक्षेनुसार चार मेसेज होते. सगळे कॉपी पेस्ट होते. कुठलीतरी शेरो शायरी होती. ज्ञान पाजळणारी. च्यायला हिला काही अक्कलच नाही. मी सांगतोय काय आणि ही दुसरंच काही बोलत राहते. येता-जाता अपमान करत राहते. पण तिला तसं स्पष्टपणे सांगणं रामदासनं टाळलं. आणखी एक-दोन पेगचा मूड आहे. तो वादावादीत वाया जायला नको, असा विचार करून त्यानं गुलाबाच्या फुलांची इमोजी पाठवून दिली. समोर पडलेलं एक मासिक उचललं. त्याची दोन-चार पानं चाळली. पण त्याला त्यात तथ्य वाटेना. टी पॉयवर पडलेल्या न्यूज पेपरच्या गठ्ठ्याकडे नजर टाकली.स्साले काहीही छापतात. त्यांच्या मनाला येईल ते सांगत राहतातअसं म्हणत पेग भरला. आणि त्याची नजर समोरच्या कपाटावर गेली. तिथं वरच्या बाजूला लावलेला फोटो न्याहाळला. बरीच गर्दी आहे यात. अरे, इतकी वर्ष झाली हा फोटो इथं लावून. पण या काकांना पहिल्यांदाच एवढं निरखून बघतोय, असं त्याच्या लक्षात आलं. तो मनात थोडासा ओशाळला. एकेकाळी किती महत्वाचा होता ना हा माणूस आपल्यासाठी. त्यानंच तर स्थळ आणलं होतं. किती सहजपणे जमवून आणलं होतं ना सगळं. एकाच दिवसात आपलंही जग बदलून गेलं. 

---- 

आई-वडिलांनी त्याचं नाव चांगलं सुग्रीव असं ठेवलं होतं. पण शाळेचा टीसी वगळता या नावाचा आणि त्याचा काहीही संबंध राहिला नाही. सगळे त्याला लाडानं तिरप्या म्हणायचे. अगदी त्याचे घरचे लोकही. कारण त्याचा पूर्ण चेहरा, डोकं एका बाजूला किंचित कललेलं होतं. मानेला बाक होता. त्यामुळं मोठमोठे आवळ्याएवढे डोळे असूनही त्याला समोरच्या माणसाकडं सरळपणानं पाहता येत नव्हतं. तो कायम मान खाली घालून बोलतोय. एकदम नम्रपणे वागतोय, असं वाटायचं. ते खरंही होतं. कारण आपण दिसायला एकदमच सुमार आहोत. कमालीचं बसकं आणि मोठ्या आकाराचं नाक, छोटंसं कपाळ, फुगलेले कान, वाकलेली मान, तिरपं डोकं अशा अनेक देणग्या इश्वरानं आपल्याला दिल्या आहेतच. शिवाय फारशी कुशाग्र बुद्धी दिलेली नाही, हेही सुग्रीवला ठावूक होतं. खरंतर स्वतःबद्दल माहिती असणं, हीच त्याची मूळ ताकद होती. त्यानं शिक्षणात फारसा वेळ घालवला नाही. बारावी पास होताच तो शिक्षक होण्याच्या धडपडीला लागला. डीएड पास झाला. पण नशिबात काहीतरी वेगळं असावं. त्याला पूर्णात्मा सर्वानंद महाराज शिक्षण संस्थेत कारकून म्हणून नोकरी लागली. काही वर्ष कारकुनी करून शिक्षक होऊ, असं त्याला वाटलं होतं. पण ते शक्य झालं नाही. शिक्षण संस्था शहरातील मोक्याच्या जागेवर होती. जुन्या पिढीतील शिक्षकांनी प्रचंड मेहनत घेतली होती. विश्वस्त मंडळात भरपूर राजकारण्यांचा भरणा होता. त्यामुळं कशाचीच चिंता नव्हती. काही वर्षातच वडिलांनी आणलेल्या मुलीला त्यानं मान खाली घालूनच स्वीकारले. शोभासोबत तो रमून गेला. दोन मुलांचा बाप झाला. आता एवढं सगळं सांगितल्यावर तुम्हाला वाटेल की, तिरप्या म्हणजे एक पापभीरू, सज्जन गृहस्थ असावा. पण तसं मुळीच नव्हतं. शाळेत असल्यापासूनच त्याच्यातला पुरुष पूर्ण जागृत झाला होता. शाळा सुटली की ट्युशनला डुम्मा मारून तो मित्रांसोबत मोहन टॉकीजला जायचा. इंग्रजी, तमिळी भडक सिनेमा पाहायचा. परत येताना रिगल थेटरच्या गल्लीत उभ्या वेश्यांना डोळ्यांनी पिऊन टाकत घरी पोहोचायचा. दहावीत असताना पाच-सात वेळा वेश्यांसोबत त्यांच्या खोलीवर जाऊन त्यानं स्वतःला मोकळं करून घेतलं होतं. पिवळी पुस्तकं म्हणजे त्याचा विक पॉईंट होता. ही आवड त्यानं नोकरीमध्ये बऱ्यापैकी पैसा मिळताच वाढवली. 

झालं असं की तो जिथं राहायचा तिथं गल्लीच्या कोपऱ्यावर कमलदास लालवाणीची  दुसरी बायको राहायची. कमलदास सिनेमाच्या व्हिडिओ कॅसेट विकायचा. त्या काळात तो धंदा जबर चालायचा. दोन-चारदा असंच घरी कॅसेट आणण्यावरून त्याची कमलदासशी ओळख झाली. चार वाजता शाळेतून सुटल्यावर सुग्रीवला काहीच काम नसतं, हे त्यानं हेरलं. आणि ब्ल्यू फिल्मच्या कॅसेटी खात्रीच्या गिऱ्हाईकाकडं पोहोचवण्याचं काम त्याला सोपवलं. तिरप्याला त्यातून चांगली कमाई सुरू झाली. वर्षभरातच त्यानं सगळी लिंक ताब्यात घेतली. दोन बायका करूनही कमलदासला मुल-बाळ नव्हतं. त्यानं जवळपास सगळा धंदा तिरप्याच्या ताब्यात देऊन टाकला.

चवचाल

श्रीकांत सराफ